व्हिटॅमिन बिझिनेस कॉम्प्लेक्स !


आपला आत्मा, आपली बुद्धी, आपले मन, आपले शरीर यात लहरी निर्माण करून पैसे कमावणारे लोक असतात. हे जर तुम्हाला लक्षात आले, तरच तुम्ही आपला आत्मा, आपली बुद्धी, आपले मन, आपले शरीर स्ट्राँग बनवाल. 

ज्याचे फाऊंडेशनल शरीरच कमकुवत आहे, त्याला विविध कपडे घालून सजवून ठेवावे लागते. मात्र, ज्याचे शरीर भरभक्कम आहे, त्याचे फाटके कपडे देखील फॅशन पाँईंट बनतात. 

ज्याची बॉडी पूर्ण सुरक्षित आहे. अशा व्यक्तीला निवांतपणे ध्यान करता येते. त्याची बॉडी जर कम्प्लीटली प्रोटेक्टेड अवस्थेत असेल, तर व्यक्ती अनंत काळापर्यंत निवांतपणे ध्यान करू शकतो. अशा व्यक्तीसाठी सतयुगाचा आणि संगम युगाचा कालखंड हा सर्वात जास्त असतो. 

मात्र, ज्या व्यक्तीची बॉडी संपूर्ण सुरक्षित आणि निरोगी नाही. त्या व्यक्तीला ध्यान मेडिटेशन करता येत नाही. अशा व्यक्तीसाठी सतयुग किंवा संगमयुग, ज्याला ध्यानयुग असे देखील म्हणतात, हे जणू एक भ्रम असतो. त्याच्यासाठी सोल कोन्शियसनेस हा मूर्खपणाचा खेळ असतो. त्यामुळे, त्याच्यासाठी कलियुगाचा कालखंड हा सर्वात मोठा असतो. त्यामुळे अश्या कलयुगी व्यक्तीने, एखादया ध्यान करणाऱ्या आणि प्रसन्न असलेल्या, सतीयुगी व्यक्तीची जेलसी करणे स्वाभाविक असते.

जो स्वतःहून मरत नाही. आणि ज्याला स्वतःहून ध्यान देखील लागत नाही. अश्या कलीयुगी व्यक्तीला आयुष्याच्या जर्जर स्थितीत आपला मरणदाता शोधत फिरावे लागते. ज्याला स्वतःहून संतुष्ट, शांत, निवांत, स्वस्थ आणि प्रसन्न राहता येत नाही. त्याला बाह्य जगतात बॉस, नोकरी, मित्रमैत्रिणी, डॉक्टर, काऊन्सेलर, वकील, नवरा, बायको, कपडे शृंगार आणि साधने शोधत फिरावे लागते. हे सर्व नैसर्गिक  सृष्टीचे आणि मनाचे अटळ प्रवाह आहेत.

बॉडीलाइफ सिस्टीममध्ये देहसहित आयुष्य जगतांना, कोणी ना कोणी, तुमच्या अपलींकमध्ये म्हणजे, सिनिॲरिटीमध्ये असणारच आहे. आणि कोणी ना कोणी, तुमच्या डाऊनलिंकमध्ये म्हणजे, जुनियारिटीमध्ये असणारच आहे. हे तुम्ही सर्वप्रथम एक्सेप्ट केले पाहिजे.

आणि तुम्ही कितीही मोठे झाले, तरी तुमच्यापेक्षा मोठे कोणीतरी असणारच आहे. फॉर एक्झाम्पल, जर समजा, तुम्ही एक दिवा आहात. आणि तुम्ही, तुमच्या दिवाचे व्होल्टेज वाढवले. परंतु, त्यामुळे, तुमचा प्रकाश हा तुमच्यापेक्षा मोठा दिसतो. मग तुम्ही त्याचा द्वेष करणार का ? त्याची जेलसी करणार का ? अज्ञानात असतांना तुम्ही तसे करू शकतात. पण ज्ञानात नाही. त्याच्यामुळे ज्ञानात राहणे आवश्यक आहे.

आपलाच आत्मा आहे. पण आपल्यापेक्षा मोठा आहे. मग त्याच्याशी शत्रुत्व करून उपयोग नाही. कारण सर्व काही निसर्ग नियमानुसार चालते. आपल्या मनानुसार चालणार नाही.

आपल्या मनामध्ये जेलसी निर्माण होऊ शकते आणि ते आपल्या पतनाचे म्हणजे, आपले रामायण घडण्याचे कारण होऊ शकते. त्यामुळे आपल्यामध्ये जेलसी निर्माण होता कामा नाही. याची सर्वतोपरी काळजी घेतली गेली पाहिजे.  त्याचप्रमाणे, जे आपल्यापेक्षा जुनियर आहेत. त्यांच्यात अज्ञान राहणारच आहे. कोणीना कोणी, आपल्यापेक्षा जुनियर राहणारच आहे. आपणपण, कधीतरी, कोणाचेतरी ज्युनिअर होतो. आणि त्यामुळे आपल्या ज्युनिअरची हेळसांड करणे, ज्युनिअरला डॉमिनेट करणे. किंवा दरवेळी ज्युनिअरकडून नम्र राहण्याची अपेक्षा करणे. हे देखील आपल्या देहजनीत अज्ञानाचं एक लक्षण आहे.

जर तुम्ही स्वतः, आपल्या ज्ञानदायक गुरुच्या सानिध्यात आणि विचारात राहाल, तर तुम्हाला ज्युनिअरविषयी द्वेष, घृणा किंवा राग संताप येणार नाही. आणि तुमच्या त्यांच्याकडून अधिक अपेक्षा देखील राहणार नाहीत. एवढेच नाही, तर तुम्ही ज्युनिअरला जे काही आदेश द्याल, ते ज्युनिअर पाळू लागतील, जेव्हा ते तुमच्यावर प्रेम करतील. जेव्हा ते तुम्हाला आदर्श मानू लागतील. आणि तो आदर्श, आणि ते चुंबकत्व, तुमच्यामध्ये, तुमच्या गुरुकडून, आत्मगुरूकडून प्राप्त झालेले असते.

वर्क सिस्टीममध्ये काडया लावणारे, भांडणे लावणारे, विकार लावणारे लोक असू शकतात. स्वतःहून हलाल होणारे लोक देखील असतात. तसेच इतरांना हलाल करवणारे हरामी लोक देखील असतात. येड्याचे सोंग घेऊन पेढा खाणारे चतुर लोक देखील असतात. मजबुरी का नाम महात्मा देखील असतात. नितीनियमात, कायद्यात लूप होलस् असतात. शरीरात देखील असतात. सृष्टीत देखील आहेत. 

नवीन नवीन बाह्यसृष्टी परफेक्ट सुरवातीला वाटते. नंतर तिच्यातील उणीवा जाणवू लागतात. बंधने जाणवू लागतात. देवाला देखील शेपटी लावणारे आहेत. देवाला देखील भिक मागायला लावणारे आहेत. बाहयदृष्टीमध्ये सिस्टीममध्ये नेहमी फ्लॉज राहणारच आहेत. सिस्टीममध्ये चुकाच असतात. सिस्टीम मध्ये फॉल्ट असतातच. त्यामुळे, सिस्टीम पूर्णपणे सुधारणार नाही. इवन आपली बॉडी देखील पूर्ण सुधरत नाही. अशावेळी, तुम्हाला विसडम वापरून, नॉलेज व्हिजन वापरून, इंटेलिजन्स वापरून, आणि कॉमनसेन्स वापरून, आपापले देहजनीत व्यवहार करावे लागतात. आणि हे व्यवहार करतांना, तुमच्या ज्युनिअरमध्ये तुमच्याविषयी जेलसी निर्माण होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे, तुमच्या सीनियरमध्ये देखील, आपल्याविषयी राग द्वेष घृणा निर्माण होणार नाही, यासाठी तुम्हाला स्वच्छ, अट्रॅक्टिव्ह, आनंदी, प्रसन्न राहावे लागते. सद्गुण प्रक्षेपित करावे लागतात. आणि तुमच्या वागण्या बोलण्यातून ते दर्शवावे लागतात. बायकांना हे चांगले जमते.

त्याचप्रमाणे, सिस्टीममधील कोणतीही जबाबदारी घेतांना, सर्वप्रथम सिस्टीमचे कामकाज पूर्ण समजून घ्यावे लागते. कार्यपद्धती समजून घ्यावी लागते. आणि ती कार्यपद्धती आपणांस अनुकूल असेल तरच त्या सिस्टीम मध्ये इनव्हॉल्व्ह व्हावे. कोणी आपल्या बळजबरी करेल इतके हतबल अशक्त परावलंबी  राहू नये. पृथ्वीवर साई सत्यनारायणकथेप्रमाणे सत्याला, नीतिमत्तेला आणि कायद्याला धरून चालावे लागते. आपले मन, आपला अहंकार आणि आपला मोहोजनीत परिवार, तसेच मायाममतेच्या भावनांचा परित्याग करावा लागतो. यासाठी आपल्या मोहोजनीत परिवारामध्ये देखील आत्मज्ञानाचा प्रादुर्भाव झालेला हवा. म्हणजे, ते स्वतः देखील आत्मनिर्भर हवे. एकमेकांवर जर मोहजनित परिवार डिपेंड असेल, तर तुम्हाला हे सिनॅरिटीचे पद सांभाळणे जड जाते.

जेलसीमुळे रामायण घडले. डॉमिनन्स आणि जेलरगिरीमुळे महाभारत घडले. हे जर तुम्हाला लक्षात आले असेल. तर जेलसीचे मूळ कारण काय आहे ? जेलरगिरीचे किंवा डॉमिनन्सचे मूळ कारण काय आहे ? निसर्गाचे त्याबद्दल काय विचार आहेत ? आणि तुमचे स्वतःचे काय अनुभव आहेत ? यानुसार तुम्हाला त्यावर औषधपाणी करावे लागते. आपण स्वतःच स्वतःचा डॉक्टर जर बनलो, तर खर्च कमी येतो. वेळ देखील वाचतो. त्यामुळे स्वतः स्वतः करणे शिकणे गरजेचे आहे.

देवीदेवता परिवार, गुरु परिवार,  घरपरिवार, मित्र, नातेवाईक, सरकार, आईवडील, भाऊबहीण यांच्यावर डिपेंडंट आणि मोहीत राहण्यापेक्षा, आत्मनिर्भर, आत्मअभिमानी, स्वमानी, स्वाभिमानी, अलर्ट, ॲटरॅक्टीव्ह, इन्डीपेन्डंट राहणे आवश्यक आहे.

ज्युनिअरवर आपला सुपिॲरिटी कॉम्प्लेक्स विकार निर्माण करू शकतो. आणि सिनिअर बघून आपल्यामध्ये इन्फिअरीरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होवू शकतो. असे कॉम्प्लेक्स म्हणजे, जांगडगुत्ता म्हणजे, विकार निर्माण होवू नये. याची सुरुवातीपासून काळजी घ्यावी लागते. यावर स्वतःच स्वतःचे औषधपाणी करावे लागतात. 

आपल्या सिस्टीममधील विकनेस,  सिस्टीममध्ये विकार निर्माण करतो. कॉम्प्लेक्स निर्माण करतो. फोबिया निर्माण करतो. हे आपण लक्षात घेवून विकनेसवर उपाय करणारे व्हिटॅमिन आणि मिनरल स्वतः निर्माण करणे सुरू करावे. त्यामुळे, आपल्या सिस्टिममध्ये ' बि- कॉम्प्लेक्स ' बॅलन्स राहील. सिस्टीममध्ये ' व्हिटॅमिन ' निर्माण करण्यासाठी, स्वतःचे हक्काचे, सेल्फहेल्प ॲण्ड अर्निंग-शॉपिंग-बिझीनेस-कॉम्प्लेक्स उभारणे योग्य ठरते. 







 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

कंसचाणूर मर्दनम् !

राक्षस म्हणजे काय ? रा म्हणजे, बाह्यजीवनशक्ती ! क्ष म्हणजे, आरोग्य ! स म्हणजे, अमर परमेश्वर ! याचा अर्थ, ज्यांच्याकडे बाह्यजीवनशक्तीय...

एकूण पृष्ठदृश्ये :