Joker to Healer transformer Time

चेष्टामस्करी , अलबेलापन, विनोद करण्याचा स्वभाव ही एकेकाळी काळाची गरज होती. परंतु आताच्या सद्य परिस्थितीमध्ये असा स्वभाव असणे म्हणजे स्वतःवर आणि स्वतःच्या कुटुंबावर आणि स्वतःच्या परिवारावर दगड धोंडे पाडून घेणे आहे. कारण लोकांनी मूकपणे बदला घेण्याचे तंत्र विकसित केलेले आहेत ! कोणाशीही वाद न घालताही शांतपणे लोकांना बदले घेता येतात. व यामुळे आपल्याला नाहीतर आपल्या कुटुंबाला किंवा परिवार जणांना मोठ्या किमती चुकवाव्या लागतात ! हे आपण सर्वांनी लक्षात घेणे अत्यंत जरुरी आहे.

लोकांना समंजसपणा , अध्याहृत घेणे , इग्नोर करणे या गोष्टी तणावामुळे शक्य होत नाही व तणावाचा पहिला फटका चेष्टा-मस्करी करणाऱ्यावरच पडत असतो. जे लोक शांतीची प्रोफसी करणारे आहेत त्यांच्यामध्येही तणावाचे प्रमाण अत्यंत उच्च लेव्हलला गेलेले आहे ! जरी ते आपणास ते बोलून दाखवत नसतील तरीही ह्या गोष्टी आढळून आलेल्या आहेत ! त्यामुळे त्यांच्याशीसुद्धा आपल्याला खूप कॉमनसेन्स आणि चतुराईने बोलणे आहे. जरी ते दाखवत असतील की , आम्ही तुम्हाला समजून घेत आहोत , तुमचे म्हणणे ऐकून घेत आहोत आणि तुमच्या चेष्टा-मस्करी किंवा विचित्र वागणे याकडे दुर्लक्ष करीत आहोत , तर तो आपला स्वतःचा भ्रम आहे कारण की परिणाम दिसत आहेत.

स्वभाव बदलत नसतो पण आपण नवीन सवय स्वतःला लावून घेऊ शकतो !
या नवीन सवयींमध्ये सतत आशीर्वचने बोलणे , दुवा देणे , शांती प्रार्थना करणे , कल्याण प्रार्थना करणे अशा जर सवयी आपण सर्वांनी स्वतःला लावून घेतल्या तर बरेच दुष्परिणाम हे टाळता येतील. सामुहीक प्रार्थना सभेला आपणास रोगराईमुळे जाता येत नसल्याने कुटुंबात सर्वांनी एकत्र येवून सामुहीकपणे प्रकाशप्रार्थना सारख्या हिलिंग दूवा शांतीप्रार्थना करणेची सवय जर प्रत्येक कुटुंबाने लावून घेतली तर त्याचा त्यांनाच फायदा होणार आहे.

परिवारासाठी ही वेळ आपापसात समजूतदारपणा मिटींग्स डिस्कशन अंडरस्टँडिंग कॉम्प्रमाईजसिंग या गोष्टी करण्याची आहे ! कोणत्याही प्रकारचे सूक्ष्म स्वरूपात सुद्धा वाद घालण्याची ही वेळ नाही ! जय मल्हार ||🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

गोटी सोडा !

गोटी सोडा, गोटी सोडा ! राम धरा, बोटी सोडा !   गोटी सोडा, गोटी सोडा ! राम धरा, बोटी सोडा !   ॥ धृ ॥ वय झाले, चाळीशीचे ! बंधु आहेत, आळिशीचे...

एकूण पृष्ठदृश्ये :