ख म्हणजे, प्रकाशित करणे
ए म्हणजे, सरस्वती !
के म्हणजे, आंतरिक सृष्टीची सरस्वती !
पा म्हणजे, बाह्यदृष्टी !
न म्हणजे, शरीर किंवा शरीरे.
' खैके पान बनारस वाला, खुल जाये बंद अकल का ताला ! ' असे गीत आहे. तर, वाराणसीचे दृश्य बघून त्या व्यक्तीला अक्कल आलेली आहे. त्याने काय काय बघितले असावे ? वाराणसीला काळभैरवाकडनं यम लोकांना देखील दंड दिला जातो. एवढेच नव्हे, तर मरण सुद्धा मागून मिळत नाही. त्यामुळे लोक रस्त्यावर भीक मागून जीवन जगतात.
' का ' म्हणजे, बाहयसृष्टी ! आणि,
' शी ' म्हणजे, तुमची ऊर्जा किंवा एनर्जी मारली गेलेली आहे, अशी मृतप्राय स्थिती !
तुमची ऊर्जा मारली गेली आणि तुम्हाला बाह्यसृष्टीत आणून टाकून दिले, तर ती जी परिस्थिती आहे, ती ' काशी ' परिस्थिती आहे !
अशा परिस्थितीमध्ये देखील काळभैरवनाथ सर्वांना दंड देत असतात. प्रत्येकाचा हिशोब ठेवत असतात. हे कळल्यामुळे, काशीला आलेला तो व्यक्ती कितीही चालू असला, तरी त्याची चाल ' सिधी ' होते. म्हणून त्या गाण्यात असे म्हटले आहे की, : सीधी कर दे सबकी चाल ' ! म्हणजे, काशीमध्ये काळ भैरवनाथाचा दंड खाऊन सगळ्या चालू लोकांची चाल सरळ होऊन जाते. आणि हे सगळे पाहणे, व्यक्ती काशीला येऊन करतो. लोक मरण्यासाठी रांग लावून बसलेले असतात. चित्यावर चिता रोज जाळल्या जातात ! रोज गंगेची आरती होते. भगवंताला सतत प्रार्थना केली जाते. आणि हे सगळं बघितल्यावर एक उत्कट वैराग्य, व्यक्तीच्या मनात निर्माण होते. आणि सर्व अक्कल ठिकाणावर येते. जीवन नश्वर आहे. हे तर स्पष्ट झालेच असते. परंतु जीवन जगतांना जर काही चुका झाल्या तरी त्यांचे वाईट फळ भोगल्याशिवाय मरण देखील मिळत नाही. हे सुद्धा तेथे स्पष्ट होते. काशी क्षेत्रात प्रत्यक्ष दिसलेले प्रसंग हे आपले गुरु, आपल्या अज्ञानाचा अंधकार दूर करून, ज्ञानाची पहाट आयुष्यात आणतात.
सिस्टीममधले कच्चे लिंबू असोत, वा पक्के लिंबू असोत. सगळ्यांना चोळून चोळून शेवटी आगेतच टाकले जाणार आहे. हे रोज जळणाऱ्या चितेतून डोळ्यासमोर लक्खपणे स्पष्ट झालेले असते. देहभावाचे संपूर्ण उच्चाटन करण्याची शक्ती, या ' बनारसी पान ' म्हणजे, काशीच्या दृश्यांची पाहणी करून तयार होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा