सेल्फ डायग्नोसिस !


प्रत्येकाला आयुष्यात स्वतःचे सेल्फ डायग्नोसिस करता येणे. हे एक महत्त्वाचे व सुशिक्षितपणाचे लक्षण आहे.

जरी तुम्ही आजारी असाल. तरी कोणत्या डॉक्टरकडे जायचे ? याची शहानिशा स्वतःहून तुम्हाला करता आले पाहिजे. तुम्हाला नक्की काय होत आहे ? याची शहानिशा तुम्हाला करता आली पाहिजे. तुमचे डोळे दुखत आहेत, तुम्हाला सर्दी झाली आहे, तुमचे नाक चोंदलेले आहे, की तुम्हाला बद्धकोष्ठता झाली आहे, तुमचे डोके दुखत आहे का ? तुमच्या नसा दुखत आहेत का ? तुमचे मसल दुखत आहेत का ? तुम्हाला श्वास घ्यायला अडचण होत आहे का ? की तुम्हाला जेवताना त्रास होत आहे ? तुम्हाला ऐकू कमी येत आहे, की तुम्हाला हालचाल करण्यामध्ये त्रास होत आहे ? तुम्हाला मानसिक थकवा जाणवत आहे, की तुम्हाला शारीरिक थकवा जाणवत आहे ? तुम्हाला निद्रानाश झालेला आहे, की तुम्हाला भूक लागत नाही ? या अशा स्वतःच्या शरीराबद्दलच्या सर्व गोष्टी आपल्याला स्वतःहून डायग्नोसिस करता आल्या पाहिजेत. तेव्हाच आपण कोणत्या डॉक्टरकडे जायचे ? डोळ्याच्या डॉक्टरकडे जायचे, की सर्दीच्या डॉक्टरकडे जायचे ? का हाडाच्या डॉक्टरकडे जायचे ? की त्वचेच्या डॉक्टरकडे जायचे ? हे ठरवू शकतो. आणि तिथे जाऊन त्याला आपल्याला काय होत आहे ? हे सांगावेच लागणार आहे. व त्यासाठी आपल्याला सेल्फ डायग्नोसिस केलेले असणे आवश्यक आहे.

तुम्हाला मानसिक विकार झालेला आहे, असे जर कोणी तुम्हाला सांगेल. तर तुम्ही त्याला असे विचारू शकतात की, कोणत्या प्रकारच्या मानसिक विकाराबद्दल तू बोलत आहेस ? डिप्रेशन झाले आहे का? काम वाढला आहे का ? क्रोध वाढला आहे का ? जेलसी वाढली आहे का ? मोह वाढला आहे का ? अहंकार वाढला आहे का ? चिडचिडपणा वाढला आहे का ? रडका एटीट्यूड वाढला आहे का ? दुसऱ्याला छेडण्याची टेंडन्सी वाढली आहे का ? कोणी ऐकत नसतांना देखील त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि बडबड करण्याची टेंडन्सी वाढली आहे का ? प्रश्न विचारण्याची टेंडन्सी वाढली आहे का ? पैसे कमावण्याची क्षमता कमी झाली आहे का ? माणसांना ओळखण्याची क्षमता कमी झाली आहे का ? दुष्टांविषयी रोष निर्माण झाल्यामुळे मनात मानसिक क्लेश निर्माण होत आहे का? अशा अनेक विविध प्रश्नांच्या सरबत्ती आपण सेल्फ डायग्नोसिस करतांना जर स्वतःशीच केल्या तर, आपल्याला आपल्या बॉडीचे जसे आपण डायग्नोसीस करतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या मनाचे डायग्नोसिस देखील करू शकतो. व त्याप्रमाणे त्यासाठी योग्य ते उपचार घेण्याची सोय शोधू शकतो किंवा तसे उपयुक्त उपचार देणारा स्पेशालिस्ट शोधू शकतो.

नसनाड्या ब्लॉक झाल्यामुळे, विश्राम कमी झाल्यामुळे, बौद्धिक क्षमता कमी झाल्यामुळे, विकार आणि रोग बळावतात. व त्यासोबत सेल्फ डायग्नोसिस करण्याची क्षमता कमी होत जाते.

ज्याला सेल्फ डायग्नोसिस देखील करता येत नाही, तो इतरांचे काय डायग्नोसिस करणार ? त्यामुळे, त्याला चांगले वाईट ओळखता येत नाही. स्वतःबद्दलचे निर्णय त्याला स्वतःहून घेता न आल्यामुळे, साध्या साध्या गोष्टींसाठी देखील, तो अनेक लोकांचे मते विचारतो. अनेक लोकांशी कन्सल्टेशन घेतो. व त्यामुळे तो अधिकाधिक खर्चात पडत जातो. व त्याचे मन भ्रमित होत जाते. कारण, एका स्वतंत्र युनिक व स्वतः च्या बॉडीशी अनुकूल व स्वतः च्या आत्म्याशी प्रामाणिक असलेल्या निर्णयापर्यंत तो व्यक्ती पोहोचू शकत नाही. आजकाल ज्यांना आपण पॅरेंट म्हणतो, पालक म्हणतो, त्यांची ही जर कंडिशन असेल, तर त्यांच्या मुलांची कशी बरं वाईट कंडिशन असेल ! याची कल्पना आपल्याला येऊ शकते.

पूर्वीच्या काळी, गुरुगृही गेलेल्या शिष्याला, सर्वप्रथम सेल्फ डायग्नोसिस शिकवले जायचे. व सेल्फ डायग्नोसिस करण्यासाठी स्वतःची बॉडी आणि स्वतःचे मन याचे थरो नॉलेज त्यांना दिले जायचे. आणि केवळ थेरॉटिकलच नॉलेज न देता, त्यांच्याकडून अनेक विविध क्रिया करून घेतल्या जायच्या व अनेक विविध क्रिया शिकवल्या जायच्या. जेणेकरून ते स्वतःच्या मनमस्तिष्क बॅलन्स, हार्मोनाईजड् आणि शरीराला तनदुरुस्त ठेवू शकत असत.
आजकाल ह्या प्रकारचे शिक्षण, बोर्डाच्या शाळांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये मिळत नसल्यामुळे, मोठमोठ्या डिग्र्या, पदव्या घेतलेले लोकदेखील बाहेर नोकऱ्या शोधणारे, आत्मनिर्भर नसलेले, छलकपटी, विषयविकारी आणि विचित्र कॅरेक्टरचे, व्यसनी,  हरामखोर ॲटीट्युड किंवा निराशावादी ॲटीट्युड असलेले आढळून येतात.

स्वतःलाच स्वतःचे आत्मनिरीक्षण, आत्मपरिक्षण व स्वसंशोधन करता यावे, यासाठी सेल्फ अवेअरनेस असणे, किंवा याबाबतचे मुलभूत ज्ञान, सर्वांना राष्ट्रातील सर्व शैक्षणिक सत्रात तसेच प्रत्येक प्राथमिक अभ्यासक्रमात दिले जाणे, अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रातील व्यक्ती आत्मनिर्भर बनण्याची ती मुलभूत पहिली पायरी आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

' एक ' म्हणजे नक्की काय ?

साईबाबांनी ' सबका मालिक एक ' असे म्हटले आहे. तर हा ' एक ' म्हणजे नक्की काय ? याबाबत आपण विचार करायला हवा. ' एक ' ह...

एकूण पृष्ठदृश्ये :