श्री शैल्य !



श्री शैल्य म्हणजे काय ?
हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.

श्री म्हणजे, शरीर !
शल्य म्हणजे, दुःख !

शरीर आले की, शरीराबरोबर येणाऱ्या शरीराच्या गरजा, शरीराची रोग निवृत्ती करणे, शरीराची क्लिनिंग करणे, शरीरात अन्न भरणं. इ. इ. देखील त्यासोबत येते.

एखादं इंजिन बनवलं की, त्याला मेंटेन पण करावे लागतं. खराब झालं तर रिपेरीला पण पाठवाव लागतं. बंद पडलं तर त्याचं पुर्ननिर्माण करावं लागतं. तसंच हे शरीराचं असतं. आणि हेच शरीर बनविणाऱ्याचे शल्य आहे.

शरीर अनेक प्रकारचे असतात. जसे प्राणमय शरीर,  मनोमय, बुद्धीमय अन्नमय, संस्कारमय, आनंदमय, स्पिरिटमय शरीर इत्यादी. इत्यादी. आणि प्रत्येक शरीराला आपण जर एखादे मशीन किंवा एखादी कंटेनर जर समजले. तर त्याची काहीतरी एक विशिष्ट एक्सपायरी डेट असते.

शरीराला प्रवाह लागतो. मशीनमध्ये प्रवाह असला, इलेक्ट्रिसिटी असली, तर मशीन चालू आहे, असं आपण म्हणतो. नाहीतर मशीनमध्ये फॉल्ट झाला किंवा मशीन सिझ झाले, असं आपण म्हणत असतो. आणि मग परत त्या मशीनला चालू करण्याच्या प्रक्रिया, रिपेअर करण्याच्या प्रक्रिया सुरू होतात.

दत्तगुरु हे स्वतः मशीन बनवत असले, किंवा त्यांचे शरीर स्वतःच एक मशीन असलं, तरी ते देखील कंटाळत असतील ना ! मग ?

त्यामुळे आपण गुरुचरित्रात ऐकतो की, गुरु सर्वात शेवटी श्रीशैल्य ह्या गावी गेले. याचा अर्थ काय ? की, त्यांना हे शरीराचं शल्य शेवटपर्यंत लागून राहिलं. आणि हे शरीर गायब पण करता येत नाही. फक्त या शरीराच्या अनुरेणूंना स्पीड अप किंवा स्पीड डाऊन करता येतं. प्रकाशाच्या स्पीडपर्यंत त्यांचा स्पीड किंवा व्हायब्रेशन वाढवता येतं किंवा कमी करता येतं. आणि ह्याच शक्तीमुळे महावतार बाबाजी अचानक प्रगट होतात आणि गायब होतात. म्हणजे, त्या शरीराला स्पीड आलेला आहे. परंतु आपण असे म्हणू शकत नाही की, ते शरीर नष्ट होऊन गेले ! म्हणजे काय ? शेवटी हे श्रीशैल्य आहे ! कधी ना कधी, केव्हा ना केव्हा, आपल्या अनेक अनेक जीवनाच्या कथा अनुभव झाल्यावर हे शल्य लक्षात येऊ लागते. आपले गुरुजी जरी सतत आपण सर्व एकच आहोत, एकाच परमात्म्याचे लेकरे आहोत. आपला आत्मा एकच आहे. असे म्हणत असले तरी ' तेरे मेरे बीच में, कैसा है, ये बंधन, अनजाना ? ' असा अनुभव किंवा विचार मनात कधीतरी येतोच. हे देखील एक शल्यच नाही का ? 

मॅट्रिक्समध्ये सगळे एकमेकांवर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट पद्धतीने डिपेंडंट असतात. मग तो संन्यासी का असेना. जो स्वतःला वेगळं ठेवून आत्मनिर्भर म्हणण्याचा प्रयत्न करतो. त्याचं पोट मारून ठेवतात. कधी ओठ मारून ठेवतात. तर कधी बोट मारून ठेवतात. असा तमाशा आहे. त्यामुळे, ' झूट बोल, पण नीट बोल.', ' जो चाटूचमचा, तो असे आमचा ! ', ' आमचे बनुन ऱ्हाय आणि साय मख्खन खाय ! ' असा सरळधोट उपद्देश समाजातील वडीलधारी लोक आपल्या पोरापोरींना देतांना दिसतात.

मनुष्य जीवाला जगण्यासाठी, अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी चलन कमवावे लागते. जनावरांना नाही कमवावे लागत. त्यामुळे, धंदा असो, नोकरी असो, राजकारण असो, स्पोर्टस असो, पूजापानी असो, किर्तन, वादन गायन, नृत्य नाटक, मनोरंजन, हॉटेल, मॉटेल, भेळभोजन असो किंवा कोणतेही उत्पन्न मिळविण्याचे छुपे साधन असो ! मनुष्य जीवांच्या सिस्टीम्स तयार झालेल्या असतात. 
 
॥ गंगम् सब नंगम् ॥ 

॥ संघम् धंदम् ॥ 

॥ संघम धरम् ॥ एकला अधरम् ॥ 

कोणत्याही टोळकीमध्ये, कळपामध्ये, चेम्बर मेंबर ग्रुपमध्ये, समाजात, टिममध्ये, परिवारात, संघामध्ये, सिस्टिम मध्ये सुखासुखी सामिल न होणाऱ्या व त्यातील घाण बघणाऱ्या व्यक्तीला, माईंडफुल नसलेला, विसडम नसलेला, चतुर नसलेला, बॉडी कॉन्शिअस नसलेला, माईंडलेस, इमोशनलेस,  भोळा किंवा मुर्ख मानले जाते. अधर्मी मानले जाते. अश्या एकलकोंड्या व्यक्तीचा छळ केला जातो. कोणी गोड बोलून छळ करते, तर कोणी कडू तिखट तुरट बोलून छळ करते. त्याला शक्तीहीन, धनहीन करून त्याच्याशी उघडउघड धोका केला जातो. असा आतापर्यंतचा इतिहास आहे.

विठ्ठल : या शब्दात एकापेक्षा जास्त '  ' अक्षर एकत्र आलेले आहेत. '  ' हे अक्षर पावर संदर्भात आहे.
एकापेक्षा जास्त पावरकॉन्शियस पावरफुललोक एकत्र आले, तर त्यापासून पावर हॅण्डलिंग सिस्टीम तयार होते.

दत्त : या शब्दात एकापेक्षा जास्त '  ' अक्षर एकत्र आलेले आहेत. '  ' हे अक्षर सोलकॉन्शियसनेस संदर्भात आहे.
एकापेक्षा जास्त सोलकॉन्शियस सोलीलोक एकत्र आले, तर नॉलेज हॅण्डलिंग सिस्टीम तयार होते.

अन्न : या शब्दात एकापेक्षा जास्त '  ' अक्षर एकत्र आलेले आहेत. '  ' हे अक्षर बॉडीकॉन्शियसनेस संदर्भात आहे.
एकापेक्षा जास्त बॉडीकॉन्शियस फुडीलोक एकत्र आले, तर फूड हॅण्डलिंग सिस्टीम तयार होते.

चिरंजीव हनुमंताचा अवतार असलेले, समर्थ रामदास स्वामी, आपल्या मनाच्या श्लोकात म्हणतात की, ' देहधारणेचे महादुःख आहे. महा दुःख ते नाम घेता न राहे ! ' अशाप्रकारे त्यांनी देह धारणेचे दुःख म्हणजेच, श्री शैल्य प्रगट देखील केले आणि त्यासोबत त्यांनी त्यावर शोधलेला उपाय म्हणजे, रामनाम जप हा उपाय देखील त्यांनी समाजाला शेअर केला.

अनेक चमत्कारिक बाबांचे, अनेक चमत्कारिक गुरूंचे चरित्रे वाचून आणि त्यांच्याविषयी गप्पा करून, माणसाला फँटसी फील होते. पण प्रत्यक्षात, व्यवहारात, तो जे अनुभव घेत जगतो, आत्मनिर्भर होण्याचा जेव्हा तो प्रयत्न करायला लागतो, तेव्हा ते चरित्र चमत्काराचे राहत नाही. आणि जरी चमत्कार झालेले असले, तरी त्या चमत्कारांमध्ये लहानपणीसारखा किंवा तरुणपणीसारखा रस राहत नाही. आनंद मिळत नाही. ज्याला आपण चमत्कार समजत होतो ते ॲक्युअली एनर्जी सकींग ॲबिलीटी आणि एनर्जी पंपींग स्टॅमिनाचा भाग होता. डिफेन्स सिस्टिमचा भाग होता. किंवा ॲक्शन ट्रिगरींग सिस्टिमचा भाग होता. असे आपल्याला लक्षात येते. आणि शेवटी कॉमनसेन्स बाबांनीच योग्य सांगितले होते. असा निष्कर्ष काढला जातो. तेव्हा सर्व बाबा करून झाल्यानंतर, ' कॉमनसेन्स बाबाजी की जय ' असे बुढ़ेलोक म्हणू लागतात.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

' एक ' म्हणजे नक्की काय ?

साईबाबांनी ' सबका मालिक एक ' असे म्हटले आहे. तर हा ' एक ' म्हणजे नक्की काय ? याबाबत आपण विचार करायला हवा. ' एक ' ह...

एकूण पृष्ठदृश्ये :