कर म्हणजे बॉडीस्टार ⭐ जो आपल्या भ्रुकुटी मध्यावर असतो !
उ म्हणजे त्याच्याशी असलेले असोसिएशन !
ष म्हणजे शरीर
ण म्हणजे आपला वेळ
कर +उ + ष + ण = कृष्ण
जे शरीर आपला वेळात वेळ काढून आपल्या शरीराला आपल्या भ्रुकुटी मध्यावरील बॉडीस्टार प्रकाश बिंदुवरील योगध्यानाला नियमितपणे लावते , ती व्यक्ती कृष्ण या संज्ञेस पात्र बनते.
जो व्यक्ती शारीरीक आणि मानसिक दृष्टया निरोगी आहे.
आनंदी सुस्वभावी निस्वार्थी योगी आहे, तोच व्यक्ती पॉझिटीव्ह राहू शकतो आणि सर्वांना हिलींग देवू शकतो ! जो सगळ्यांचे कल्याण चिंततो , त्याचे स्वतः चे कल्याण होवून त्यााची विघ्ने नाहीशी होतात त्यामुळे तो शांतपणे ध्यान करू शकतो ! जो नियमित ध्यान करतो त्याच्यासाठी सगळे जग आपलेच असते. तो सगळ्याचे कल्याणच करतो. ध्यान तिच व्यक्ती करू शकते जी स्थिर शांत आणि स्वतःमध्ये पूर्ण आहे. अशाप्रकारे जी व्यक्ती भ्रुकुटी मध्यावर ध्यान करण्यात तत्पर आहे , ती व्यक्ती ' कृष्ण ' या संज्ञेस पात्र ठरते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा