अनंत नागाला देहमुक्ती देणारा विठ्ठल !


श्रीकृष्णाच्या कथा ज्या ज्या लोकांनी वाचलेल्या आहेत. त्यांना माहित आहे की, श्रीकृष्णाने अनेक प्राण्यांना मारले. त्यात बगळे, बैल आणि नाग यांना मारल्याच्या विशेष कथा देखील प्रसिद्ध आहेत. श्रीकृष्ण स्वतः वासुदेवाच्या घरी जन्माला आला होता.  देवकीच्या पोटी जन्माला आला होता असे म्हटले जाते. वासुदेव हा स्वतः नाग होता, असे देखील काही लोक म्हणतात. ज्याप्रमाणे शेषाला नाग म्हटले आहे. त्याप्रमाणे वासुदेवाला देखील नाग म्हटले आहे. वासुदेवाच्या घरी श्रीकृष्ण सर्वप्रथम चतुर्भुज नारायणाच्या स्वरूपात प्रकट झाला. आणि नंतर लहान मूल बनला आणि देवकी वासुदेवाकडे बाळरूपात प्रकट झाला. जन्मल्याजन्मल्या बाळाची देवकी-वासुदेवाकडून, नंद-यशोदेकडे त्याची रवानगी झाली. आणि तेथे, लहानपणीच त्याने अनेक अद्भुत शक्तिशाली लिला केल्या. लहानपणीच जेल तोडून बाहेर आलेला श्रीकृष्ण, नंतर अनेक जनावरांच्या, राक्षसांच्या, देहरूपी कैदेला तोडून, त्यांच्या आत्म्याला मुक्ती देणारा ठरला.  श्रीकृष्णाने अनेक जंगली जनावरांना मारले. अजस्त्र अजगर आणि नागांना देखील मारले. किशोर वयात आल्यावर, त्याने कंस राजाला देखील घरात घुसून ठार केले. त्याआधी, चाणुरसारख्या मल्लाला देखील ठार केले. हे सगळे बाळ लिलेतील मुख्य प्रसंग आहेत. त्यासोबत, यमुनेचे पाणी खराब करून, गार्यींना मृत्यू देणारे विष ओकणाऱ्या कालिया नागाला देखील श्रीकृष्णाने धडा शिकवला आणि त्याचे डोके ठेचले होते.

या चरित्र प्रसंगांवरून देखील हे लक्षात येते की, श्रीकृष्णाला नागदेह, प्राणीदेह, राक्षसदेह मारायला आवडतात. मटकी फोडायला आवडतात. आणि त्या सगळ्यांमध्ये आत्मा जागृत करायला आवडतो ! कारण की, श्रीकृष्ण स्वतः, आत्मस्वरूप असलेला, देहधारी आत्मा होता. त्यामुळे त्याने सगळ्यांना मारून आत्मस्वरूपात स्थिर केले ! 

ॐ हे अक्षर श्रीकृष्णाचे आत्मस्वरूप आहे. विठ्ठल हे श्रीकृष्णाचे मनोस्वरूप आहे. विठ्ठलाच्या मूर्तीचा डावा पाय जर तुम्ही नीट निरखून बघितला. तर त्याच्या पायाच्या अनंताच्या बोटाच्या ठिकाणी, एक मोठा मस आहे ! 
अनंत हा देखील नाग होता. आणि त्या अनंतनागाला श्रीकृष्णाने ठार केले असावे. म्हणून अनंत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलाच्या पायाच्या बोटाच्या इथे मस आलेला दिसत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

' एक ' म्हणजे नक्की काय ?

साईबाबांनी ' सबका मालिक एक ' असे म्हटले आहे. तर हा ' एक ' म्हणजे नक्की काय ? याबाबत आपण विचार करायला हवा. ' एक ' ह...

एकूण पृष्ठदृश्ये :