योग-योगिनी, मोह-मोहिनी , काम-कामिनी , बंधु - भगिनी , पिता-माता , पती- पत्नी , राजा-राणी आणि आत्मनिर्भरता !

शिष्य, गुरु, मित्र, मैत्रिण, पिता, पुत्र, पत्नी, बहीण, आई किंवा कोणतेही जवळचे नातेवाईक जर ऐकत नसेल तर ही एक मागच्या जन्माची ब्याद समजून लोकं त्याला एखाद्या पाळीव किंवा जंगली जनावराप्रमाणे भरपेट अन्न खावू घालून मोकळे होतात. त्यांना शिकवण्याची, पैसे देण्याची तसदी घेत नाहीत. एवढा क्रुर समाज / परिवार आहे. अश्या परिवारावर मोह ठेवला तर माणूस स्वतःची आत्मनिर्भरता गमावून बसतो. अश्यांना शिकवणे म्हणजे त्यांची पापे स्वतःच्या डोक्यावर घेणे असते.

राजाला घडविणारे चाणाक्याकडून तुम्ही काहीच शिकले नाही तरी चालेल ! पण आई ,बहिण , पत्नी या घरच्या स्त्रियावरील मोह देखील सरळमार्गी पुरुषाचा देखील
आत्मनाश घडवितो , हे मात्र खरे आहे.

जो पर्यंत नष्टोमोहा स्मृतिलब्धा स्थिती पर्यंत माणूस स्थिर होत नाही तोपर्यंत तो आत्मनिर्भर होवू शकत नाही.

गुरुमाता, गुरुपिता, गुरुबंधु, गुरु भगिनी, गुरुपुत्र, गुरुपत्नी या दृष्टीकोणातुन आसक्तीरहित बुद्धीवादी ( व्यावहारिक) दृष्टीकोणातून संबंध ठेवले तर मोहजनीत चुका होणार नाहीत.

या सर्व आप्तस्वकियांना पितर म्हणतात. यांना भरपेट खावू घालणे. मीठा बोलणे. दूरून नमस्कार करून मार्गस्थ होणे. त्यांचा नाद न करणे. त्यांना याद न करणे. आपले आपण व्यवहारी राहणे. हिसाब किताब न वाढवणे. हिसाब किताब नील राखणे. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपली आत्मनिर्भरता नष्ट न होवू देणे. हेच या जीवनाचे प्रमुख आधारभूत उद्दीष्टय आहे.

पूर्वानुभव नसलेल्या कार्य क्षेत्रातील सत्कृत्याचा मोह देखील बंधनास कारणीभूत ठरतो. त्यामुळे अश्याठिकाणी त्या त्या क्षेत्रातील अनुभवी वरिष्ठांची मदत घेण्यास कचरू नये. या कारणांमुळे लहानथोर सर्वांशी सावधपणे आदराचे संबंध ठेवावेत.

 मुलभुत गरजा पूर्ण करतांना देखील कुटुंबीयांच्या वासनांच्या जनजालामध्ये बाल हट्ट, वृद्ध हट्ट आणि तरुणपणातील सनक यांचा आदर करीत स्वतःची आत्मप्रतिष्ठा सांभाळावी लागते.

प्रोब्लेम वर इंन्स्टंट सोल्युशन देण्याची सवय बहुदा तोंडघशी पडते. लोकांना सोल्युशन नको असते फक्त सान्त्वन हवे असते. त्यांचे म्हणणे ऐकून घेणारी डस्टबीन हवी असते.

मोहजनीत तमअंधकारातून निर्माण होणारी पारिवारीक सदस्याची सनक निमुटपणे सहन करणे म्हणजे " कितने भी तू करले सितम, हस हस कर सहेंगे हम " अशी पाळी कुटुंबावर येत असते. त्यामुळे माणसाने कृतज्ञ नम्र जरूर असावे पण आत्मनिर्भर जगावे आणि आत्मनिर्भर मरावे. पुराणात सुद्धा शीव कुटुंब, विष्णु कुटुंब, गणेश आदि कुटुंबे एकमेकांची सनक सांभाळत चतुराईने जीवन जगत होती असा उल्लेख आढळतो. आजकालच्या विभक्त कुटुंब पद्धतीत सुद्धा हे नातेसंबंध बॉस, एम्लॉई, क्लायंट, वेन्डर आदि वेगळ्या नावाने चतुराईने चालू राहणार आहे.

 माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कोणीही तुमच्याकडून गाईडन्सची अपेक्षा करीत नसते. केवळ एकमेकांचा आदर ठेवून सन्मान देवून बोलणे व्हावे एवढीच अपेक्षा असते. मग ती व्यक्ती वयाने अथवा अनुभवाने लहान किंवा मोठी असो.

भावनिक संबंध मग ते सर्वोच्च ज्ञानी माणसाबरोबर का असेनात, शेवटी दुःखदायक ठरतात. त्यामुळे प्रार्थना हिलींग सारखे ध्यानप्रकार माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. 

एक दोन महिना काहीच खायला प्यायला न मिळालेली योगीनी सुद्धा दारावरचा कोंबडा मारून पोटाची भुक भागवते. असा अनुभव शास्त्रज्ञांना प्रयोगाअंती आला. त्यामुळे ज्ञान, योग, ध्यान प्रकार शिकविणारे उच्च शिक्षित लोक पण कायदेशीर रित्या अर्थपुर्ण व्यवहार करून शिक्षण देतांना आजकाल दिसत आहेत.

एका पक्ष्याची शिकार करून एवढे घनघोर रामायण महाभारत घडले. तर तुम्ही विचार करा, की रोज शेकडो कोंबड्यांचे बळी देऊन त्यांचे खत शेतात घालणाऱ्या माणसापासून तुम्ही काय अपेक्षा कराल? त्याला तर मुक्ती नाहीच नाही पण जो कोणी त्याच्याकडे अन्न मागायला जाईल त्याचेही काही खरे नाही. मुक्ती तर राहीली दूर पण साधे आरोग्य पण सांभाळणे अवघड होऊन जाते.

" प्रयत्न करूनही मुक्ती मिळत नाही. " या संकल्पनेवर आधारीत कुटुंब आणि समाज घटक, भय आदि निगेटीव्ह एनर्जी वर विश्वास करून एकमेकांना मदत करण्याचे नाटक करित आर्थिक राजकिय व्यवहार करतांना दिसून येतात. एकमेकांकडे पाहत, एकमेकांची नक्कल करीत, एकमेकांशी भांडत जनावराप्रमाणे कळपात जीवन व्यापन करतात. अशा लोकांसाठी आत्मनिर्भरता हा केवळ शाब्दीक नाच असतो.

|| राम ||     || ॐ शांतिः ||     || ॐ नमः शिवाय ||

                   || श्री कृष्ण समर्थ ||



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

गोटी सोडा !

गोटी सोडा, गोटी सोडा ! राम धरा, बोटी सोडा !   गोटी सोडा, गोटी सोडा ! राम धरा, बोटी सोडा !   ॥ धृ ॥ वय झाले, चाळीशीचे ! बंधु आहेत, आळिशीचे...

एकूण पृष्ठदृश्ये :