अश्रूंचा सडा

प्रत्येकाने ठोश्याला ठोसाच द्यायचा , .....मग अश्रूंचा सडा कोणी प्यायचा ?

रक्ताळलेले अश्रू , चिम्ब पसरलेले..
आपलेच असून, दूरवर विखुरलेले..
... प्राक्तनाला दोष , कितीवेळा द्यायचा ?
अश्रूंचा सडा कोणी प्यायचा ?

आयुष्याची कुण्डली , कुन्ड़लीतले गणित
गणितातील अंकांचा , खेल किती पहायचा ?
......अश्रूंचा सडा ........?

शब्दांच्या जखमेवर , शब्दांचेच औषध
पण मौनातील दुःखांचा , विचार कधी व्हायचा ?
.....अश्रूंचा सडा .........?

माणसाने माणसानमध्ये , माणसा सारखे वागायच
वागवता वागवता , नागवल जायच
ह्या नग्न्तेला आधार कसा द्यायचा ?
....अश्रूंचा सडा.......?

1 टिप्पणी:

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ओ पियापिया, तुने क्यों गोविंद भुला दिया ?

ज्यांची अज्ञातपणे, अज्ञानवशात, किंवा अजाणतेपणे, किंवा हतबलतेमुळे, किंवा कर्मवशात, सुशुमनासरस्वती नाडी ब्लॉक झाली आहे. अशा लोकांना नामजपाचा व...

एकूण पृष्ठदृश्ये :