प्रत्येक हिंदू स्त्रीच्या गळ्यातील मंगळसुत्र हे तिच्या सौभाग्याचे प्रतिक आहे. मंगळसुत्र याचाच अर्थ संसारात सर्वकाही मंगलमय व्हावे याचा उपाय !
मंगळसुत्रात खालील गोष्टी असतात व त्यांचा अर्थबोध यावर आपण चिंतन करूयात !
मंगळसुत्रात असलेल्या दोन वाट्या हे मंगल करणाऱ्या मंगल ग्रहाचे प्रतिक आहे. मंगल करणाऱ्या दोन मुख्य देवता आपल्याला माहीतच आहेत. हनुमान आणि गणेश ! त्यांचा वाटा, मानसन्मान जर आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी दिला तर मंगल प्रसन्न होणारच !
मंगळसुत्र हे सोन्याच्या चेनचे बनलेले असते. त्यामुळे ही जी चेन आहे ती तुटता कामा नये. चेनची प्रत्येक कडी ही एकमेकांशी जुळलेली असते व प्रत्येक कडी अखंड असल्या कारणाने चेन तुटत नाही. एकजरी कडी कमकुवत असेल तर चेन टिकणार नाही. सोन्याची जेजुरीचा खंडेराया श्रीमल्हार हे कुळदैवत आहेत.
महादेव शंकर हे संपूर्ण मानव जातीचे पिता मानले जातात. पित्याचे लेकरे महादेवाच्या चरणी श्रद्धा नीष्ठा ठेवून कार्यमग्न असतात. कोटीकोटी जनतेची श्रद्धा त्यांना आपला कुळदैवत देव मानते व याच कारणाने सर्व जनता एकतेच्या सुत्रात बाधलेले आहेत.
मंगळसुत्रातील सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे काळे मणी !
काळे मणी हे शनी ग्रहाची आठवण करून देतात. शनी महाराजानी सांगितलेल्या न्यायनीतीला अनुसरण करणारे लोक संसारात सुखी राहतात हे स्पष्ट होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा