*तुम्हाला कोणते बंधन आवडते ? रक्षाबंधन की राखी बंधन*
" वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् "
रामरक्षेमधील ही ओळ आहे.
वज्र म्हणजे कठीण कडक ! पंजर म्हणजे हाडांचा सापळा ! नामेदं म्हणजे नामाला सरस्वतिचे सामर्थ्य देणारा ! यो म्हणजे मुक्तीसाठी प्रार्थना करणारा !
मुमुक्षु जनांना, संतांना सुद्धा श्रीरामरक्षेचे कवच रक्षण देते.
असा याचा ढोबळपणे अर्थ काढता येईल. त्यामुळे राखीबंधन पेक्षा रामरक्षाबंधन श्रेष्ठ आहे.
अग्नी मध्ये हाडे जेव्हा जळतात तेव्हा त्यांची राख होते.
राख नदीत पुढच्या प्रवासाला पाठविली जाते. किंवा
भांडे घासायला वापरली जाते.
भौतिक शरीराचे सार म्हणजे हाडे. हाडातून रक्त तयार होते. रक्तातून मज्जा आणि विर्य हे जीवनावश्यक घटक तयार होतात.
लग्नात अग्नी भोवती ७ फेरे मारतात, सात जन्मात हाडे वासना विरहीत दिव्य पवित्र व्हावेत अशी अपेक्षा असते.
अग्नीने हाडे शुद्ध होतात. त्यांच्या अस्थी होतात. " अ " हे भगवंताचे परमपवित्र अभंग अक्षर आहे.
जगाने ज्ञानेश्वरांना भयंकर यातना दिल्या तरी पसायदानात ज्ञानेश्वरांनी जगाचे कल्याण चिंतिले कारण त्यांच्या शरीराच्या हाडांमध्ये अमृतानुभव होता.
मन आणि बुद्धी ह्या जन्मातच पवित्र होऊ शकतात परंतु
अनोकोनेक जन्मानंतर हाडे पवित्र होतात. पवित्र हाडे जाळली जात नाही. त्यांना समाधीत ठेवतात कारण ते समाधीतून पण आशीर्वाद देतात, शिकवतात आणि रक्षा करतात.
जे हाडे दिव्य पवित्र असतात त्यांची समाधी बांधली जाते कारण ते रक्षा करतात तिथे लोक आशीर्वाद घेण्यासाठी येतात. बाकी इतरांची कबर, मजार, थडगे किंवा राख बनवली जाते.
जे लोक संत बनू शकत नाहीत मनात आणि शरीरातील हाडात राग व्देष दुःख जपून ठेवतात, इच्छा जपून ठेवतात. त्यांची राख नदीत पुढ्च्या जीवन शिक्षण प्रवासाला पाठवली जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा