भगवत् गीतेत सांगितलेल्या ' श्रीमत ' चा त्याग करून जीवात्मा जेव्हा सृष्टी चक्रात प्रवेश करतो. तेव्हा संस्कारांची जी कामना असते ती एका अनिमल स्पिरीट चे रूपात मनुष्याला साथ देते.
सृष्टीचक्रातून बाहेर पडतांना प्रचंड आक्रोश करून शरीर त्याग होतो. कदाचित हा आक्रोश ध्वनीच्या स्वरूपात नसेलही ! व डोळ्यांनीही दिसणार नाही ! पण साधारण डोळ्यांनी न दिसणाऱ्या तरंगांच्या (फ्रिक्वेन्सीच्या) स्वरूपात असतो.
अशाप्रकारे ८४ वेळा वेगवेगळ्या अनिमल स्पिरीट च्या शक्तीसाथीने सृष्टीत प्रवेश आणि आक्रोश करत बाहेर पडणे होते. यालाच कदाचित रावणाचा पडाव / म्हैशासुराचा वध म्हणत असावेत.
ही एक जिवात्म्याच्या आध्यात्मिक बुद्धी विकास आणि उत्क्रांतिची प्रक्रिया आहे.
त्यानंतर ऐन्जल स्पिरीट च्या साथीने जिवात्मा
' श्रीमत ' चा त्याग न करता सृष्टी प्रवेश करतो.
गुरुप्रणित विकास मार्गावर येवून जिवात्म्याला गुरु सेवा सत्संग साधना करून मोह नष्ट झाल्यावर स्मृति लाभल्यावर देखील पुढे २८ वेळा आक्रोश होतो.
हा आक्रोश अजाण जिवात्म्यांचे वार किंवा टोचण असह्य झाल्याने सिस्टीम बदलण्यासाठी किंवा स्वतःच्या मुक्तीसाठी असतो. ( संदर्भासाठी उदा. ज्ञानेश्वरांना संजिवन समाधित अजाण वृक्षाची मुळे टोचली. नामदेवांनी ती बाजुला केली.)
बोंबलल्याशिवाय बाळालाही दुध मिळत नसते. त्यामुळे अशावेळी आक्रोश हा होणारच ! आणि स्वतःहून आक्रोश केला नाही तर रावणासारखे किंवा कौरवांसारखे दुसऱ्यांकडून मरण तरी स्विकारावे लागणार ! स्क्रिप्ट आणि अनुभव तर हेच सांगतो.
अशाप्रकारे एकुण ८४ + २८ = ११२ वेळा जिवात्मा गर्जना (आक्रोश ) करत पूर्णत्व प्राप्त करतो.
कृपया संदर्भासाठी श्री जग्गी वासुदेव ( सद्गुरू) यांचा हा यु ट्युब व्हिडीओ पहा. https://youtu.be/OBK4cJNl1Qw
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा