सफाई कैसी होती है रे भाई ?

सफाई कैसी होती है रे भाई ?
जे लोक प्रदुषण प्रदुषण म्हणून बोंबलत फिरतात. स्वच्छता पाहीजे स्वच्छता पाहीजे करतात अश्या लोकांसाठी हा लेख आहे.
संपूर्ण सृष्टीवर विष्णु अवतारांचे राज्य आहे. शीव हे सुद्धा विष्णु अवतार आहेत. विष्णु सहस्त्रनामात याचा स्पष्ट उल्लेख आहे.
तेच सृष्टीचे चालक मालक पालक संचालक आणि स्वच्छ करणारे आहेत. सृष्टीला प्रदुषण मुक्त करणारे आहेत. कसे ते आपण बघुया.
आपल्याला ज्या तत्वाच्या प्रदुषणाचा त्रास होत आहे त्या तत्वाला प्रदुषण मुक्त करणाऱ्या अवताराचे ध्यान प्रार्थना करावी. त्यांना कार्यात सहकार्य करावे असा हा साधा सोपा मार्ग आहे.
जल शुद्धीकरण
जल शुद्ध मासे करतात. कासवं करतात. मासे कासवांना कणीकाचे गोळे, नारळ खावू घाला. कोळसे पाण्यातील
घाणवायू शोषून घेतात जेणेकरून मासे जगू शकतात त्यामूळे वाहत्या पाण्यात कोळसे घाला. प्लास्टीक मुळे पाणी तुंबते व प्रदुषीत होते त्यामुळे प्लास्टीकचा वापर बंद करा. कापडी पिशव्या वापरा. स्वतःच्या पोटातील जल शुद्धीकरणासाठी नारळाचे पाणी प्या. नारळाचे पदार्थ खा. मत्स अवतार कुर्म अवताराचे ध्यान करा.
पृथ्वीभूमी शुद्धीकरण
पृथ्वीवरील विष्ठा डुकरे साफ करतात. डुकरे पाळा. त्यांना मका खावू घाला. खादाड नातेवाईक, वरिष्ठ किंवा कनिष्ठ सहकारी किंवा पाहूणे अधिकारी यांना तुपाचा मोतीचुरचा लाडू, बेसनचा लाडू, पेढे खावू घाला. मसाला दूध आवडत असेल तर ते पिण्याची सोय करून द्या. शौकिनांना पान खाण्याची तसेच चित्रपट बघण्याची सोय करून द्या. वराह अवताराचे ध्यान करा.
आपण इतर लोकांशी असे वागावे की आपण त्या जागी असतो तर आपल्याला कसे वाटले असते ? आपले काय म्हणणे असते ? ह्या गोष्टीला लिव्हींग इन अनादर्स शूज किंवा अंडरस्टँडिग अदर बाय इनटीयुशन असे म्हणतात. पण याच्यात पण एक प्रॉब्लेम आहे . जर समोरील व्यक्ती मासाहारी असेल तर त्या व्यक्तीला शाकाहारी व्यक्तीच्या विचारांच्या झेपेपर्यंत पोहोचणे कठीण होऊन जाते कारण मांसाहारी व्यक्ती केवळ शरीर आणि अपरा प्रकृतीचाच विचार करत असते. त्यामुळे अशा सिच्युएशन मध्ये ड्राय डिटेल मिटींग करावी लागते. मिटींग करण्यासाठी दोन्ही पार्टीच्या लोकांची मानसिक तयारी ऐकून घेण्याची तयारी असावी लागते. सहनशक्ती फार लागते. मांसाहारी लोक आफ्टर लाईफचा बिलकुल अनुभव नसल्याने खूनशी बनतात. अशावेळी काडीमोड केलेली बरी नाहीतर सिस्टीम मध्ये गांधीजीं सारखी गोळी खावी लागते. कारण सिस्टीम ही अपरा प्रकृतीच्या मायावादी लोकांना बरोबर घेवून चालते. शहाण्या माणसाने अशा परिस्थितीत कायद्यानुसार जकात टॅक्स देवून मोकळे व्हावे. सांख्य योगाचा तपशीलात आभ्यास करून सिस्टीममधून स्वतःहून दूर व्हावे.
अग्नी शुद्धीकरण
अग्नीतील प्रदुषण लोणी दह्यातील जीवाणू साफ करतात. उपासतापास व्रत वैकल्ये केल्याने पोटातील अग्नी साफ होतो. उसाचा रस, संत्रीचा रस पिवून उपवास केल्याने तसेच
उंबर अंजिर खाल्याने सुद्धा पोटातील अग्नीला आराम पडतो. स्वतः एकादशी चतुर्थी पाळावी. भटकी कुत्रे गायी बैल मांजरी जनावरांना खावू घालावे. वृद्ध पालकांना पैसे द्यावे. आवड निवड बोल चाल ओळखून घरी आलेल्या व्यक्तीची सोय करून द्यावी. त्यासाठी सदर व्यक्तीचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेणेही तितकेच जरूरी आहे.
वरिष्ठ/कनिष्ठ सहकारी किंवा अधिकारी दुष्ट मांसाहारी असतील तर त्यांना मटन खाण्यासाठी पैसे द्यावे लागतात किंवा हॉटेलची सोय करून द्यावी लागते. शौकिनांना पान खाण्याची तसेच चित्रपट बघण्याची सोय करून द्यावी लागते. चहा नास्ता बेकरीची सोय करावी लागते.
शाकाहारी असतील तर त्यांना दुध बासुंदी खीर सारखे दुधदहीलोण्याचे पदार्थ खावू घालावे लागतात. नरसिंह अवताराचे ध्यान करा. एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा राहीला की स्वतःहून कधीही इंद्रीय विषयांची अॅडव्हॉकसी करू नये. लक्षात घ्या, मूळ कुराणात देखील कोठेही असे लिहिलेले नाही की मांस खा. नशा करा. दारु प्या. ज्या धर्मीयांना आफ्टर लाईफची बिलकुल कल्पना नाही ते लोक दारू मांस मदीरा याची अॅडव्हाँकसी करतात. आफ्टर लाईफ मध्ये आपली गोदावरी जर निर्मळ ठेवायची असेल तर शहाण्या माणसाने ह्या गोष्टींना सपोर्ट करणे टाळावे. जैन धर्मीय ही गोष्ट पुरती जाणत असल्याने ते  अॅलोपॅथीक औषधे घेणे देखील टाळतात. तोंडावर फडके बांधून घेतात. नशा करणारी औषधे, गुंगी आणणारी अन्न, मांस आदि गोष्टी अपरा प्रकृतीच्या आहेत. मोक्ष मार्गांतील अडथळे असल्यामूळे त्यांची अॅडव्होकसी कोणीही करत नाही. तुम्ही सिगारेट पिणाऱ्या व्यक्तीला विचारा तो सुद्धा सांगतो की सिगारेट पिणे वाईट व्यसन आहे. शरीर इंद्रियावरील ताबा सुटल्यामुळे मी खातो पितो. दारू पिणारे पण म्हणतात अरे समजून घे यार ! म्हणजे हे सगळे स्वतःची गोदावरी कावेरी खराब करून घेत आहेत कारण ते चक्रात फसलेले आहेत. घरात हे ज्ञान जरूर बैठक घेऊन सांगावे परंतु कुणी कार्यक्रम करत असतांना किंवा अंडी मांस खात असतांना मात्र हे ज्ञान त्या व्यक्तीला शिकवू नये.  जगात खूप मोठमोठी जनावरे आहेत याचे भान असू द्यावे.
वायू शुद्धीकरण
तुपाची आहूती देऊन होत्र हवन यज्ञ केल्याने वायुचे शुद्धीकरण होते. गायत्री मंत्राचा जप करा. फळ वाटप आणि पाणी वाटप करतांना देवाचा जप करा. स्वतःचे घर देवघर यज्ञघर मंदीर येथील स्वच्छता पवित्रता जपा. शुभ वाचा बोला. पवित्र ग्रंथांचे पारायणे करा. हळू आवाजात गोड वाणी बोला. पैश्याचा हिशोब काटेकोरपणे ठेवा. डायरी लिहा. एकाग्र चित्ताने व समजून उमजून कामे करा. संदर्भासहीत बोला. हेलसीन टाळा. बफे पद्धतीचा वापर अन्नदान पेयदान करतांना करा. अन्न आणि इंधन वाया जाणार नाही याची पहिल्यापासूनच काळजीपूर्वक नियोजन करून ठेवा. जागोजागी डस्टबीन वापरा. लोकांना गर्दी टाळून आवड व कॅटॅगिरीनुसार पंगतीला बसवा. इव्हेंट मॅनेजमेंट, रिलेशनशीप इमोशन मॅनेजमेंट करा. वामन अवताराचे ध्यान करा.
आकाश शुद्धीकरण
इथरचे प्रदुषण घालविण्यासाठी पायी पंढरपुरची वारी करावी. विठ्ठल नामाचा गजर आणि राम नामाचा मानसिक जप करावा. चहा कॉफी बंद करून गरम पाणी पिणे चालू करावे. शरीर व सिस्टीमचे प्रदुषण घालविण्यासाठी शाकाहार योगाभ्यास याचा पाठपुरवठा करावा. घराचे दाराचे तसेच सिस्टीम मधील आळशी प्रमादी भोगी चोरलोक टारगेट करून त्यांच्या हातातील पैसा, इंधन व सत्ता काढून घ्यावी व त्यांना बाजूला करावे किंवा नजरकैदेत / जेलमध्ये घालावे. अन्ननलीका वायूनलीका नस नाड्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी सूदर्शन क्रिया करा. प्राणायाम करा. विपश्यना करा. घरातील बायकांना नवरात्रीचा उपवास करण्यासाठी तसेच माणसांना षड्‌रात्रीचा उपवास करण्यासाठी प्रोत्साहित करा. बायकांना आकरा अलंकारात खूष ठेवून घरातल्या सर्वांवर इंद्रीय संयमनाचे संस्कार लहानपणापासूनच करा. भोगी लोकांना घरापासून दूर ठेवा. श्रीमंत जरी असले तरी भोगी लोकांना वेळीच ठेचा. त्यांना आपल्या घरात वरचढ बनू देवू नका. परंतु ज्ञानवंत श्रीमंतयोगी लोकांचा व्देष करू नका. त्यांच्यापासून शिकण्या सारखे काही असेल तर शिका.
 योगी संत महात्म्ये जे साधना, अभ्यास इंद्रीय संयमनावर भर देतात त्यांनाच घरी बोलवा. बाकीच्यांना बाहेरच्या बाहेर कटवा. घरातील सर्वांनी नियमितपणे व्यायाम करावा. संगती शुभ असावी. घरात व्यायाम योगा आहारविहार व्यवहार गीता उपनिषदे शास्त्र नीती संदर्भांत चांगली पुस्तके असावीत. मोहमायेपोटी फाजील लाड बंद करावेत. मुलांना जवळपासचे सार्वजनिक रुग्णालये कचेर्‍या मार्केट व्यापार पेढी गड किल्ले यांची सैर करवावी. मानसिक रोगी लोकांनी रामचरितमानस नियमित वाचावे. श्रीराम व परशुराम अवताराचे ध्यान करा.

इतपर्यंत पाच फणा असलेला नाग ज्याला म्हटले जाते त्या पांचाली, पंचपात्री , पंचतत्वांचे प्रदुषण कसे दुर करायचे ते आपण शिकलो ! हे सिस्टीममधील ग्रॉस घटक आहेत ! 
इतपर्यंत तुम्ही जर कर्तव्य करत आले आणि जिवंत वाचले तर,
यापुढील विष्णुंचे अवतार हे सिस्टीम मधील सब्टल घटकांची कशी सफाई करतात ते आपण पुढील लेखात पाहूयात. परमेश्वराच्या पराप्रकृतीला त्रास देणाऱ्या व कोणत्याही प्रकारे कायदयाच्या चौकटीत न सापडणाऱ्या लोकांच्या सफाईसाठी हे पुढील अवतार आहेत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

चिंता का चिता की आधीनता !

थोडा इतिहास आणि वर्तमानाचा आभ्यास केला तर, लक्षात येते की,  मानवाचा पुत्र ( तसेच, पुत्री / शिष्य / एम्प्लॉयी इ. इ.) , मुख्यत्वे तीन किंवा चा...

एकूण पृष्ठदृश्ये :