हस्तिनापुरचेच राज्य का हवे ?


एकाच गुरु कडून दोन वेगवेगळ्या शरीरांना ज्ञान प्राप्त झाले ! परंतु त्यातील एका शरीराची कंडिशन आनंदी सुखी आहे ! तर, दुसऱ्या शरीराची कंडीशन दुःखी वेदनामय आहे ! असे जेव्हा निदर्शनात येते. तेव्हा नक्की काय झाले आहे ? हे आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करू लागतो ! याला सिच्युएशनल ॲनॅलिसीस म्हणतात ! 

' हस्ती है पगली ' म्हणजे, ती व्यक्ती सुखी आहे, आनंदी आहे, हसत आहे आणि वेदना दुःख पासून अलिप्त आहे ! ती कोणत्याही चक्रात, बंधनात अटकलेली नाही ! भीती किंवा विकारांमध्ये अटकलेली नाही ! म्हणून ती हसत आहे !

कारण, त्या व्यक्तीने क्रियायोग शिकून घेतलेले आहे ! आणि ' होंगसो ' टेक्निकने ह्या सर्व प्रकारच्या दुष्टचक्रापासून स्वतःची मुक्ती करून घेतली आहे ! त्यामुळे, ती आनंदी झाली आहे, सुखी झाली आहे, आणि कष्टविरहित होऊन, पैसा अडका संपत्तीची मालिक झालेली आहे ! 

त्याउलट ' रोती हे पगली ' किंवा ' सोती है पगली ' ही अशी व्यक्ती आहे की, जी मेहनत जास्त करत आहे. परंतु चक्राबाहेर पडू शकत नाही. मेहनत करून ती जनावरासारखी झोपून जाते. परंतु तिला सत्ता संपत्ती जमीन अधिकार प्राप्त होत नाहीत. अशी ज्या व्यक्तीची कंडीशन आहे, तिला ' रोती है पगली ' किंवा ' सोती है पगली ' असे म्हटलेले आहे ! ( स्लीपर सेल कंडीशन ) 

सत्तासंपत्ती आरोग्य वैभव सुखशांती आनंद यावर प्रत्येक व्यक्तीचा अधिकार असावा. ही एक आयडियल कंडिशन आहे ! मात्र जीवनाच्या महाभारतात ' हस्ती है पगली ' ही व्यक्ती सुखी आहे ! म्हणजे, तिच्याकडे ' हस्तीनापुरचे राज्य ' उपलब्ध आहे ! 

मात्र ' रोती है पगली ' किंवा ' सोती है पगली ' ही व्यक्ती मेहनत जरी करत असली, तरी तिच्याकडे ' हस्तीनापुरचे राज्य ' उपलब्ध नाही ! ज्ञान, ध्यान, साधनेपासून त्या शरीराला परावृत्त करून, जनावरासारखे नोकरीवर कामावर लावले जात आहे, आणि त्याचे शरीर, त्याचे मन, त्याचा आत्मा, त्याचे ज्ञान, त्याची दृष्टी, त्याची बुद्धी, त्याची शक्ती क्षीण केली जात आहे ! प्रदुषीत म्हणजे ॲब्युज आणि अशुद्ध केली जात आहे ! त्यामुळे, तो हतबल होऊन प्रकृतीत प्रवृत्त झालेला आहे. आपले ज्ञान आणि शरीराचा वापर करून देखील या नष्टचक्रातून बाहेर पडण्यास असमर्थ होत गेलेला आहे ! व चक्राकार एनर्जी जनरेशन व्हिलमध्ये परत परत फिरण्यास प्रवृत्त झाला आहे ! त्याच्या मनशरीर बुद्धीवर बळजबरी केली जाते, पण तो काहीही करू शकत नाही ! यालाच कर्मबंधन, पापबंधन, भवबंधन असे म्हणतात.निर्णय घेण्याची क्षमता अधिकार ताकद नसल्याने तिला नोकर किंवा चोरासारखे जगावे लागत आहे ! सर्व आत्मज्ञान असून देखील शरीरदेहाच्या बंधनामुळे तिला ' रोती है पगली ' किंवा ' सोती है पगली ' असे आयुष्य प्राप्त झालेले आहे !
याउलट, जे धृतराष्ट्र आणि परिवाराचे सदस्य आहेत, त्यांना हस्तिनापुरच्या सुखात, वैभवात, भोगात, आपल्या मूळज्ञानाचा विसर पडलेला आहे. वृद्धापकाळी प्रदूषित आणि रोगग्रस्त झालेल्या देहाबाहेर पडण्यासाठी, आत्म्याची होणारी वेदनामय फडफड त्यांनी बघितलेली नाही ! किंवा मागील जन्मीच्या मरणाची याद ते विसरलेले आहेत आणि नवीन मिळालेल्या शरीराचे सुख उपभोगण्यामध्ये त्यांचे मन प्रवाहित झालेले आहे. त्यामुळे तारुण्यात लौकिक जीवनातील सुखऐश्वर्याचा आणि शरीरातील ताकदीचा आनंद घेण्यामध्येच त्यांना सध्या मजा येत आहे. आणि हसताना देखील आपल्याकडून पवित्र आत्म्यांवर अन्याय होत आहे, बळजबरी आणि बलात्कार होत आहेत, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे देखील श्रीकृष्ण भगवान त्यांच्यावर नाराज आहेत. आत्म्याचे पावित्र्य आणि गुरूने सांगितलेले पवित्रज्ञान त्यांना शुद्ध स्वरूपात टिकविता आणि सर्वत्र पसरवता देखील आलेले नाही. आणि ज्ञानाला धरून स्वतः वागता देखील आलेले नाही. मिळालेल्या होन्गसो टेक्निकचा वापर करून केवळ सत्ता धन संपत्ती राज्य त्यांनी गोळा करून ठेवलेले आहे. तसेच आपली प्रजा भरमसाठ वाढवून ठेवलेली आहे. त्यामुळे श्रीकृष्ण भगवान त्यांच्यावर नाराज आहेत.

श्रीकृष्णाचे असे म्हणणे आहे की, या ' रोती है पगली ' किंवा ' सोती है पगली ' शरीराने हस्तीनापुरचे राज्य प्राप्त करावे ! म्हणजे ती ' हस्ती है पगली ' या अवस्थेमध्ये येईल ! ती इतर शरीरावर अवलंबून न राहता, तसेच इतरांची नोकरचाकर किंवा कार्यकर्ता न बनता ' आत्मनिर्भर आणि मालीक ' होईल ! म्हणजे, तिला तिचे पूर्णत्व प्राप्त होऊन, ती आनंदी सुखी आणि चक्राकार दुःखमय मूर्खमेहनतीच्या दुष्टचक्रातून बाहेर निघेल ! रडारड शंका विकार वासना व त्या पाठोपाठ येणारे रोगराई आणि संकट यापासून देखील तिची पूर्णपणे मुक्तता होईल !

तळटीप : 
ज्याला वर सांगितलेले ज्ञान समजले नाही, पचनी पडले नाही, मूर्ख आणि वायफळ शब्दांची सर्कस वाटली, त्याने सर्वप्रथम हे समजून घ्यावे की, ज्ञान ही वादविवाद किंवा डिस्कशन करण्याची गोष्ट नाही. खरे ज्ञान सरळ स्वच्छ असते. ज्ञान तर ' त म्हणजे तपेलं ' या सारखी समजून घेण्याची गोष्ट आहे ! चिकीत्सक देढशहाण्या वासना सेवक लोकांनी हा केवळ एक अंधारातील पेटवलेल्या छोट्याशा चिमणीचा चटका आहे असे समजावे आणि चक्रात पाय अटकून सूर्याचा चटका खाऊन पूर्ण अनुभव आला की ह्या ज्ञानाची पूर्तता करून घ्यावी !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

लाईफचे ईनपुट आणि आऊटपुट !

लाईफ म्हणजे काय ? ते कसे बनलेले आहे ? लाईफ म्हणजे, जीवन ! लाईफ या शब्दातील, ला म्हणजे, अल्लाह ! ई म्हणजे, ईलाही ! फ म्हणजे, गोविंदा !...

एकूण पृष्ठदृश्ये :