उद्योग हॅण्डलिंग !


आत्मनिर्भर उद्योग कसा हँडल केला जातो ?


आत्मनिर्भर उद्योग कसा हँडल केला जातो ? याबाबत आपण थोडे ऑब्झर्वेशन जर केले. तर बरेच काही लक्षात येऊ शकते. 

उद्योग उपयोगी तेव्हाच असतो, जेव्हा त्या उद्योगांमध्ये दम असतो. प्राण असतो. ऑक्सिजन असतो. 

जीवन जगण्यास अनुकूल अशी शक्ती असलेला प्राणवायू असतो. 

तेव्हाच त्या उद्योगात देखील प्राण टिकतो. आणि ज्या उद्योगात जीव आहे, त्याच उद्योगाचा भरभराट होणार असतो. 

यावरून असा निष्कर्ष काढता येईल की, उद्योगांमध्ये प्राण असणे. अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. नाहीतर तो उद्योग एक भंगारवाडा किंवा जुना सुना रिकामा किल्ला राहून जाईल ! 

कुरण नाही, हरियाली नाही, चारा नाही. गाई नाही. म्हशी नाही.. दूध नाही. तर पेढेही नाहीत. अशा परिस्थितीत हलवा करणाऱ्यांचा धंदा होईल तरी का? जर अन्न नाही, पीक पाणी नाही, प्रॉडक्ट चे उत्पादन नाही. तर त्यांच्या वाहतूक करणाऱ्या लॉजिस्टिक सिस्टिमचा धंदा होईल का? त्यांच्या शक्तीचा अशा ठिकाणी काही उपयोग आहे का ? डोंगरावर मुबलक संजिवनीच उगलेली नाही. तर डोंगर पोखरून किंवा डोंगर हालवून उपयोग आहे का ?

समजा, तुमचा उद्योग हा एक ऑक्सीजनयुक्त पाणी असलेली काचेची बाटली आहे. पाणी भरलेली, जीवन भरलेली काचेची बाटली आहे. 

या बाटलीचे ढक्कन कधी बंद ठेवावे ? आणि कधी उघडावे ? याला, उद्योग हॅण्डलिंग करायचे कसबीकौशल्य आपण मानूयात. 

तर मला सांगा, की, 

खालीलपैकी कोणत्या केसमध्ये तुम्ही बाटलीला ढक्कन लावून ठेवणे एक महत्त्वाचे हॅण्डलिंग कार्य समजाल ?

Case1:


Case2:



तुमच्या बिझीनेसमध्ये प्राण आहे का ?


बिजनेस ही केवळ एक इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम आहे. एक किल्ला आहे. एक बाटली आहे ! परंतु जोपर्यंत त्याच्यामध्ये जीवन नाही. प्राण नाही. तोपर्यंत त्याला काही किंमत आहे का ? 



नाही ! 

केवळ इन्फ्रास्ट्रक्चर असणे, म्हणजे, बिजनेस झाला, असे नाही. 

हे आपल्याला सर्वप्रथम लक्षात येणे गरजेचे आहे.


तुमच्या बिझीनेसमध्ये नारायण आहे का ?


ना म्हणजे, बाह्यशरीर ! 

आयन म्हणजे, येजा करणे !

' उत्तरायण व दक्षिणायन ' हे सुर्यांचे उत्तर व दक्षिण दिशेकडून ये-जा करणे आहे. ' रामायण ' हे रामाचे ये-जा करणे आहे. त्याप्रमाणे, ' नारायण ' म्हणजे, मानवी शरीरांचे ये-जा करणे ! 

जीवंत मानवी शरीर हे प्राणवायूयुक्त जीवनाने भरलेले असते. जोपर्यंत सिस्टीममध्ये जीवंत मानवी शरीरे ये-जा करीत नाही. तोपर्यंत सिस्टिममधिल दळणवळण बंदच राहते. दळणवळण जर बंदच राहीले, तर मालवाहू व्यापारी चलनाचे चलनवलन बंद होऊ शकते. मग प्रवासी वाहतुकीचा, माल वाहतुकीचा बिझीनेस कसा होणार ?


मनोरंजन हा एक दुय्यम प्रतीचा धंदा आहे !


एंटरटेनमेंट म्हणजे, मनोरंजन हा एक दुय्यम प्रतीचा धंदा आहे. कारण की, लोकांकडे स्थैर्यच नसेल, चलनवलनच नसेल, धंदा पाणीच नसेल, पैसाच नसेल, पिक पाणीच नीट होणार नसेल, तर कोणता येडा राजा आहे, जो राज्यात मनोरंजनाला प्राधान्य देईल ? 

मनोरंजनाची गरज तेव्हा असते, जेव्हा माणूस मेहनतीचे काम करून, थकून, जेव्हा योग्य आहार-विहार करून, जेव्हा त्याला अतिरिक्त वेळ उपलब्ध होतो, तेव्हा कौटुंबिक एकत्रिकरण आणि स्वास्थ्यासाठी, तो मनोरंजन या टूलचा उपयोग करून घेऊ शकतो. 

परंतु त्यासाठी त्याच्याकडे स्थैर्य असणे, रेग्युलर उत्पन्न असणे, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य परिपूर्ण असणे, आवश्यक असते. 

जर मनोरंजनाच्या माध्यमातून त्याचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ बिघडत असेल, तर ते मनोरंजन थर्ड क्वालिटीचा बिजनेस मानावा लागेल. ज्याला एक सक्षम राजा कधीही सपोर्ट करणार नाही.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

' एक ' म्हणजे नक्की काय ?

साईबाबांनी ' सबका मालिक एक ' असे म्हटले आहे. तर हा ' एक ' म्हणजे नक्की काय ? याबाबत आपण विचार करायला हवा. ' एक ' ह...

एकूण पृष्ठदृश्ये :