धर्म का रास्ता क्या है ?
धर्माचा मार्ग कोणता ?
धर्म म्हणजे काय ?
धर्म माझ्यासाठी नक्की काय आहे ? आणि मी धर्माच्या मार्गावर चालणे म्हणजे, नक्की काय ?
ह्या गोष्टी मला सतत माझ्या मनामध्ये सतावत होत्या. त्याबद्दल मी ध्यान चिंतन करून बघितले. आणि ज्या काही पौराणिक रामायण महाभारत सारख्या कथा आहेत, पुराण कथा आहेत, त्या अभ्यासल्यानंतर मी याबाबत एक सारांश बनवण्याचा निर्णय घेतला.
आपण दुसऱ्यांना धर्म शिकवू शकत नाही. मात्र आपण स्वतः धर्माच्या मार्गावर चालू शकतो. हे देखील मी स्थळ - काळ - परिस्थिती - इतिहास - भूगोल - विज्ञान-तंत्रज्ञान शिकल्यानंतर व त्यात जगल्यानंतर समजलो होतो.
' ध ' म्हणजे,
स्वतःमध्ये धरून ठेवणे.
' र ' म्हणजे,
स्वतःच्या अंगामधला लाईफ/जीवन फोर्स !
आणि
' म ' म्हणजे,
स्वतःच्या अंगामधली क्रिएटिव्ह/फर्टाईल पावर !
असे सारस्वत निष्कर्ष समजून घेवून, मी माझ्या पद्धतीने, माझ्या स्वतःच्या धर्माची स्पष्ट संज्ञा तयार केली. ती म्हणजे,
ज्या गोष्टीने माझी शारीरिक, मानसिक, जीवनी ऊर्जा वाढेल, ती गोष्ट करणे.
हा माझा स्वतःचा धर्म आहे.
ज्या गोष्टीने माझी क्रिएटिव्हिटी आणि माझी फर्टिलिटी वाढेल, ती गोष्ट करणे.
हा माझा स्वतःचा धर्म आहे.
त्याउलट, जी गोष्ट करून, माझी तसेच इतर लोकांची शारीरिक, मानसिक, जैविक जीवनीऊर्जा क्षीण होते, हतबल होते, अशक्त होते, संभ्रमित होते, अस्वस्थ होते, अशा सर्व गोष्टींना टाळणे, हा देखील माझा स्वतःचा धर्म आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा