गृहस्थाच्या सेवासाधनासत्संगाचे संरक्षणकवच !


जोपर्यंत आपली समाधी सिद्ध होवून परमार्थ पूर्ण होत नाही, तोपर्यंत, देहत्याग करणे योग्य नाही. तसेच,
जोपर्यंत, संसार पूर्ण होत नाही, तोपर्यंत घरत्याग करणं योग्य नाही.
म्हणून, आपण नियमितपणे आपली साधना, सेवा आणि सत्संग करून, आपला संसार नेटका करण्यासाठी, आपला परमार्थ पूर्ण साधण्यासाठी, आपले शरीर, आपली गाडी, आपले घर, आपले प्रॉपर्टी हे सुरक्षित असणे आवश्यक असते.

आपल्या प्रॉपर्टीला नजर लागू नये. शहादात लागू नये. यासाठी निगेटिव्ह आणि दुःखदायक गोष्टींपासून त्यांचे संरक्षण करणे जरुरी असते.

तर हे संरक्षण आपल्याला आपल्या कुळदेवीकडून सर्वप्रथम साध्य होते. त्यानंतर महावतार बाबाजी यांच्या कृपेने आपल्याला संरक्षण प्राप्त होते. तसेच, घर जोडून ठेवण्यासाठी, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आणि श्री शंकर समर्थ महाराज या गुरुदेवदत्तशक्तीचे पाठबळ कामी येते. सोबत विठ्ठल श्रीहरीनामाचा केलेला पुण्यसाठा मदतगार ठरतो.

या सर्वांना प्रतिकरूपाने समजुन घेत, आपल्या आत्म्याने बनविलेल्या प्रॉपर्टीचे संरक्षण कवच म्हणून, दोन लिंबू, दोन हिरवी मिरची आणि त्यामध्ये दोन बिब्बा यांना एका दोरीने बांधून, तसेच काळ्या बाहुल्याला उलटे करून दोरीने, आपल्या प्रॉपर्टीच्या दर्शनी भागात सहजपणे दिसेल असे लावतात. जेणेकरून, त्यांना बघून, आपल्याला या संरक्षकशक्तींची आठवण व्हावी. व आपण त्यांची सेवा करून, त्यांना प्रसन्न करून घ्यावे. जेणेकरून आपला परमार्थ पूर्ण होईल. व परमार्थ पूर्ण करतांना, आपल्या प्रॉपर्टीची चिंता आपल्याला ग्रासणार नाही. निगेटीव्ह व्हाईबजचा त्रास होणार नाही. आपल्या साधनेमध्ये विघ्न निर्माण होणार नाही. हा त्यामागील अर्थ व शास्त्रिय दूरदृष्टीकोन आहे.

यात, लिंबू हे आत्म्याला शरीर देणाऱ्या, कुळदेवतेचे प्रतिक आहे. मिरची हे सतत ध्यान साधना करून, आपल्या शरीरबुद्धीला विर्यतेज देणाऱ्या, महाअवतार बाबाजींचे प्रतिक आहे. बिब्बा हे आपल्याला, आपल्या शरीराविषयी, बुद्धीविषयी व मनाविषयी ज्ञानसरस्वति देणाऱ्या, दत्तगुरुंचे व आपल्या आत्म्याविषयी ज्ञान देणाऱ्या, शंकरगुरू महाराजांचे प्रतिक आहे. वरून खाली, उलट येणाऱ्या हरिशक्तीचे प्रतिक, काळा बाहुला आहे.

हे प्रतिके, प्रॉपर्टीच्या दर्शनी भागात किंवा दारावर लावली. म्हणजे, सर्वकाही काम झाले. असे समजून डॉर्मन्ट होणे, मूर्खपणाचे ठरते. ही प्रतिके, आपल्याला, त्या त्या शक्तीची साधना सेवा करण्याची, आठवण करून देतात. कुळदेवतेची सेवा साधना सत्संग, दत्तगुरूंची सेवा साधना सत्संग, शंकर महाराजांची सेवा साधना सत्संग, महाअवतार बाबाजींची सेवा साधना सत्संग, विठ्ठलाची सेवा साधना सत्संग करण्याची प्रेरणा देतात. म्हणजे, आपण श्रद्धासबुरीने, कॉमनसेन्स वापरून, विसडम वापरून,  त्या सर्व प्रकारच्या सेवा-साधना-सत्संग नियमितपणे करणे, आवश्यक आहे.

' लिंबु, बिब्बा, मिरची, बाहुला ' हे सर्व ' प्रॉपर्टी संरक्षक कवच ' अलक्ष्मी येवून खावून जाते. हे लक्षात आल्याने, गणेशाने आपली स्वतःची लक्ष्मी म्हणजे, प्रॉपर्टी, ' व्ही-कटोरी ' बनवून सांभाळली. ते बघून, तेव्हापासून, नारायण देखील, आपली अस्त्रे, बोटांची व्हि-कटोरी करून, त्यात सांभाळतो.

' या ' म्हणजे, बाहय सृष्टीत मुक्त होणे. 

' व्हि- कटोरी ' टेकनिक वापरून, आपल्या लक्ष्मीचे संरक्षण करून, बाहयलौकीकसृष्टीत मुक्ती भोगणारी नारायणी शक्ती म्हणजे, ' व्हि- कटोरी - या ' ! 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

राजे स्वराज्याची गुढी उभारा.

' ढ ' ही विठ्ठलाची ' ईडी ' शक्ती आहे. ' राम ' नामजपाने शरीराच्या आभामंडळात निर्माण झालेली ही ' ढी ' शक्ती आह...

एकूण पृष्ठदृश्ये :