वातावरण वास्तु सर्व काही बघून मी भारावून गेलो होतो.
नोटीस बोर्ड वाचून काढत होतो. वाक्यावाक्यात शॉर्ट फॉर्म वापरलेले दिसत होते. मुख्य सज्जेत प्रवेश केल्या केल्या तेथे उभ्या असलेल्या काही मुलांनी मला बोलावले. माझे बारावीचे मार्क विचारले. मी मोठ्या अभिमानाने माझे मार्क सांगितले. तेव्हा मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाने मला विचारले. " नाम क्या है बे तेरा ? " . मी सांगितले " प्रशांत मोरे " .
तेव्हा तो म्हणाला " बाप का नाम नहीं है क्या ? "
आता मात्र मी चिडलो होतो ! कॉलेज मध्ये रॅगिंग किंवा आर्थिक परवड होवू नये म्हणून मी मुद्दामुनच पुण्याचे नामांकित कॉलेजेस सोडून धुळ्याच्या घराजवळील कॉलेजात अँडमिशन घ्यायचे ठरविले होते. तरीही व्हायचे ते झालेच ! त्याच्या कडक बोलण्याने वागण्याने माझा अहंकार दुखावला गेला होता. आपली गरीबी आणि मध्यमवर्गीय परिस्थितीला मी मनातल्या मनात कोसू लागलो होतो. घरात कोपर्यात बसून इंजिनियरिंगचे पुस्तक धरून डोळे फोडून फोडून त्यात माझ्या प्रश्नाचे उत्तर शोधू लागलो होतो. वडील माझी सर्व मनस्थिती समजून होते. त्यानाही समाजातील, परिसरातील आणि त्यांच्या ऑफिसातील धक्क्यांनी बेजार करून ठेवलेले होते. ते मला कडक आणि भावनाशुन्य वाटत. त्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या बोलण्यावर माझा चटकन विश्वास कधी बसत नसे. एकदा मला परिक्षेला जातांना वडीलांनी मला विचारले " पेन घेतला आहे ना ? " मी " हो " म्हणालो. तेव्हा वडील हळूच पुटपुटले " ओम नमः शिवाय " ! मी ऐकल्या न ऐकल्या सारखे करून परिक्षेला निघून गेलो.
सनातन शास्त्र आणि मूलभुत विज्ञान प्रमाण आहेत की,
विश्वातील एनर्जी तयार होत नाही आणि नष्टही होत नाही ! केवळ रुपांतरीत होत राहते. तिला " ई " असे म्हणतात.
मन जेवढे मोठे होते विस्तिर्ण होते सर्वसमावेशक होते तेवढे ते हलके फुलके प्रसन्न राहते. त्या मोठ्या मनाला " वा " असे म्हणतात.
ह्या एकामेवाव्दितीय अफाट एनर्जीला ( ई ) जर कोणी मॅनेज किंवा कंट्रोल करण्याची हिंमत ( श ) जर कोणी दाखवत असेल तर तो सर्वच बाबतींत गुरु म्हणजे मोठा असला पाहिजे ! मोठ्या मनाचा ( वा ) असला पाहिजे !
म्हणूनच की काय त्याला " शीवा " म्हणतात. ज्याच्या जीवावर आपण मुक्ती ( य ) फ्रिडम उपभोगू शकतो !
लाईफ, जीवन, पाणी पृथ्वीवर केवळ त्याच्यामुळे आहे !
त्याचे नाव आणि त्याचा अनुभव हेच तर ' जीवन ' आहे !
माझ्या वडीलांनी मला " ओम नमः शिवाय " हे नाव सांगितले. लहान भावाजवळ गेलो तर तो म्हटला होता " बस नाम ही काफी है ! "
मी माझ्या आयुष्यात खुप सार्या गोष्टी स्वतः आभ्यासून बघीतलेल्या आहेत. पण खरं सांगू , एनर्जीला बघता येत नाही त्याचप्रमाणे तिला मॅनेज करणाऱ्यालाही बघता येत नाही ! कारण मन बुद्धी विचाराच्या पलिकडील गोष्टी कधीही दिसत नाहीत. काही गोष्टी आपबिती असतात. स्वतःचे अनुभव स्वतः साठीच असतात. त्याचा बाजार मांडायचा नसतो. परंतु आज मला हे सांगावेसे वाटते की, आज माझे लग्न मुलबाळ इंजिनिअरीग डिझाईन मधील अनुभव स्वतःचे डिझाईन ट्रेनिंग आणि सर्व्हीसचा बिझिनेस सर्व काही उभे करून झाले आहे. ते केवळ आपल्या बापाचे नाव माहित असल्यामुळेच !
Good
उत्तर द्याहटवा