वर्तमानकाळ जेव्हा पूर्णभूतकाळ होतो. तेव्हा ते पाप होते, हे आपल्याला लक्षात येते !
वर्तमानकाळात बाह्यदृष्टीने आपण बघतो. तेव्हा जे दिसते, त्याला जर आपण ' सी ' या नावाने संबोधिले ! तर, भूतकाळातील ते ' सी ' जर आठवले, त्याला ' सॉ ' नावाने संबोधिले जाईल. मात्र, पूर्ण भूतकाळाच्या दृष्टीत ते ' सीन ' असेल !
' सीन ' हे नेहमी पवित्र आत्म्याला दुःखदायक, वेदनादायक असते.
त्या वेदनेच्या पार कसे पडायचे ? हे माहीत नसल्याने, लोक ती वेदनाच एन्जॉय करू लागतात व त्यासाठी सिनेमा बघायला जातात. ' सीन ' बघणे अशाप्रकारे जिवनात अटळ होत जाते. ह्या ' सीन ' च्या बाहेर स्वतःहून कसे पडायचे ? हे समजून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! कारण त्याने आपल्या आत्म्याला वेदना होतात. त्या वेदना पुढे जावून काहीनाकाही कर्म आपल्याकडून घडवून घेतात. ते कर्म आपल्या नशीबी येते व आपला आत्मा त्या कर्मात गुंतल्याने, त्याचे पावित्र्य, शांती, आनंद हे स्वाभाविक गुण कमी होत जावून आत्मा देहबद्ध बंधनात अडकून अधीक दुःखीकष्टी होतो.
सहज पद्धतीने जर, प्रत्येक मनुष्याला ध्यान करणे जमू लागले, तर तो मनुष्य हया ' सीन ' प्रकारापासून, आणि त्याच्या आत्म्याला दुःखदायक असलेल्या वेदनेपासून बाहेर पडू शकतो !
ध्यान प्रक्रियेतून आपण, ' सीन ' या आत्म्याला वेदना देणाऱ्या, किंवा आत्म्याला नाराज करणाऱ्या प्रकारापासून केवळ बाहेर पडणेच शिकत नाही, तर आपल्या आत्म्याला आनंद देणे, आत्म्याला पवित्र करणे, देखील शिकतो !
' सी ' म्हणजे, दृष्टी !
' ची ' म्हणजे, इंटेलिजेन्स !
मॅट्रीक्समध्ये तुम्ही स्वतःची ' सी ' घेवून जातात आणि त्याचे ' सीन ' होवून जाते.
मॅट्रीक्समध्ये तुम्ही स्वतःची ' ची ' घेवून जातात आणि त्याचे ' चीन ' होवून जाते.
अशाप्रकारे तुम्ही मॅट्रीक्समध्ये अटकतात किंवा बळजबरीने अडकवले जातात.
' ता ' म्हणजे त्वचा असलेली शरीरे !
दृष्टीने, तुम्हाला केवळ शरीरे म्हणजे, ' ता ' दिसतात !
मात्र, त्यामागिल मॅट्रीक्स्चे इंटेलिजेन्स दिसत नाही.
मॅट्रीक्सच्या फोर्सपुढे तुमचे इंटेलिजेन्स कुचकामी ठरते.
त्यामुळे, मॅट्रीक्समध्ये सीता आणि चीता घेवून जाण्यात फायदा नाही.
' ग ' हे सनातन ज्ञान असून, ते गुरुदेवांकडून शिकून, त्याच्यापासून शरीरात त्यांची एनर्जी म्हणजे, ' गीता ' डेव्हलप करून, त्यानंतर मॅट्रीक्समध्ये जावे.
मॅट्रीक्स हे लाईफ आणि डेथ यांच्यापासून बनलेले आहे.
रा म्हणजे, लाईफ ! म म्हणजे, डेथ !
गणीती भाषेत याला १ आणि ० असे म्हणतात.
मॅट्रीक्समध्ये सीनेमा आणि चीनेमा बघायला जावू नये ! मॅट्रीक्समध्ये वावरतांना आपल्या सासुमावर लक्ष ठेवावे ! म्हणजे शरीराच्या श्वासावर लक्ष ठेवावे !
हनुमान रामराम म्हणत मॅट्रीक्समध्ये प्राण घेवून येतो आणि रामराम म्हणत प्राण घेवून जातो ! अशाप्रकारे तो मॅट्रीक्सच्या राम पॅटर्नशी अनुकुल असल्याने मॅट्रीक्समध्ये फसत नाही.
आयुष्यभर तेलपाणी करत ' मौत का कुँवा ' मध्ये आपली सायकल, बाईक आणि कार फिरवून उपयोग नाही. त्यापेक्षा आपले स्थान चक्राच्यावर सुरक्षित ठिकाणी स्थिर करणे जास्त महत्वाचे असते. असे आपले पूर्वजलोक दरवेळी आपल्याला गावची सर्कस दाखवून शिकवून गेलेले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा