छळ आणि धोका !


छळ का केला जातो ? हा एक सहाजिक उद्भवणारा प्रश्न आहे.

स्वतःची सत्ता, स्वतःची ताकद, स्वतःचे शरीर, स्वतःचे आरोग्य, स्वतःची संपत्ती या सर्व गोष्टींना ' दौलत ' असे म्हणतात ! 

ही आपली दौलत आबाद रहावी. म्हणजे, नेहमी आपल्याकडेच राहावी. यासाठी छळ केला जातो.

आपल्याला अशक्त, वित्तहीन, विकलांग, रोगी, असहाय्य, निर्बल असे आयुष्य जगण्याची पाळी येऊ नये. यासाठी देखील छळ केला जातो.

जे आपला ' छलिया स्वभाव ' सिस्टीममध्ये उघड करतात. जे आपली वाईट, दुष्ट, बाजू उघड करतात. अशा लोकांचा सत्ताधाऱ्याकडून, दौलतीच्या मालकाकडून, बॉसकडून, लौकीक गुरूकडून छळ केला जातो.

जे लोक आपल्या राहणीमानाला आणि स्वभावाला अनुकुल नाहीत. ज्यांना आपण छळ धोका करून, संपत्तीपासून दूर केलेले आहे. मात्र, जेव्हा ते स्वतःचा वाटा मागतात. तेव्हा त्यांचा देखील परत परत छळ केला जातो. 

थोडक्यात, स्वतःची दौलत आबाद राहण्यासाठी इतरांचा छळ केला जातो.

आपल्याला यथोचीत सन्मान न मिळणे. किंवा आपल्याकडे संसाधने नसणे. या दोन्हींचा, किंवा यापैकी एकाचा तुटवडा असणे. हे देखील कोणा एखाद्या व्यक्तीला, छळ करण्यास प्रवृत्त करू शकते.

छळाचा बदला छळ करूनच घेतला जातो  व ही चेन रिएक्शन चालूच राहते.

' ' म्हणजे, छळ करणे !
' अई ' म्हणजे, सरस्वती !
' या ' म्हणजे, बाह्य जगतातील मुक्तअवस्थेत असलेली इंधन उर्जा ! तिचा छळ करणे म्हणजे, ' छय्या ! '
' चल छैय्या छैय्या ' म्हणजे, चालूपणा वापरून, सरस्वतिचा छळ करून, सारस्वत ज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोहोचू  न देणे. स्वतःची दौलत आणि सत्तेवरील होल्ड आबाद ठेवण्याचा प्रयत्न करणे. 

सृष्टीमध्ये प्रजनन प्रक्रिया ईनिशिएट करण्यासाठी, ज्ञान सरस्वती आणि ध्यान प्रक्रिया बंद करावी लागते. प्रजनन प्रक्रियेसाठी सरस्वती नाडी ब्लॉक करून आणि ध्यानयोगीला अलग पाडून ठेवले जाते. 

बाराही महीने मनुष्यजीव प्रजनन प्रक्रिया करू शकतो, त्यामुळे, परसनल मेडीटेशन रूम किंवा संन्यासी लोकांचा आश्रम सोडला, तर इतर ठिकाणी ध्यानयोगी आणि सरस्वती नाडीची सतत कुचंबणा होणे स्वाभाविक असते. 

' ' म्हणजे, ध्यान करणे !
आणि,
' ' म्हणजे, शरीर !
' पन ' म्हणजे, ध्यान करणारे शरीर !
ध्यान करणाऱ्या शरीराचा छळ करणे. म्हणजे, ' छपन्न ! '
' अबतक छपन्न ' म्हणजे, पवित्र ध्यान करणाऱ्या आत्म्याचा, तो बॉडी कॉन्शिअस जनावर बनेपर्यंत छळ करणे.

निर्बंध लादणे, आनंदी न राहू देणे, दडपणाखाली ठेवणे, गरीबीत ठेवणे, घाबरवणे, रोगी बनवणे, कोंडून ठेवणे, भ्रमित करणे, वेडे बनविणे, हतबल निर्बल बनविणे, गुन्हा करण्यास भाग पाडणे, लाच देण्यास भाग पाडणे, खुन करण्यास प्रवृत्त करणे, हिंस्त्र बनण्यास प्रवृत्त करणे, आर्थिक, शारीरीक तसेच मानसिक विकनेसचा फायदा उठवणे, हे सर्व छळाचेच प्रकार आहेत.

प्रजेची आर्थिक, शारीरीक व मानसिक हतबलता बघून, त्यांचा देवधर्माच्या, परंपरेच्या नावाखाली देखील छळ केला जातो. एकाने छळ केला. त्याची कॉपी इतरांनी केली आणि ती परंपराच बनली. कॅनडासारख्या देशात पालकत्वाला विशेष महत्त्व दिले जात नाही. कारण की, तेथे जन्मलेल्या मुलांची जबाबदारी सरकार घेते. त्यांच्या शिक्षणाची, जमिनीची, अन्न, वस्त्र, निवाऱ्याची आणि रोजगाराची देखील काळजी सरकार घेते. असे मी ऐकलेले आहे आपल्या इथे तसे नसल्यामुळे, मुलांना आपल्या पालकांवर शेवटपर्यंत जमिन, अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी अवलंबून राहावे लागते. आपल्याकडे कॅनडासारखा, सरकारवर मुलांच्या पालनपोषण-संगोपनसंरक्षणाचा बोजा टाकला जात नाही. त्यामुळे, मुलांना रोजगार देणे राहिले बाजूला, येथे सरकारच, अन्न वस्त्र निवारा आणि संसाधनांच्या टॅक्सवर आपले स्वतःचे उत्पन्न काढते. यावरून सत्ता हस्तगत करण्यासाठी छळ धोका करणे, साम दाम दंड भेद वापरणे हे येथे धार्मीक अनुष्ठानासारखे नॉर्मल झालेले आहे. 

संयुक्त कुटुंबात मुलांचा छळ होवू नये. म्हणून अमेरिकेत मुले मोठे आत्मनिर्भर झाल्यावर आईवडीलांना सोडून निघून जातात. त्यामुळे तेथे कर्जबाजारीपणा कमी आहे. आणि प्रत्येकाकडे स्वतःच्या हक्काचे घर बंगला गाडी आहे. कॅनडात प्रत्येक जन्मलेला बालकाची जबाबदारी सरकार घेते. लोकांच्या दातांचा ईन्शुरन्स देखील सरकार देते. 

आपण कोणाचा असोशिएट बनावे ? याची आपल्याला चॉईस असते. आपला असोशिएट शोधतांना,  ' कॅनडाऊ विठ्ठलु कर्नाटकु '  ह्या फॉम्युलाचा आभ्यास करायला हवा. कॅनडा भक्तास ' हेल्थ इन्शुरन्स फ्रि ', विठ्ठल भक्तास ' वेल्थ इन्शुरन्स फ्रि ' आणि कर्नाटक भक्तास ' हॉपिनेस ईन्शुरन्स फ्रि ' आहे का ? याबाबत स्वतः चौकशी करून खात्री पडताळणी करणे गरजेचे आहे.

विशेषता जे स्त्रैण लोक आहेत. जे इंद्रियगामी लोक आहेत ! ज्यांना स्वतःच्या खाण्यापिण्यावर कंट्रोल नाही ! असे लोक, छळ आणि धोका वापरून, संपत्तीचा मालकी हक्क पकडून ठेवत असतात ! आणि त्यासाठी, ' छळ आणि धोका ' करण्याचे शस्त्र, संघटितपणे देखील वापरायला, ते मागे पुढे बघत नाहीत. त्यांचा आत्मा मेलेला असतो ! केवळ शरीरे जिवंत असतात ! आणि तेच त्यांना टिकवून ठेवायचे असतात.

' छळ आणि धोका ' वापरून ' किल्ल्याच्या दौलतीचा मालकी हक्क ' स्वतःकडे ठेवण्याच्या प्रथेबाबत औरंगाबाद जवळच्या दौलताबाद किल्ल्याचा इतिहास साक्षी आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

' एक ' म्हणजे नक्की काय ?

साईबाबांनी ' सबका मालिक एक ' असे म्हटले आहे. तर हा ' एक ' म्हणजे नक्की काय ? याबाबत आपण विचार करायला हवा. ' एक ' ह...

एकूण पृष्ठदृश्ये :