अंधा कौन ?


दोन टाईपचे डोळे असतात. 
एक असतात, लौकिक डोळे, आणि दुसरे असतात, अध्यात्मिक डोळे !

काही वेळेला अशी परिस्थिती असते की, आध्यात्मिक डोळे इतके जागृत असतात. की, लौकिक गोष्टी आणि व्यावहारिक गोष्टी किंवा बाह्यदृष्टी यांची जाणीवही नष्ट होऊन जाते. अशा परिस्थितीमध्ये बाह्यदृष्टीने किंवा लौकिक दृष्टीने तो व्यक्ती आंधळा असतो ! याउलट, काही लोक बिलकुल आध्यात्मिक दृष्टी नसल्याने किंवा आत्म अनुभूती नसल्याने, त्यांना केवळ बाह्यदृष्टी, लौकिकदृष्टी, व्यावहारिक दृष्टीच असते. त्यामुळे, अध्यात्मिक दृष्टीने ते पूर्ण आंधळे असतात. अशाप्रकारे दोन टाईपचे आंधळे कसे असतात ? हे आपण समजून घेतले पाहिजे.

म्हणजे, लौकीक जगात जो आंधळा वाटतो, तो व्यक्ती आध्यात्मिक जगतात, उच्चकोटीला पोहोचलेला, डोळस असू शकतो. आणि लौकीक जगात, जो डोळस आहे, तो आध्यात्मिक दृष्टीने, ठार आंधळा असू शकतो.

मुद्दा हा आहे की, जीवन जगतांना, आपल्याला या दोन्ही दृष्टींमध्ये बॅलन्स ठेवावा लागतो. आपला स्पिरिच्युअल आय आणि मटेरियल आय, दोन्हींमध्ये बॅलन्स ठेवावा लागतो.

जेव्हा तुम्ही कार्य संचालन करीत आहात. समाजात आहात. व्यवहारात आहात. लौकीक जीवनात कामावर आहात. घरपरिवारात आहात. त्यावेळी तुम्ही आपली आध्यात्मिक आँख बंद ठेवली तरी चालते. त्यावेळी आपल्याला आपली लौकिक आँख जागृत ठेवून कार्य करावे लागते. आपला व्यवहार जोख असावा. त्यात कोणतीही चूक होऊ नये. या दृष्टीने आपली लौकिक बाह्यदृष्टी अचूक असणे, आवश्यक असते. 

मात्र, ज्यावेळी आपण ध्यान मंदिरात असतो. किंवा घरी ध्यान करत असतो. त्यावेळी, मात्र आपली बाह्यदृष्टी जिला लौकिकदृष्टी आपण म्हणत आहोत. ती पूर्णपणे बंद केली, तरी योग्य आहे. आणि आपली आंतरदृष्टी, ज्ञानदृष्टी म्हणजे, आध्यात्मिक दृष्टी आपण जागृत करून, आपण ध्यानाला बसले पाहिजे. म्हणजेच, आपण सुखपूर्वक आणि शांतीपूर्वक ध्यान करू शकू. आणि सृष्टीला देखील शांती प्रदान करू शकू. 

तर अशाप्रकारे, ह्या दोन्ही आँख आपल्याला वापरायच्या आहेत. पण त्या कधी, केव्हा आणि कोणत्या वेळी चालू ठेवाव्यात आणि केव्हा बंद कराव्यात. याचे लॉजिक आपणांस सर्वप्रथम समजून घ्यावे लागेल.

आपल्याला आध्यात्मिकतेचे आणि व्यावहारिकतेचे, दोन्हींचे भान ठेवावे लागते. आणि त्यासाठी आपला मेंदू देखील बॅलन्स हवा.

' लौकिक दृष्टी ' जर ' ईलुमिनाटी ' असेल ! आणि ' आध्यात्मिक दृष्टी ' जर ' ईल्युमिनाटी ' असेल ! तर त्यांच्या दोन्हींच्या फॉलोअरमध्ये संघर्ष अटळ असतो. अशा परिस्थितीत आपण स्वतःचेच फॉलोअर बनावे. त्यामुळे संघर्षात न पडता ज्ञानग्रहण करून त्यानुसार स्वतःची आध्यात्मिक आणि लौकीक आत्मनिर्भरता साध्य करून घ्यावी.

आपण आपली मेमरी शाबुत ठेवून, बुद्धी शाबुत ठेवून, श्वास बंद करून, महाअवतार बाबाजीं सारखे देहासह प्रकाशात गायब होवू शकत नाही. आपण येशु ख्रिस्तासारखे देहदंडण देखील सहन करू शकत नाही. शंभु राजेंसारखा सोल कॉन्शिअसनेस प्रुव्ह करू शकत नाही. वय वाढल्यावर आपल्याला झालेली छोटीसी जखम देखील पूर्णपणे रिकव्हर व्हायला वर्षवर्ष लागून जाते. त्यामुळे सर्वच गोष्टी प्रुव्ह करून तपासण्याच्या नादी लागू नये. काही गोष्टी श्रद्धा ठेवून, सबुरी ठेवून कराव्यात. काही जाणून घ्याव्यात. तर काही मानुन घ्याव्यात. 

दगडुशेठ गणपतीने जशी दोन कमळे हातात बॅलन्स ठेवली आहेत. तसे आपापल्या फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, इंटेलेक्चुअल हेल्थ आणि सोल हेल्थ संयमित आणि बॅलन्स करून ठेवाव्यात. 

आपण आपल्या लौकीक सेवा अर्लट राहून कराव्यात. आणि ढिंढोरा न पिटता, आपल्या आध्यात्मिक सेवा आपापल्या गुप्त पद्धतीने पर्सनल ठेवाव्यात. आपण करतो म्हणून सगळ्यांनी केले पाहिजे, असा हेका ठेवणे, हा आपल्या मनाचा कमकुवतपणा दर्शवितो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

लाईफचे ईनपुट आणि आऊटपुट !

लाईफ म्हणजे काय ? ते कसे बनलेले आहे ? लाईफ म्हणजे, जीवन ! लाईफ या शब्दातील, ला म्हणजे, अल्लाह ! ई म्हणजे, ईलाही ! फ म्हणजे, गोविंदा !...

एकूण पृष्ठदृश्ये :