' ई ' म्हणजे, ऊर्जा.
ऊर्जेचे अनेक प्रकार माणसाने बनवलेले आहेत. त्यापैकी ज्या ऊर्जा पॉझिटिव्ह आहेत, पोषक आहेत, उत्साहवर्धक आहेत, ज्ञानदायक आहेत, शक्तीदायक आहेत, आणि जीवन जगण्यास अनुकूल आहेत. त्या ऊर्जेला मनुष्य लोकात जास्त डिमांड आहे.
' क ' म्हणजे, आपली आंतरिक सृष्टी !
आपली आंतरिक सृष्टी ऊर्जा बनवत असते. ज्याप्रमाणे एखादे जनरेटर सतत वीज निर्माण करत असते, त्याप्रमाणे आपली आंतरिक सृष्टी ऊर्जा निर्मिती करत असते. ह्या ऊर्जेला ईक असे म्हटले आहे. जर ही ईक उपयोगाची असेल, तर तिचा एक्सचेंज आणि व्यवहारात फायदा होतो. व मुद्रा निर्मिती तसेच, चलनवाढीमध्ये फायदा होतो व अर्थव्यवस्था बळकट होते. भ म्हणजे, प्रकट होणे आणि ईक म्हणजे आंतरिक ऊर्जा !
तर अशाप्रकारे प्रकट झालेली आंतरिक ऊर्जा, ही ' भीक ' आहे !
अन्न, ऊर्जा आणि इंधन एकाच ठिकाणी जास्त काळ साठवून ठेवणे धोक्याचे असते. त्यामुळे, तुम्ही ही भीक ' देणे ' क्रमप्राप्त असते. परंतु जर तुम्ही इतरांकडून भीक घेत असाल. याचा अर्थ तुमच्या आंतरिक सृष्टीमध्ये गडबड आहे. तुमचे आंतरिक सृष्टीचे इंजिनमध्ये गडबड आहे. तुमची आंतरिक सृष्टी, जी ऊर्जा निर्मिती करीत आहे, ती उपयोगाची नाही. ती अडचणीची आहे. त्यामुळे तिचा तुम्हाला स्वतःला आणि इतरांना देखील उपयोग नाही. त्यामुळे तुम्ही इतरांना भिक देऊ शकत नाही ! तर तुम्ही स्वतः भिक मागतात. अशाप्रकारे भीक म्हणजे काय असते ? हा कन्सेप्ट मी तुम्हाला स्पष्ट केला.
हा कन्सेप्ट व्यक्तिगत लेव्हलपासून, परिवार लेवलपर्यंत आणि परिवार लेवलपासून समाज लेवलपर्यंत आणि समाज लेवलपासून राष्ट्र-देश आणि संपूर्ण जगापर्यंत वाढवला जाऊ शकतो. ज्यावेळेस तुम्ही, तुमचे राष्ट्र, समर्थ आणि आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करत असता, तेव्हा तुम्हाला, प्रत्येकाच्या आंतरिक सृष्टीच्या इंजिनावर काम करणे आवश्यक आहे.
आंतरिक सृष्टीचे इंजिन, जर पॉझिटिव्ह ऊर्जा, जीवनावश्यक ऊर्जा, सृष्टीला पोषक आणि सृष्टीला निरोगी राखण्याची ऊर्जा निर्माण करीत असेल, तर तुम्ही व्यक्तिगत पातळीवर आत्मनिर्भर होऊ शकतात. आणि त्यामुळे राष्ट्राला आत्मनिर्भर होण्यासाठी सहाय्यभूत होऊ शकतात.
भिऊ म्हणजे काय ?
ज्यावेळेला तुमच्या आंतरिक सृष्टीच्या इंजिनमधून निगेटिव्ह आणि दुःखदायक ऊर्जा निघत असेल, तर त्या प्रक्रियेला ' भिऊ ' असे म्हणतात. जी तुमच्यासाठी तर अडचणीची आहेच, परंतु इतरांसाठी देखील अडचणीची आहे. म्हणून श्री स्वामी समर्थ म्हणतात की, ' भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.' तुम्हाला तुमचे आंतरिक इंजिन स्वच्छ करण्यासाठी, श्री स्वामी समर्थ मार्गदर्शन करतील. म्हणजे, गुरुलोक तुमच्याकडून योग, याग, क्रिया, यज्ञ, कार्य करून, तुम्हाला पवित्र आणि पोषक अशी ऊर्जा निर्मिती करण्यासाठी, तुमचे आंतरिक सृष्टीचे इंजिन तयार करून देतील. व ते मेंटेन ठेवतील. गरज पडल्यास रिपेअर देखील करून देतील. हा त्याचा गर्भितार्थ लक्षात येण्यासारखा आहे.
जर तुमचे पुर्ण खानदान किंवा राष्ट्रच भिकारी झालेले असेल तर, पुऱ्याच्या पुऱ्या खानदानाने, नियमितपणे गुरुकडे जावून आपआपली आंतरीक इंजिने स्वच्छ व रिपेअर करून घेणे गरजेचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा