ब्रम्हा विष्णू महेश
सत्व रज तम
अशा ३ भागात शरीर विभागलेले असते.
डोके हे ब्रम्हाचे घर
धड हे विष्णूचे घर
आणि
कमर खालील सर्व शंकराचे घर
शंकराचा रस असतो वीर रस
विष्णूचा रस असतो दुग्धरस
आणि
ब्रम्हाचा ब्रम्हरस
ब्रम्हरस हा सर्व इतर शरिरातील रसांचे नियंत्रण करीत असतो
त्यालाच मेडीकल भाषेत मेंदूतील पिनियलग्रंथीचा हारमोन म्हणतात
जीवात्म्याचे शरीरातील स्थानही इथेच मेंदूतील पीनियल ग्रंथीजवळ असते. सात्वीक आहार विहार उच्चार आचार व्दारे शरीरात समता आणून
प्राणायाम जप ध्यान समाधी द्वारे ब्रम्हरसाचा आनंद मिळवून माणसाचे आयुष्य आणि आरोग्य अनेक पटीने वाढते. अनेक प्रकारच्या सिद्धी निधी मिळाल्यामूळे माणूस खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होतो . शीवतत्वाचे सत्यम् शिवम् सुंदरम् जीवन अनुभवू शकतो.
म्हणूनच सनातनशास्त्रामध्ये ब्रम्हाचे आयुष्य सर्वात जास्त सांगितलेले आहे.
काम /क्रोध /लोभ/ मद/ मोह /मत्सर /राग/ ईर्षा/ व्देष/ इतरांना दुःख देणे किंवा इतरांचे दुःख मनाला लावून घेणे/ अतीकाळजी/ अतीस्पर्धा/ अनैसर्गीक वर्तन / बर्हिगामी व्यक्तिमत्व म्हणजेच बाह्य जगाचे अंधानुकरण( अनुशीलन किंवा अवलोकन) म्हणजेच अंतर्दृष्टीचा ( सत्ज्ञान विवेकाचा) अभाव यामुळे ब्रम्ह रसाला पाझरण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. व आयुष्य/ आरोग्य कमी होते.
श्री . प्रशांत दिलीप मोरे .
Useful information
उत्तर द्याहटवा