सध्या ग्लोबल व्हिलेज/ वसुधैव कुटुंबकम् यासारख्या टर्म बऱ्याचदा कॉईन होतांना दिसतात. तर खरच हे शक्य आहे का ? कुटुंबातील प्रत्येकाला समसमान वाटा मिळेल का ? अशा एक ना अनेक प्रश्न जनमानसात विचारले जात आहेत. आपण वसुधैव कुटुंबकम् खरच शक्य होईल? या विषयावर थोडे विचार मंथन करूयात.
माझ्या मते, 'तळी भरणे ' म्हणजे थोडक्यात घरासाठी भरभक्कम उत्पन्न उभे करणे.
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धति होती कारण त्या काळी सर्व कुटुंब प्रमुख एकत्रितपणे तळे भरू शकत होते. कारण सर्व कुटुंब हे एकाच गुरुप्रणित मार्गावर चालणारे होते. व सर्वांची बुद्धी ही मल्हार गडावरील पितळाच्या कासवाईतकी मोठी विशाल प्रगल्भ अनुभवसिद्ध व दयाळू होती.
आजच्या स्थितीत सर्वच माझे माझे करतात. रेडीमेड तळ्यावर पाणी भरतांना देखील भांडणे करतात.
अशी लोक एकत्र आली की एकमेकांच्या तब्येती खराब करतात.
त्यामुळे अशा स्थिती मध्ये ' प्रत्येकाने आपापले तळे आपणच भरावे, आपापले तळे आपणच राखावे आणि आपापले तळ्याचे पाणी आपणच चाखावे.' अशी व्यवस्था होत गेल्याने मनाचे आणि शरीराचे विशालत्व तसेच आयुमर्यांदा सोबत दिव्य कला संस्कृतीचा नाश होतांना दिसतो.
संशय सुडबुद्धी पेरली जात असल्याने आत्म्याचा खेळ खंडोबा झालेला बघून वाईट वाटते.
बुद्धि वादाच्या नावाखाली झुंडशाही, दंडुकेशाही, चाटुशाही उदयास आलेली व स्थिर झालेली स्पष्ट दिसत आहे.
" वसुधैव कुटुंबकम " हे आजच्या घडीला केवळ संन्सासांचे आणि आंतराष्ट्रीय नेत्यांचे घोषवाक्य झालेले आहे.
पण प्रत्यक्षात , " शास्ता न ऊरे या महि, तत्वांचा लवमागमुस न दिसे धुंडुन सत्वातहि " हा प्रत्येकाचा स्वानुभव आहे.
अशा परिस्थितीत जो तो आपापल्या स्वामींशी ईमान राखून जगत आहे. ही वस्तुस्थिती आहे.
परिपूर्णतेचा अमृतकुंभ देणारे सद्गुरू आयुष्यात येईपर्यंत आपणांस " घे वडा, घे वडा " करीत घेवड्याच्या वेलीवर उदरनिर्वाह करावा लागतो हे धादांत सत्य आहे.
पुढे सुवर्णयुग, सामयुग, सतयुग येण्याची वाट पाहणारे सध्या वर्गणीवर जगत आहेत.
शेवटी ज्ञानेश्वरांनी पसायदानात सांगितलेले खरे होत आहे.
" जो जे वांझिल, तो ते लाहो ! प्राणिजात ! "
या प्राणीजातीच्या सर्व वासना भोगुन संपल्यावर जेव्हा खरी पवित्र मानवजात येईल तेव्हाच ' वसुधैव कुटुंबकम् ' शक्य आहे पण त्यासाठी " ऑल ईज वेल, बट देअर इज नो वॉटर इन वेल" ही सध्याची स्थिती निकाली निघणे आवश्यक दिसते.
|| ॐ शांतिः ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा