कुलदेवी ही सगळ्या कुळाची देवी म्हणजे जन्म देणारी व शिकवून मोठे करणारी आई असते ! आपल्या कुळामध्ये संपूर्ण खानदान समाविष्ट असते. त्यामुळे कुळदेवीच्या आरतीला संपूर्ण खानदान एकत्र येते. कुलदेवी आपल्याला सक्षम बनविण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान पुरवते.
आपली वैयक्तिक इष्टदेवी मिळविण्यासाठी माणुस कुलदेवीची साधना आराधना करतो व इष्टदेवी प्राप्त झाल्यावर चारी पुरुषार्थ मिळविण्यासाठी व सिद्ध करण्यासाठी माणूस इष्टदेवीची प्रार्थना करतो.
इष्टदेवी ही आपली पर्सनल देवी असते ! म्हणजे आपले अनिष्टापासून रक्षण करणारी पत्नी असते.
इष्टदेवी आपल्याला सक्षम राहण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती पुरवते.
कुलदेवतेचा मंत्र आपण ' श्री कुलस्वामिनी मातायै नमः ' असा म्हणतो.
मात्र,
इष्ट देवीचा मंत्र आपण ' सौ इष्टदैव्ये नमः ' असा म्हणतो.
लग्नात नाव घेण्याची प्रथा आहे. ती प्रथा म्हणजे आपली इष्टदेवीचे नाव तुम्हाला पुढील आयुष्यात चारी पुरुषार्थ गाजविण्यासाठी मदत करणार आहे याची नांदी असते.
कुलदेवीचा मानसन्मान वर्षातुन एकदा मुळ स्थानी जावून अकरा अलंकार पुरणपोळीचा नैवेदय देवून करतात. त्याचप्रमाणे, इष्ट देवीला खणनारळ साडीचोळी तसेच गोडधोड खावू घालून मनोरंजन करून प्रसन्न ठेवले जाते.
आपल्या शरीराच्या विभिन्न पेशी जश्या आपल्या शरीराचा अभिन्न हिस्सा असतात त्याचप्रमाणे आपले शरीर हे श्री स्वामी समर्थांच्या शरीराचा अभिन्न हिस्सा आहे.
पुरुषांसाठी आपली इष्टदेवी, आपली कुलदेवी हा श्री स्वामी समर्थांनी दिलेला आशीर्वाद आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी आपला इष्टदेव कुलदेव हा श्री स्वामी समर्थांनी दिलेला आशीर्वाद आहे.
घरातील प्रत्येक व्यक्तीने श्रीस्वामी समर्थांची योग्य पद्धतीने व योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली सेवा केली तर प्रत्येकाला आपापल्या कुलदेवी तसेच इष्टदेवी प्रसन्न करण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता बळ प्राप्त होते.
बॅक चालू राहण्यासाठी बॅकेत पैसा खेळता राहणे जरूरी असते. त्याप्रमाणे, नदी जीवंत असणे तसेच नदीतील पाणी शुद्ध राहण्यासाठी नदीतील पाणी वाहते असणे जरूरी असते.
तसेच, ज्याप्रमाणे, शरीरातील रक्त शुद्ध राहण्यासाठी शरीरात रक्त खेळते राहणे गरजेचे असते. त्याप्रमाणे आपण श्री स्वामी समर्थांची सेवा, श्रीगुरुची सेवा करत राहणे जरूरी असते. कारण अशाने आपली श्री कुळदेवी व सौ इष्टदेवी प्रसन्न राहते. आपले वैयक्तिक जीवन शांती समाधानाने जगण्यासाठी सेवा करणे आवश्यक असते.
संन्यास धारण केलेल्या व्यक्तिसाठी इष्टदेवी रामस्वरूप असून कुलदेवी कृष्ण स्वरूप असते. व संन्यासी व्यक्ती स्वतः हरि स्वरूप झालेला असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा