डोक्याची डस्टबिन करायची की ज्ञानाचा कटोरा ?

 " स " आणि  " क्ष " चा केवढा फरक आहे.

" स " बीज धरून सनकी माणूस आजारी पडतो. "जळवा-जळू" म्हणून वापरला जातो.  सनकी माणूस मोहाच्या लोकांकडून मोहाची दारू पिवून वापरला जावून नंतर कोलला जातो ! शेवटी उल्लु बनविला जातो , लोकं त्याच्या पुतळ्याला हार तुरे चढवून स्वतःच्या राजकारणाची खळगी भरतात ! मोठा मोठा म्हणून अधिकाराची मानाची अपेक्षा प्रत्येकाकडून करणारा पुढच्या जन्मी हतबल बालक म्हणून जन्माला येतो तेव्हा त्याला स्वतःची मान सुद्धा धरता येत नाही. अहंकार त्याला क्षणभर कडेवर सुद्धा घेवू शकत नाही.

" क्ष " बीज धरून क्षमाशील माणूस आरोग्यवान बनतो. क्षत्रिय बनतो.  क्षमाशील माणूस . स्वस्थता स्थिरता समाधान देणारे पद प्राप्त करतो, गरुडावर स्वार होतो ! एवढे " क्ष " चे माहात्म्य आहे. शनी महाराज पण गरुडावर स्वार असतात तेव्हा सर्वोत्कृष्ट फल देतात ! 

स्वतःची सनक जे नष्ट करू शकतात ते लोक संत बनुन ब्रम्हांड गिळून बसलेले असतात. जन्म,मृत्यू, जरा, व्याधीच्या चक्रापासून कोसो दूर असतात. मैं मैं करणारी मेंढी आणि मानाची मांजर बनण्यापेक्षा आयुष्याचे लक्ष साधणारी लक्ष्मी बना !

म्हणून आपण म्हणतो .

"श्री महालक्ष्मी प्रसन्न !"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ओ पियापिया, तुने क्यों गोविंद भुला दिया ?

ज्यांची अज्ञातपणे, अज्ञानवशात, किंवा अजाणतेपणे, किंवा हतबलतेमुळे, किंवा कर्मवशात, सुशुमनासरस्वती नाडी ब्लॉक झाली आहे. अशा लोकांना नामजपाचा व...

एकूण पृष्ठदृश्ये :