गोकुळला त्याच्या गौरी आईने तेल आणि तुप वाण्याकडून आणायला सांगितले होते परंतु गोकुळकडे भांडेच नसल्याने तो धुपाटणे घेऊन गेला. येतांना तेल आणि तुप दोन्ही सांडून हातात धुपाटणे परत घेवून आला.
ईश्वराने आपल्याला ब्रेन रूपी भांडे दिलेले आहे ! गुरुदेवांनी क्रियायोग साधनारूपी भांडे चमकवण्याची रीन दिली आहे.
आपले ब्रेन हे आपले श्रीयंत्र ! त्याला प्राणवायू जल हळद कुंकुमार्चन करण्याची प्रक्रिया हिच क्रियायोग साधना लक्ष्मी साधना आहे ! याने आपण संपूर्ण सृष्टीची सेवा करतो तेव्हा कोणाशी भांडण करण्याला वेळच मिळत नाही.
हे न करता आपण भौतिक वस्तु गोळा करून त्याच्यातच केवळ ज्ञान भरून ठेवण्याचा प्रयत्न करत बसलो तर मेल्यावर इश्वराला आपण विसरभोळा गोकुळासारखे धुपाटणे पेश करू !
शेवटपर्यंत डोक्यात गोविंद राधेश्याम भरून राहील !
व जगाने कितीही टांगा मारल्या, धक्के दिले तरी भांड्याचे धुपाटणे होणार नाही याची काळजी एकमेंकांनी घ्यायला नको का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा