चलन आणि वलन



व्यापार उद्यम वाढीसाठी अर्थव्यवहारात चलनवलन वाढणे आणि नैतिक व्यवहारात उर्जेला वळण लागणे आवश्यक आहे.

हलवा ' ई ' तंत्र काय आहे ?
ई म्हणजे कधीही नष्ट न होणारी ऊर्जा !
ही ऊर्जा जर हालवली नाही तर एकाच ठिकाणी साठून त्या जागी तिचा स्फोट होतो. त्यामुळे ऊर्जा सतत हालविणे गरजेचे आहे. सिस्टिममध्ये जी उर्जा हलत असते. प्रवाही असते म्हणजे, चलनात असते. तिला जास्त भाव प्राप्त होतो.

हलवा ' मी ' तंत्र काय आहे ?
मीपणा असणे, अहंकार असणे, माझे माझे करणे, शरीराच्या ॲटॅचमेंट असलेल्या वस्तु, वास्तु व व्यक्ती हे सर्व ' मी ' आहे. या आपल्या मीपणाला हलविल्याशिवाय आपले काम पुढे जात नाही. मनुष्याला गती मिळण्यासाठी त्याची प्रगती होण्यासाठी त्याला आपला मीपणा अहंभाव सोडावाच लागतो. समाजात आणि व्यापारात तोच व्यक्ती जास्त काळ टिकू शकतो, ज्याने आपला मीपणा सोडलेला आहे.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

मान वाढवा !

जे कागद, नोटेच्या स्वरूपात किंवा धातुचे तुकडे, नाण्याच्या स्वरूपात किंवा डिजिटलचित्रे, विजेच्या सिग्नल स्वरूपात एकमेकांना व्यवहार समजून दिले...

एकूण पृष्ठदृश्ये :