मन्नु भाई की मोटर कार

नव-कार

आपल्या शरीराला नव-अर्णव व त्याचे नऊ-नाथ असलेले नव कार म्हटलेले आहे. आणि आपण आत्मा आहोत, आपण शरीर नाही, आपण शरीर मन बुद्धी इ. घटकांनी बनलेल्या कार चे सेवक आहोत. 

कार सेवक !

जोपर्यंत आत्म्याला संपूर्ण मुक्ती मिळत नाही तो पर्यंत तो कोणत्या ना कोणत्या कार चा सेवकच राहतो !

( प्रजापिता ब्रम्हकुमारीय विश्व विद्यालय हिच गोष्ट अनेक शतकांपासून सर्व मानव जातीला सांगत आहे. ज्याने ऐकले फॉलो केले त्याने animal to angel transformation करून घेतले व पुढील जन्माचीही तजवीज करून ठेवली. )

आपण आत्मा आहोत ! शरीर म्हणजे कार समजून घेऊन तिच्यात काही बिघाड असेल तर तो स्वतःहून दुरुस्त करायचा किंवा इतरांकडून दुरुस्ती करवून घ्यायची ! 

जो पर्यंत आत्मा ह्या कार मध्ये स्थापित आहे तो पर्यंत या कारची देखभाल करणे आपले कर्तव्य बनते. जेव्हा कार तंदुरुस्त असेल तेव्हा ती चालवण्यासाठी आपण तिला चार्ज करून कामे करू शकतो . 

आता जीपण जशीपण कार आपल्या नशीबात आहे तिला चार्ज करावेच लागेल. 

सेल्फ स्टार्ट कार आणि सेल्फ चार्जिंग कार ची पद्धत म्हणजेच सुदर्शन क्रिया, ज्योतिबिंदू मेडीटेशन, गायत्री, मृत्युंजय जप, होम, अग्नीहोत्र , भस्रिका, उज्जायी प्राणायाम, सूर्यनमस्कार इ. इ. योगिक कॉमन गोष्टी आहेत. धी म्हणजे धारणा शक्ती किंवा मेमरी किंवा बुद्धी ! प्र म्हणजे प्रगत ! म्हणजे इंटेलिजेन्स ! गायत्री मंत्रात वरील सर्व 'बॉडी-माईंड-इंटलेक्ट'-एम्बेडेड कार ने मागितलेले आहे !

या खेरीज काही लोक बळी पद्धतीने चार्जिंग करतात त्यांना टुकार किंवा वायबार लोक असे ही म्हणतात. कारण त्यांचे चक्र दोन कार मध्ये चालते. उदाहरणार्थ , एक व्यक्ती बोकड मारून त्याला खातो. ती व्यक्ती एक मानवी देह रूपी कार आहे आणि बोकड हे पशू देहरूपी कार आहे. मृत्युनंतर बोकड आत्म्याला मानव देहरूपी कार मिळते आणि मानवी आत्म्याला बोकड देहरूपी कार मिळते. म्हणजे त्यांचे दोन कारांमध्ये सतत चक्र चालू राहते जो पर्यंत त्यांना देहरूपी कारला चार्ज करण्याची उन्नत पद्धत उपलब्ध होत नाही. म्हणून या चक्राला टुकार असे म्हटले आहे. काळ चक्राचे आघात असह्य झाल्याने मनुष्य तळमळून उठतो, सत्याचरण साधना योगीक आभ्यास पवित्र ज्ञान  लाथाडणाऱ्याला बेकार किंवा वायबार कार असे म्हणतात.

 " टु कार आणि वाय बार कार " हा प्रकार वापरणार्या आत्म्यांना शाप तळतळाटाबरोबर बळी गेलेल्या विकसनशील आत्म्याचे कोप पुढील जन्मी सहन करावे लागतात. अश्या लोकांनी जर आयुष्यभर सुदर्शन क्रिया मेडिटेशन सारख्या चार्जिंग मेथड वापरल्या असत्या तर त्यांना डॉक्टरांकडे किंवा स्मशानात परत परत रांग लावणारे आयुष्य पदरी पडले नसते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ओ पियापिया, तुने क्यों गोविंद भुला दिया ?

ज्यांची अज्ञातपणे, अज्ञानवशात, किंवा अजाणतेपणे, किंवा हतबलतेमुळे, किंवा कर्मवशात, सुशुमनासरस्वती नाडी ब्लॉक झाली आहे. अशा लोकांना नामजपाचा व...

एकूण पृष्ठदृश्ये :