ओरिजिनल मोनालिसाची चोरी !


मोनो म्हणजे, एकच !
अली म्हणजे, राम ! आणि, स: म्हणजे, हरी !
हे दोन्ही एकच परमेश्वराचे दोन रुपक नावे आहेत. हे सार सांगणारा शब्द आहे, ' मोनालिसा ! '

एकमेव अव्दितीय देव सर्वांचा एकच आहे. जो ना जनावर आहे, ना झाड आहे, ना स्त्री देह आहे, ना पुरुष देह आहे. तो कधीही जन्मलेला नाही. परंतु, देहबुद्धी असलेल्या मनुष्याला परमेश्वराला साकार रूपात बघायला आवडते. त्यामुळे, मुर्त्या, चित्रे, वर्णने, पुस्तक, पोथ्या, वास्तु बनवून साकाररूप देण्याचा, ताकद देण्याचा, निसर्गशक्ती वाढवण्याचा, तंत्र-मंत्र-यंत्र-जंत्र, बायो-सिम्युलेशन, आणि एक्सपेरिमेंट यांच्या शोधात अनेक साकार क्रिएशनस् बनली. 

खरा परमेश्वर हा कधी जन्माला नाही आणि कधीही जन्मणार देखील नाही. हे लोक विसरले. आणि एकमेकांना देवाची नावे देऊ लागले. आणि एकमेकांना देव समजू लागले. आणि याच कारणामुळे मनुष्यांनी शक्ती संवर्धन करून स्वतःला देव बनवणे सुरू केले. परिवार आणि जनतेने त्यांना समर्थन दिले. त्यामुळे, अनेक देवी, देवता, देव निर्माण झालेत. जे आपल्या मूळस्वरूपाला आणि मूळ देवाला विसरून, सेकंडरी देवांना पूजू लागले. कारण की, सेकंडरी देव हे त्यांचे दैहीक इच्छा लवकर पूर्ण करीत असत. देव होण्यामध्ये देखील लोक चढाओढ करतील. ज्याप्रमाणे राजा बनण्यासाठी किंवा अधिकारी बनण्यासाठी लोक चढाओढ करतात. त्याप्रमाणे, देव बनण्यासाठी देखील लोक चढाओढ करतील, हे लक्षात घेऊन, हाच तो सगळा खेळ, मोनालिसा पेंटिंग तयार करून अप्रत्यक्षरीत्या जनतेसमोर मांडलेला आहे.

आपण सामान्य जनता असल्याने आपल्याला ऐंग्लाईटमेंट जरी झाली तरी समाज मान्य करत नाही. आपण सेल्फ रिअलायझेशन फेलो झाल्याने खायला प्यायला मिळत नाही ! आणि जरी मिळाले, तरी सामाजिकदृष्टया फुकटाचे आपल्याला पचत नाही. मात्र, सेल्फ सर्व्हायव्हलसाठी ताकदवान सत्ताधिशाचा फेलो झाल्याने नोकरी मिळते. परिवार टिकवता येते. हे लोकांना लक्षात आल्याने लोकांनी स्वतःमधील एकमेव देवाला सोडून दिले. गरीब कुटुंबांमध्ये जन्मलेल्या आणि आईवडील नसलेल्या ज्ञानेश्वरांनी अनेक चमत्कार दाखवून अनेक जनावरांसारख्या लोकांकडून वेद वदवून दाखविले तरी त्यांना पैठणची त्या काळची डिग्री मिळाली नाही. त्यामुळे ऑफिशियल घर वसवता आले नाही. आपला स्वतःचा वेगळा संप्रदाय बनवावा लागला. 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ओरिजिनल मोनालिसाची चोरी !

मोनो म्हणजे, एकच ! अली म्हणजे, राम ! आणि,  स: म्हणजे, हरी ! हे दोन्ही एकच परमेश्वराचे दोन रुपक नावे आहेत.  हे सार सांगणारा शब्द आहे, ' म...

एकूण पृष्ठदृश्ये :