वरील चार शब्द इतिहास घडवणारे आहेत.
कसे ? ते आपण थोडक्यात बघूया !
' पुणे तेथे काय उणे ? ' असे म्हणतात.
' पुणे ' म्हणजे ध्यान सरस्वती ! ज्याच्याकडे ध्यान आणि सरस्वतीची किमया आहे, त्याला संतुष्टी तृप्ती प्राप्त होते व आनंद प्राप्त होतो. सच्चिदानंद स्वरूपाचा आनंद प्राप्त झाल्यावर त्याला मिळवण्यासारखे काहीच बाकी राहत नाही. म्हणून पुण्यभूमीत जो आला, त्याची निगेटिव्हिटी नष्ट होते, या अर्थाने हा वाक्प्रचार बनलेला आहे.
' पाहुणे ' म्हणजे, निगेटिव्हिटीकडे सतत बघणारे ! बाह्यदृष्टीचे लोक ! बाहेर दृष्टीच्या लोकांना ध्यान करणे माहीत नसते. सरस्वतीचा अनुभव नसतो. त्यामुळे वस्तू आणि व्यक्ती बघण्यामध्ये त्यांना आनंद शोधावा लागतो. परंतु तो आनंद मृगजळासारखा कधीच पूर्णपणे संतोषाला पोहोचवत नाही व तृप्तता कधीही होत नाही. अशा टाईपचे अतृप्त, चंचल, बाह्यगामी, बाह्यदृष्टी असलेले जे लोक असतात, त्यांना ' पाहुणे ' म्हणतात. व अशा पाहुण्यांना नेहमी आपल्याला त्यांच्या गणतव्यापर्यंत पोहोचवणे, हे कार्य करावे लागते. त्या कार्याला ' पाहुणे पोहोचवणे ' असे म्हणतात. ' पाहुणे पोहोचवायला गेलो होतो ! ' हा वाक्प्रचार या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
असंतुष्टता ही एक ' आग ' आहे. जी आपल्याला आतून अतृप्ततेची भावना म्हणजे, आपल्यामधील काहीतरी वस्तूची, व्यक्तीची, शक्तीची, उणीव आहे. असे जाणीव करून देत असते. व ही आग अंतर्बाह्य संपूर्ण जगात व्याप्त आहे. ज्या लोकांना बाह्यदृष्टी अधिक आहे, त्यांना ही आग शमवण्यासाठी ' फिरणे ' अपरिहार्य ठरते. ही ' आग ' हँडल करणे, हे प्रत्येक ' बाह्यदृष्टी ' म्हणजे, डोळे असलेल्या व्यक्तीला अपरिहार्य ठरते. कारण की, जोपर्यंत तो पूर्णपणे समाधी अवस्थेतील सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त होऊन विठ्ठलासारखा स्थिर, बुद्ध आणि देहरहीत चैतन्यमय होऊन जात नाही. तोपर्यंत ही ' अंतर्बाह्य आग ' शमन करण्यासाठी त्याला ' क्रिया आणि कार्य ' करत राहावे लागते. त्यामध्ये पुण्य करणे, आणि पाहुणे पोहोचवणे, हे दोन्ही कार्यदेखील अंतर्भूत आहेत.
' वाडेश्वर ' म्हणजे, घर बंगल्याचे यजमान मालक लोक ! या यजमान लोकांना आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना तृप्त करण्यासाठी, मुख्यत्वे अन्न खाऊ घालणे, पाणी पाजणे व मनोरंजन करून त्यांना शांतीचा अनुभव करून देणे, क्रमप्राप्त असते. परंतु जास्त दिवस झालेल्या पाहुण्यांना वाड्याबाहेर काढण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे क्लुप्त्या असतात. वाड्याच्या मालकीचा ताबा स्वतःकडे ठेवून, आपले पाहुणे पोहोचवत राहणे, याची त्यांना सवयच लागते !
काही वेळा वाड्यामध्ये खूप सारी प्रजा निर्माण झाली व सर्व पुण्यप्रजा ही वाडेश्वराला डोईजड झाली, तर वाडेश्वराला त्या प्रजेला वाड्याबाहेर काढण्यासाठी, त्यांचे पुण्य नष्ट करून, त्यांना पाहुणे बनवावे लागते. म्हणजे, त्यांचे ध्यानसमाधी आणि साधना बंद कराव्या लागतात, व त्यांना बाह्यदृष्टीमध्ये ठेवून, त्यांना सतत जगातील आग विझवण्याच्या कामावर म्हणजे, मोहिमेवर पाठवत राहावे लागते.
वाडेश्वराने आपल्या प्रजेला सतत जगभर असे घुमवत ठेवले व आपल्या वाड्यात स्थान दिले नाही, किंवा स्वतःचा वाडा बनवण्यासाठी प्रजेला आत्मनिर्भर देखील केले नाही, तर ते पाहुणे मनातून दुखावतात. कारण एकेकाळी ते ह्या वाड्यातच जन्मलेले असतात व वाड्यासाठी त्यांनी खूप सारे योगदान देखील केलेले असते. वाडा उभारण्यासाठी त्यांनी खूप सारे श्रम आणि वेळ खर्च केलेला असतो. अशी दुखावलेली पाहुणे मंडळी कधी कधी वाड्यावर चाल करून येतात व वाडेश्वराला कंटाळून वाड्यासह जाळून टाकतात. ही उदाहरणे पुण्यात झालेली आहेत. शनिवार वाड्यातला लंडन पर्यंत गेलेला पाहुणा, भुकेपोटी ब्रिटिश बनून शनिवार वाड्यावर चाल करून येतो, सर्व पगडीपेशव्यांचे पानीपत करून व शनिवार वाड्याला जाळून टाकतो.
बाहेरील आगीकडे एक वेळा आपण दुर्लक्ष करू शकतो, परंतु ' पोटाची आग ' जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत कधीही विझत नसते !
पाहुणे टाईपचे लोक बाह्यदृष्टीचे असतात. सतत बाहेर बघत असतात. लोकांच्या कॉप्या करत असतात. परंतु आतून हे वाढत नसतात. केवळ शरीराने आणि प्रॉपर्टीने वाढत जातात. त्यामुळे त्यांच्या अंगातली भूक ही सुद्धा त्यांच्या शरीराएवढीच वाढलेली असते. किंवा त्यांच्या प्रॉपर्टी एवढीच वाढलेली असते.
वास्तू देवाला देखील भूक असते व त्याची सतत शांती करत राहावी लागते. पाहुणे मंडळींना याचे ज्ञान नसल्यामुळे, प्रॉपर्टी तर त्यांच्या नावावर असतात, परंतु स्वतःची आणि प्रॉपर्टीची भूक ते सतत शिकारी करून शमवत आलेले असतात. आयुष्यात कधी एक अन्नाचा कण त्यांना उगवता आलेला नसतो. मात्र समुद्राभरचे मासे खाऊन ते अगडबंब झालेले असतात. व जगाला डोकेदुखी बनतात. भुकेपायी ते चाटुगिरी करण्यात माहीर झालेले असतात. नॉनव्हेज शिकारी कळपात जुडून राहणे, हे त्यांच्या अंगवळणी पडलेले असते. नवरे, बॉस, मालक शोधण्यात व शिकारीसाठी सावज शोधण्यात ते पटाईत असतात. एवढे सगळे कौशल्य असले तरी, त्यांच्या बॉस, गुरु आणि कंपनी मालकाकडे खावू घालायला काहीच उरले नाही, तर त्यांचे परत परत वांदे होत असतात. त्यामुळे वाडेश्वराला दरवेळी त्यांना कुठेनाकुठे लाँच करत रहावे लागते. ज्या वाडेश्वराला आपले पाहुणे लाँच करण्याची कुवत नसते, तो वाडयात बसून गुपचुपपणे पाहुण्यांना चावे घ्यायचे कामे करतो. म्हणजे, पाहुणे स्वतःहून निघून जातात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा