योग-याग-क्रिया-धर्माधर्म-माया कधी जातील विलया ?


सोहम सुदर्शनक्रिया हे इंटेक प्रक्रिया, म्हणजे, डोके, तोंड आणि नाक याव्दारे शरीरात घेतले जाणारे ज्ञान, अन्न आणि इंधन यातील आणि ते ज्ञान, अन्न आणि प्राण इंधन किंवा अन्न प्रोसेस करण्याची प्रक्रिया या संदर्भातील शास्त्र आहे. त्याचप्रमाणे, विसडम वापरून ॲक्शन घेणे. म्हणजे, क्रिया करणे. या संदर्भातील शास्त्र आहे.

होंगसो क्रियायोग हे सिस्टीम हॅण्डल करणे, प्रतिक्रिया देणे, पचन करणे, निसरण करणे, आउटपुट देणे, क्लीनिंग करणे, रिलीजिंग करणे, रिसायकलिंग करणे, रिव्हरबेशन करणे, ह्या  शारीरिक सिस्टीम प्रतिक्रियांशी संबंधित मोठे शास्त्र आहे. 

प्रत्येक देहधारी जीवाला, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या चालणाऱ्या, या क्रिया प्रतिक्रियांचा खेळ माहीत असणे आवश्यक आहे. आणि त्याची जी काही शास्त्रीय पद्धत आहे. ती शिकून घेणे, हेच शारीरिक आणि मानसिक शिक्षण आहे. जे शिकणे प्रत्येकाला अटळ आहे ! कारण, फार मोठा प्रवाह जो थांबवता येणार नाही, असा प्रवाह, जोपर्यंत तुम्हाला हँडल आणि मॅनेज करता येणार नाही. तोपर्यंत, तुम्ही भाडमध्ये जात राहाल ! आणि असे आपण भाडमध्ये जाऊ नये, यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने, संयमाने हे क्रियायोगशास्त्र समजून घेणे गरजेचे आहे. आणि त्यातील बारकावे नियम समजून घेणे गरजेचे आहे.

बरेचसे नियम स्वतःच्या अनुभवातून कळतात. सगळेच नियम रेडीमेड मिळत नाहीत. वाचन केल्यावर चिंतन करणे आणि साधना केल्यावर, ध्यान करणे, हे देखील एक शिक्षण घेण्याचे उत्तम साधन आहे. जोपर्यंत आपल्याला खायला अन्न आणि व्यवहाराला धन लागते, आणि जोपर्यंत आपले डोळे उघडतात, आणि डोळे बाहेर थोडे का असेना, पण बघतात. तोपर्यंत, हा क्रिया योगाचा नियम, आणि क्रिया योगाचे शास्त्र अँप्लिकेबल राहते. 

जर तुम्ही कधीच डोळे उघडणार नाहीत, आणि तोंड उघडणार नाहीत, संपूर्णपणे पंचतत्त्वाच्यावर बाहेर निघून जाऊ शकाल, त्याचवेळी तुम्ही क्रियायोगाच्या देखील वर गेलेले आहात. आणि सृष्टीचक्राच्यावर गेलेले आहात, असे स्पष्ट होते. त्यामुळे चक्राचे नियम आणि क्रियाचे नियम तुम्हाला लागू पडत नाहीत ! म्हणजे, तुम्ही परमात्म्याशी योगमिलन पावलेले असतात. आणि तुमचा देह पूर्णपणे तुम्ही ड्रॉप केलेला असतो. त्यावेळी तुम्ही हरिमय झालेले असतात !

जर, केवळ मनाच्या विचारांचा, कल्पनाविलास करून, स्वतः देहधारी असतांना, तुम्ही जर ही स्थिती अनुभव अनुभवात असाल, तर मात्र, सृष्टीचक्र आणि त्यातील नैसर्गिक प्रवाहाच्या क्रिया, तुमच्या परीक्षा घेतील. तुम्हाला देहदंडन देखील होऊ शकते. व असे होऊ नये, यासाठी तुम्हाला, प्रत्यक्षात देहत्याग करून, परमात्मा मिलन करण्याची, समाधीसाधना साध्य करण्याची, पूर्णसिद्धी मिळालेली हवी. नाहीतर, परत फसगत होऊन तुमचा पुनर्जन्म होईल.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

योग-याग-क्रिया-धर्माधर्म-माया कधी जातील विलया ?

सोहम सुदर्शनक्रिया हे इंटेक प्रक्रिया, म्हणजे, डोके, तोंड आणि नाक याव्दारे शरीरात घेतले जाणारे ज्ञान, अन्न आणि इंधन यातील आणि ते ज्ञान, अन्न...

एकूण पृष्ठदृश्ये :