भिकेचे सिक्रेट !


आपल्याकडे असलेल्या इंटेलिजन्सचा अतिरिक्त स्वार्थी आणि विकारी वापर केल्यामुळे राजाने ज्या लोकांना निष्काशीत केले, असे काही लोक असतात किंवा सत्ताधिशा ला जे आवडत नाहीत, असे लोक काही लोक असतात. जे आपल्या निष्काशीत बहिष्कृत अवस्थेतदेखील पुन्हा आपल्या इंटेलिजन्सची चड्डी शिवून त्यापासून पुन्हा आपले एम्पायर उभे करण्याचा प्लॅन करत असतात.

भीक मागायला देखील औकात लागते. जे स्वतःला ज्ञानदेव, साईबाबा किंवा दत्त म्हणून प्रुव्ह करू शकतात, ते लोक भीक मागतील, तर सारी दुनिया स्वतःहून त्यांना भीक देईल.
ह्याच कारणाने, ज्या वेळेला रस्त्यावर तुम्हाला कोणी भिकारी देवाच्या नावाने, देशाच्या नावाने, वर्गणी मागतांना भेटेल किंवा देवाच्या धर्माच्या समाजाच्या नावाने भीक मागताना भेटेल, तेव्हा तुम्ही त्याला रस्त्यावर पडलेले चार कागदाचे गोळे आणि प्लास्टिकच्या पिशव्या बाजूला करायला सांगा. त्या बदल्यात मी तुला दहा रुपये देईल असे सांगा. तर ते करतात का ? हे तुम्ही चेक करा. 

दुसरी गोष्ट अशी की, जर त्यांनी तसे केले, तर त्यांना तुम्ही हापूस आंबा किंवा बिस्कीटचा पुडा किंवा वडापाव किंवा जेवण खाऊ घालायची इच्छा व्यक्त करा. तेव्हा ते म्हणतील की, मला वेळ नाही. तुम्ही पैसे म्हणजे भीक मला द्या. 
थोडक्यात, त्यांना अन्न नको, तर पैसे पाहिजे. का ? कारण की, त्या पैशातून त्यांना स्वतःची आत्मनिर्भर पद्धतीची इंटेलिजन्सची चड्डी शिवायची आहे. 

ज्याप्रमाणे तुमची चड्डी, त्याच्या चड्डीला मॅच होणार नाही. त्याप्रमाणे, तुमचे इंटेलिजन्स आणि त्याचे इंटेलिजन्स मॅच होणार नाही. 

तुमच्या शरीराची ठेवण आणि बांधणी ज्या प्रकारच्या संस्कारातून झाली आहे , त्याच प्रकारच्या संस्कारातून समोरच्या शरीराची बांधणी झालेली नाही. त्यामुळे त्याच्या शरीराला ज्या प्रकारच्या अन्नाची सवय आणि अन्न पचवायची सवय झाली आहे, त्या प्रकारच्या अन्नाची सवय आणि ते पचवायची सवय तुमच्या शरीराला नाही. 

शरीर हे अनेक पेशी समुहाला रिप्रेझेंट करत असते. त्यामुळे एक व्यक्ती भिक मागत आहे, त्यावेळी भलामोठा पेशीसमुह भिक मागत असतो. कायमस्वरूपीची सोय करण्यासाठी आत्मनिर्भर बनणे त्याला आवश्यक असते. त्यामुळे त्याला मुद्रा, म्हणजे पैसा, म्हणजे चलनी स्वरूपात मदत हवी असते. ही मदत मागण्याची पद्धत फार पुरातन आहे. 

परंतु ही मदत मागण्याची पद्धत नीतीला धरून आहे की, नाही. हे समजणे फारच कठीण असते. दुसरी गोष्ट अशी की, ज्या लोकांकडे स्वतःकडेच पैसा नाही. त्या लोकांकडे भीक मागणारे जास्त येतात. कारण की, ज्या लोकांकडे भरपूर पैसे आहेत. ते तर हेलिकॉप्टर, विमान आणि हाय स्पीड कारने पळून जातात.

विजयी प्रत्येकाला व्हायचे असते. अगदी भिकाऱ्याला सुद्धा ! आणि प्रत्येकाकडे स्वतःचा विजय प्राप्त करायचा प्लॅन देखील असतो. परंतु त्याला पैशाचे आणि ताकदीचे पाठबळ असणे आवश्यक असते. साधन संप्पत्ती असल्याशिवाय केवळ इंटेलिजेन्स आणि अनुभव वापरून व्यक्ती आत्मनिर्भर होवू शकत नाही. 

इंटेलिजेन्स असलेले, पण साधन संपत्ती नसलेले लोकांची एक कॅटॅगिरी असते. व साधन संप्पत्ती असलेले, पण इंटेलिजेन्स आणि अनुभव नसलेले लोकांची एक वेगळी कॅटॅगिरी असते, अशी दोन कॅटॅगिरी समाजात असतात. या दोन्ही कॅटॅगिरी जेव्हा, एका सिस्टीममध्ये जोडले जातात, तेव्हा ती एक कंपनी तयार होते.

बाह्य जगतात, भिकाऱ्यांचा एक प्रकार मवाळ हिन-दीन गरीब स्वरूपाचा असतो. 
कलीयुगात, वेळकाळ आणि मौका बघून आपली भीक साधणारा दुसरा प्रकार असतो. 
आणि,
सत्ता काबिज करून, भिती दाखवून विमा हप्ता, टॅक्स, खंडणी, वर्गणीच्या स्वरूपात भीक मागणे. हा शिकारी-भिकाऱ्यांचा भीक मागण्याचा तिसरा आणि इंटेलिजेन्ट प्रकार आहे. 

अंगप्रदर्शन, वस्तुप्रदर्शन, वास्तुप्रदर्शन, वनराईचे प्रदर्शन करून लोकांना बोलवून धंदयाचा गल्ला गोळा करणे व लोक परत घरी परततांना रस्ते अडवून भीक, वर्गणी, तिकीट मागणारे धंदे, काही ठिकाणी ऑफिशिअल असतील. तसेच, समोरच्या व्यक्तीच्या मनात शंका घालून करून भीक, वर्गणी, तिकीट मागणारे धंदे देखील, काही ठिकाणी ऑफिशिअल असतील. जेव्हा हा प्रकार मोठ्या प्रमाणात अनुभवास येवू लागतो. तेव्हा सत्तेत भिकारीची टोळीचे संख्या पुन्हा वाढलेली आहे, असे समजावे.

जेव्हा परकीय लोकांचे आक्रमण होते, तेव्हा ते पहिले आपल्या सत्ताधिशाची चड्डी नष्ट करतात. अशावेळी, मग सत्ताधिशाला पुन्हा आपली चड्डी विणावी लागते. अशी ही इंटेलिजेन्सच्या चड्डीची कहाणी आहे. 

शुकमुनीसारखे श्रीकृष्णाचे दिगंबर भक्त चड्डीच घालत नाहीत. दत्ताला चड्डी जिर्ण झाल्यावर अनसुयेच्या घरी जन्म घ्यावा लागतो. हनुमंताची चड्डी मात्र कोणीच नष्ट करू शकलेले नाही, असे म्हटले जाते. 

जे स्वतःला केवळ भक्त समजतात, त्यांनी स्वतःचे आत्मपरिक्षण करावे की, आपल्या शरीरमनबुद्धीमध्ये त्या देवतेचे एक टक्का देखील गुण उतरले आहेत का ? जर नसतील, तर तुम्ही खोटारडे आहात, किंवा ढ-गोळे आहात. व वाईट मौत मरणार आहात. 
जर आपण शुकमुनी किंवा हनुमान आहोत, असे प्रुव्ह करता येत नसेल, तर निदान आपल्या भिकेच्या सवयीवर, भुंकण्यावर आणि भुकेवर लौकीकगुरुने, वाढलेल्या शरीराने, सत्ताधिशाने, मालकाने, अधिकाऱ्याने, लौकीकबाबाने कंट्रोल करावा, अशी मनातून प्रजेची अपेक्षा असते.

# भिकेचे सिक्रेट ! 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

' एक ' म्हणजे नक्की काय ?

साईबाबांनी ' सबका मालिक एक ' असे म्हटले आहे. तर हा ' एक ' म्हणजे नक्की काय ? याबाबत आपण विचार करायला हवा. ' एक ' ह...

एकूण पृष्ठदृश्ये :