जब तक नमक नही, तबतक चमक नही !


रुद्र अध्यायातील चमक पाठामध्ये, आपण अनेक गोष्टींची मागणी करतो. त्या सर्व जीवन आवश्यक असलेल्याच गोष्टी असतात. बरोबर ना ?

' नमे नमे  करणे ', म्हणजे, ' सृष्टी निसर्गचक्राला अनुरूप असलेले, परतफेडीची अपेक्षा नसलेले, निरपेक्ष स्वतःचे कॉन्ट्रीब्युशन करणे. त्याउलट, ' चमेचमे करणे ', म्हणजे, ' मला हे दया, मला ते द्या ! ', अशी मागणी करणे. 

नमे नमे न करता, केवळ चमे चमे करणाऱ्याला चष्मे लागतात. त्यामुळे मागणी करण्याआधी आपले कॉन्ट्रीब्युशन योग्य होते का ? याबाबत आभ्यास करण्याची गरज आहे.

देहधारी जीवास, जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी, त्या चमकमध्ये असतात. परंतु, जोपर्यंत नमक पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही चमक सेक्शनकडे वळू शकत नाही. हा रुद्र अध्याय वाचनाचा नियम आहे. त्यामुळे, आपण ' आहे त्याविषयी ' सर्वप्रथम ग्रेटफुल असणे. सगळ्यांना नमस्कार करणे. आवश्यक असते.

ब्लेसिंगस मिळवण्यासाठी, जीवनावश्यक असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी, सौंदर्य आणि चमक मिळवण्यासाठी, तुम्हाला परमेश्वर आणि देवीदेवतां असुरदैत्यापासून सर्व जीवजंतुंना नम्रपणे नमस्कार करावा लागतो. जगातील विश्वातील सजीव-निर्जिव पशुपक्षी ग्रहतारे नक्षत्र तसेच दुष्टदुर्जनांना, स्मग्लर-डाकू-दरोडेखोर-खुनी लोकांना देखील, त्यांच्यात सामील न होता, नम्रपणे नमस्कार करावा लागतो. त्याची एक विशिष्ट पद्धत आहे. त्या पद्धतीचे नाव आहे, रुद्राध्यायातील नमक !

नम्रता अनुभवाने शिकावी लागते. कारण, विनम्रता हा अनुभवांती तयार झालेला गुण आहे ! कारण, विनम्रता ही शिकवावी लागत नाही. आणि शिकवून येत नाही. मेहनत साधना करून स्वयंसिद्ध झालेला, आत्मनिर्भर व ताकदवान असलेला बुद्धिमान योगीच केवळ विनम्र राहू शकतो !

ज्याच्या मनबुद्धीत, पवित्र शुद्ध करणाऱ्या आगेपेक्षा, ' कार्बन कंटेन्ट असलेला ' धुराडाच जास्त आहे. त्याने शांतता धारण करून, कॅमेरा व बुरखाधारीदत्त बनुन, दुरूनच रुद्राध्याय पहावा. 

जंगली रमी खेळाऱ्याला डिस्क्लेमर सांगितलेले असते की, या खेळात आदत लागण्याची संभावना आहे. त्याप्रमाणे, सृष्टीशी जास्त प्रमाणात खेळ करणाऱ्याला, न सुटणारे व्यसन किंवा नाद लागायची संभावना असते. त्यामुळे, स्वतःच्या मुखावर नियंत्रण नसलेल्या, अनंतफंदी असलेल्या, स्वतःच्या मनमर्जीचा राजा असलेल्या, अनेक छंद असलेल्या व्यक्तीने, आणि विशेष करून ' जबाबदारी न घेणाऱ्या ' व्यक्तीने रुद्र अध्याय करू नये. करायची पाळी आलीच, तर व्यक्तीने, रुद्र अध्याय नेहमी, सात्वीक गुरुच्या आज्ञेनुसार आणि मार्गदर्शनानुसार केलेला बरा ! देह, मन, इंद्रीये, श्वास, डोळे यावर ज्यांचा ताबाच नाही. अश्या लोकांनी रुद्राअध्याय करण्याचा नाद करू नये. त्यांनी आपापला सौजन्य सहकाराचा सर्वोपरी भक्तीमार्ग अनुसरावा !
 
ज्या शिष्याच्या स्तुतीचे स्तोत्र, स्वतः गुरुदेवाने लिहीले. तो पृथ्वीचा गर्भदेव बनलेला, ज्ञानदेव सर्व प्राण्यांकडून  यातना-दुःख पावून सुद्धा, त्यांच्या बद्दल च-कार वाईट शब्द न बोलता, सर्व प्राणीजात सुखी व्हावी. यासाठी अनेक ज्ञानदायक मार्गदर्शक रचना करून, स्वतः देहत्याग करून समाधीत गेला. याला ' सोहम् ' अशी जबाबदारी घेणे म्हणतात. सृष्टीतील सर्वकाही मीच आहे. मीच सर्वांच्या भल्याबुऱ्यासाठी जिम्मेदार आहे. ' सोहम् ' अशी बिलॉगींगनेस असलेल्या, दिव्य रामराजबुद्धीने, समस्त प्रजेच्या निरामयतेसाठी रुद्राध्याय करावा. 

परिस्थिती स्थळकाळ अनुरूप असेल. देवाज्ञा असेल. तरच समजुन उमजून, विश्वात्मकबुद्धीने, करूणाकृपाप्रसाद प्रित्यर्थ्य, स्वानुभवाने शास्त्रकाट्याची कसोटी लावून, आपला अपूर्ण राहिलेला आभ्यास पूर्ण करून, सर्व शांतीसौख्य व आरोग्य बुद्धीने रुद्रअध्याय करावा ! थोडक्यात जबाबदारी घेतलेल्या, विश्वाचा राजा असलेल्या, शुद्धीबुद्धीने रुद्राध्याय करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

भीक आणि भिऊ !

भीक म्हणजे काय ? ' ई ' म्हणजे, ऊर्जा . ऊर्जेचे अनेक प्रकार माणसाने बनवलेले आहेत. त्यापैकी ज्या ऊर्जा पॉझिटिव्ह आहेत, पोषक आहेत, उत...

एकूण पृष्ठदृश्ये :