तुला वाटतं ना की, तुझ्या कानात मधुर शब्द पडावेत ! तुझे कान मोठे आहेत. आणि माझी पण इच्छा आहे मधुर शब्द द्यायचे. पण त्याच्यासाठी, तू मला तसं अनुकूल वातावरण निर्माण करून द्यायला पाहिजे, की ज्याच्यामुळे माझ्या तोंडातून मधुर शब्द बाहेर पडतील. बरोबर !
जर तुला तसं अनुकूल वातावरण निर्माण करून देता येत नसेल, तर तू कस काय अपेक्षा करते की, तुझ्याशी मी मधुर बोलू ?
जर तुला तसं अनुकूल वातावरण निर्माण करून देता येत नसेल, तर तू कस काय अपेक्षा करते की, तुझ्याशी मी मधुर बोलू ?
आता तुला असं वाटत असेल ना, की, मी छान छान बोलायला पाहिजे, देवी देवतांसारखे !
खूप तुला छान छान दाखवायला पाहिजे. एकदम स्वर्गातलं असे !
पण एकदम घाणेरडे सीन बघायला मिळतात. तरीपण, आपण साफसफाई करून, मनाची साफसफाई करून, तनाची साफसफाई करून, शरीराचा व्यायाम योगा प्राणायाम करून, ते घाण पचवायचा प्रयत्न करतो.
आपण जरी घाण खात असलो डुकरासारखी ! तरी आउटपुट आपण चांगला द्यायचा प्रयत्न करत असतो ! परफॉर्मन्स चांगला द्यायचा प्रयत्न करत असतो.
आपण जरी घाण खात असलो डुकरासारखी ! तरी आउटपुट आपण चांगला द्यायचा प्रयत्न करत असतो ! परफॉर्मन्स चांगला द्यायचा प्रयत्न करत असतो.
पण, त्याला लिमिट असतं !
आता, डुकराची जी कॅपॅसिटी आहे पचवण्याची ! ती हत्तीची सुद्धा नाहीये ! हाय का नाही ?
आता, डुकराची जी कॅपॅसिटी आहे पचवण्याची ! ती हत्तीची सुद्धा नाहीये ! हाय का नाही ?
त्याच्यामुळे, प्रत्येकाची पचवण्याची कॅपॅसिटी वेगळी आहे.
तसेच,
प्रत्येकजण काही मांस किंवा गवत खाऊन, दूध नाही देऊ शकत ! बरोबर !
त्यामुळे, जर कोणी सांगतोय की, मला इनपुट चांगला मिळण्यासाठी अनुकूल वातावरण बनवा.
तर आपण त्याला सहकार्य करायला हवे.
मी त्याच्यामुळे टीव्ही बंद केला किंवा पीस ऑफ माईंड चॅनल बघतो, आणि माझे सात्विक खातो ! कारण की, माझ्याकडंन बाकीचे, अत्यंत राजसिक किंवा तामसिक नाही पचवलं जात.
मी त्याच्यामुळे टीव्ही बंद केला किंवा पीस ऑफ माईंड चॅनल बघतो, आणि माझे सात्विक खातो ! कारण की, माझ्याकडंन बाकीचे, अत्यंत राजसिक किंवा तामसिक नाही पचवलं जात.
मला अमृत, नाही बाहेर काढता येत मला ! असं जर माणूस सांगत असेल, तरीपण त्याच्याकडून जर समजा, डुकरासारखी पचवण्याची अपेक्षा करत असाल, तर ते तुमचं चुकतंय ! मग, त्याच्यामुळे तुमच्या कानामध्ये अमृत नाही पडत. शिव्या पडतात ना ! तर दोन्हींचं याच्याने नुकसान होतं !
आपल्या नवराबायकोमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी लोक भांडण लावतील ! कारण त्यांना माहिती आहे की, यांच्यामध्ये जर भांडण लावलं, तर हे एकमेकांना सोडूनपण जात नाही, आणि त्याच्यामुळे हे सतत भांडत राहतील.
आपल्या नवराबायकोमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी लोक भांडण लावतील ! कारण त्यांना माहिती आहे की, यांच्यामध्ये जर भांडण लावलं, तर हे एकमेकांना सोडूनपण जात नाही, आणि त्याच्यामुळे हे सतत भांडत राहतील.
ज्याप्रमाणे, इलेक्ट्रिक मोटरमध्ये स्टेटर आणि रोटर असतात. त्याप्रमाणे, घरांमध्ये नवरा आणि बायको असते.
दोन्हीही कार्यरत असतात. कोणी दिसतं. कोणी नाही दिसत. पण दोन्हीही कार्यरत असतात !
त्याच्याचमुळे मोटर व्यवस्थित चालते !
जर त्यापैकी एकानेही गडबड केली, तर मोटर बंद पडते !
एवढेच नाही, तर जर रोटर स्टेटरला चिटकूनच राहिला, तरी चुंबकीय क्षेत्रामध्ये बिघाड होऊन, मोटर बंद पडते. त्यामुळे, मोटर चालू असतांना, स्टेटर आणि रोटरमध्ये विशिष्ट चुंबकीय क्षेत्राचा गॅप ठेवावा लागतो. त्यामुळे, आपण कामाच्या वेळेला, कामाचाच विचार करतो. आणि जेव्हा घरी असतो, तेव्हा आपण घरचाच विचार करतो. आपण घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवतो.
हकीमडॉक्टर गोळ्या देवून, लोक कानफुस करून, मेडीया इच्छा-विकार-वासना जागवून, नवराबायकोमध्ये भांडणे लावतात. कारण, पाटा वरवंट्याशी जितका घासला जाईल, तितका जास्त मसाला तयार होतो ! त्याप्रमाणे, नवरा बायकोमध्ये जितके जास्त ठुकाई-भांडण होईल, तितकी जास्त, त्याच्यामुळे ऊर्जा निर्माण होईल ! ज्याच्यावर त्यांचा धंदा नोकरी चालेल ! वीज निर्मिती, वीज पुरवठा होईल. त्यांना बसल्या बसल्या ! अशा पद्धतीने, लोक भांडण लावतात. हे लोक आपले नोकरचाकर, आईवडील, सासुसासरे, भाऊबहीण, मित्रमंडळी, बॉस, स्पर्धक, सहकारी, पाहुणे, मेव्हणे, सरकारी अधिकारीनोकर किंवा आपले क्लायंट देखील असू शकतात.
दरवेळी आबामामा, नानामामा, बाळूमामा, दादामामा यांनाच विचारायला पाहिजे का ? आपल्या स्वतःच्या अंगाचा भोळामामा जागृत नाही का ?
जर तुला थोडाफार कॉमनसेन्स असेल, अनुभवावरून, शाळा शिकून, किंवा काही शास्त्र शिकून, तर तुला हे समजायला पाहिजे.
आपल्यामध्ये जर भांडण झाले, तर कितीतरी लोकांना रोजगार मिळेल. याचा तू विचार करून बघ. स्वयंपाकवाली, हॉटेलवालीला रोजगार मिळेल, पोलिसाला रोजगार मिळेल. रिपोर्टरला रोजगार मिळेल. वकिलाला रोजगार मिळेल. जजला रोजगार मिळेल. नंतर कोर्टाच्या बाहेरील असलेल्या रसवंतीला रोजगार मिळेल. भजेवाल्याला रोजगार मिळेल. एवढेच नाही तर, प्रवचनामध्ये सांत्वना करणाऱ्या बाबाला देखील रोजगार मिळेल. म्हणजे, आपल्या दोन्हींमध्ये भांडण होणं, हे जागतिक चलन प्रवाही करून, अर्थव्यवस्थेला कार्यान्वित करण्यासारखे आहे. त्यामुळे, मग हे लोक त्यांचे पोटपाण्याचा धंदा चालण्यासाठी आपल्यामध्ये ठुकाई लावणारच ना ? आणि आपण त्यांना रोखू शकत नाही. सरकार देखील रोखू शकत नाही. सरकार फक्त त्यांच्या धंदयाला टॅक्स लावते.
हे जर तुला समजले, तर तुला यातून काहीतरी योग्य मार्ग काढता येईल ! की, ज्यामुळे आपले दोन्हींचे जगणे सुखकारक होईल. कारण की, देवाने आपल्याला बुद्धी आणि शक्ती दिलेली आहे. आणि देव असेच प्रॉब्लेम देतो की, जे आपल्याला सॉल्व करता येतात. फक्त त्यासाठी थोडा काळ शांत बसून ध्यान करणे आवश्यक आहे ! सगळेच प्रॉब्लेम गोळ्या खाऊन, किंवा झाडपाला खाऊन सॉल होत नाही. झाडपालाचे औषध जनावरांसाठी असते ! मनुष्यासाठी ध्यान हेच औषध आहे ! त्यामुळे आपण ध्यान करायला हवे. त्यासाठी आपण अनुकूल आंतरीक वातावरण निर्मिती केली पाहिजे. बाहेर आपली सत्ता नाही ! त्यामुळे, बाहेरच्या परिस्थितीला आपण चेंज करू शकत नाही ! मग काय करू शकतो बरे ? निदान आपण आपली आंतरिक स्थिती स्वस्थ ठेवण्यासाठी, सात्विक, पोषक, व्हिटॅमिन मिनरलयुक्त, वयाला, प्रोफेशनला आणि शरीरयष्टीला अनुकूल सुपाच्य आहार घेऊ शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा