राजकारण हे एक करिअर आहे. ज्यात कमालीची स्पर्धा असते. प्रत्येक करिअर चालविण्याचे तसेच टिकविण्याचे काही मुलभूत सुत्रे असतात.
नॅशनल लिडर, इंटरनॅशनल लिडर, बिझीनेस लिडर, राजकारणी, सेलेब्रीटी आपल्या फॅनक्लबवर जगत असतात. त्यामुळे त्यांचे लाईक मिळविणे आणि सतत लाईमलाईटमध्ये रहाणे हा त्यांच्या स्वतःच्या करियर प्रोटोकॉलचा एक महत्वाचा भाग असतो. बरेचसे लिडर्स असेही आढळतात, जे पब्लीक मॉबमध्ये प्रत्यक्ष येण्यापेक्षा दृकश्राव्य माध्यमांचा वापर तसेच लिफलेट बॅनर होर्डिंगचा वापर करणे जास्त पसंत करतात.
जसे आपण लग्न समारंभात न टाळता उपस्थित राहतो तसेच परिवार, घर, समाजातील मिटींग शक्यतो टाळत नाही. त्याचप्रमाणे राजकीय नेते मॉब मेंटॅलिटी टाळत नाहीत.
पब्लीक लिमिटेड बिझीनेस जसे शेअर होल्डर पब्लीकच्या नोटवर जगत असतात. तसे, राजकिय नेते पब्लीकच्या वोटवर जगत असतात.
जिथे बाबा बाबी बुवा असतात, तिथे पब्लीकची गर्दी असते. अशा ठिकाणी भाषण करायला चान्स मिळाला नाही तरी निदान सलाम नमस्ते तर होवूनच जाते !
त्यामुळे राजकीय नेत्याचे सुत्रच असते......
जिथे गर्दी , तिथे आमची वर्दी !
जिथे बम भरून पब्लीक , पैसा न चारता , गोळा झालेली असते. तिथे पुर्ण वोट बॅक हाती गवसते.
त्यामुळे,
जहॉ बम् , वहाँ हम !
नंतर पुढे त्या बाबा बाबी किंवा बुवाला अटक झाली तरी मंत्र्यांचे काहीही वाकडे होवू शकत नाही.
विद्यार्थी दशेतील मुलांनी ह्या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करावे व आपले स्वतःचे करीअर घडविण्याकडे लक्ष केंद्रीत ठेवावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा