ज्याला मन आहे, त्याला लाज वाटते.
मात्र, सृष्टीचक्राला मन नाही. केवळ नियम आहेत. ( कृष्ण )
ज्याला देह आहे, त्याला ताप जाणवतो.
मात्र जो कधी देहरूपाने जन्मलाच नाही, त्या आत्म्याला ताप नसतो. ( राम )
म्हणजे, मन आणि देह नसलेल्या आत्मशक्तीला दैहीक थकवाताप तसेच, मनोलज्जा नसते !
ज्ञानदेव ज्याचे वर्णन करीत आहेत. ते तापहीन राहून गर्भदान करते. ( म्हणजे, ते संतापरहीत, चीडचीडरहीत, थकावटरहीत आहे. ) आणि लांछनरहीत राहून प्रसव करते. ( म्हणजे, ते लाजलज्जारहीत, डागरहीत आहे. )
ज्ञानदेव म्हणत आहेत. " मार्तड जे तापहीन, चंद्रमा जे अलांछन, ते सर्वाहि सज्जन सोयरे होतु "
सूर्याचा ताप तेव्हाच जाणवतो जेव्हा तुम्हाला शरीर आहे आणि चंद्राचा डाग तेव्हाच जाणवतो जेव्हा तुम्हाला मन आहे.
' देहरहीत आत्म्याशी आणि मनरहीत सृष्टीशी ' एकरूप झाल्यावर, सूर्याचा ताप आणि चंद्राचा डाग जाणवत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःची समाधी सिद्ध करून, ध्यान करत सृष्टीचक्राशी एकरूप होऊन जा. व आत्मतत्वाशी एकरूप होऊन जा. म्हणजे, सृष्टीचक्राला अनुसरत आपल्या आत्म्याशी नाते जोडा. असे ज्ञानदेव सांगत आहेत.
आपल्या संस्कृतीतील सण वार व्रत वैकल्ये सृष्टीचक्राच्या अनुषंगाने बनविलेले असतात. म्हणजे, नकळतपणे आपण सृष्टीचक्राशी अनुकूल होत जातो.
' वाहन किंवा इंगळी किंवा साखळी किंवा रेल्वे किंवा गाडी किंवा विमान किंवा शीप किंवा यान ' म्हणजे, सतत आत - बाहेर किंवा सतत पुढे - मागे किंवा सतत येणे - जाणे करणारी गोष्ट !
मनाची इंगळी शुद्ध करणारा राम आहे !
बुद्धीची इंगळी शुद्ध करणारा कृष्ण आहे !
शरीराची इंगळी शुद्ध करणारा हरि आहे !
जे गुरू रामाला अधिष्ठान मानुन कार्य करतात, ते तुमच्या मनो आरोग्य दृष्टीने उत्तम असतात.
उदा. शंकर, हनुमान, गणपती, देवी इ.
मनाची इंगळी शुद्ध करणारा राम आहे !
बुद्धीची इंगळी शुद्ध करणारा कृष्ण आहे !
शरीराची इंगळी शुद्ध करणारा हरि आहे !
जे गुरू रामाला अधिष्ठान मानुन कार्य करतात, ते तुमच्या मनो आरोग्य दृष्टीने उत्तम असतात.
उदा. शंकर, हनुमान, गणपती, देवी इ.
जे गुरु कृष्णाला अधिष्ठान मानुन कार्य करतात, ते तुमच्या बुद्धीच्या आरोग्य दृष्टीने उत्तम असतात. उदा. दत्त, श्रीपाद श्रीवल्लभ, देव इ.
जे गुरु हरिला अधिष्ठान मानुन कार्य करतात, ते तुमच्या शरीराच्या आरोग्य दृष्टीने उत्तम असतात.
उदा. श्रीस्वामीसमर्थ. इ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा