आजचा जिव्हाळ्याचा विषय आहे, (उन्नतीसाठीचे) उन्नत पेय : टी
टि ढोसलणे आवश्यक आहे. कारण जोतो ऑफिसात बसून तथाकथीत बुद्धीचे काम करतो !
' ब्राऊन टी ' जो रेग्युलर टी असतो , आत्मनिर्भरतेची सकाळ त्याच्या डोसाने सुरु होते.
वातावरणाचा पारा तापु लागतो.
शरीरात उष्णता वाढली, की मग ब्लॅक टी सुरु होतो.
चवीसाठी लेमन टी, जिंजर टी सारखे प्रकार अधुनमधुन ट्राय करणे चालूच असते.
ब्लॅक टी चा कडु डोस असह्य झाला, की जीव कधीमधी कॉफी घ्यावी म्हणतो.
कप कॉफी काफी झाली , की कॉपर टी बसून मस्तपैकी घ्यावी असा विचार सुरु होतो.
ढेरंबा (प्रॉपर टी) बराच उन्नती गाठलेला असतो.
पाण्याचा गोडवाही तोपर्यंत संपलेला असतो. पाणी पितो आहे की थुंकी गिळतो आहे? काही कळेनासे होते.
अशावेळी हरि आठवतो. हिरवळ आठवते.
पेपर , मोबाईल आणि टिव्ही यावरील नजर तर हे डोळे चंद्रसूर्य असेपर्यंत काही सुटणार नसते. सोबत काही उन्नत पेयाची गरज असते.
पुरुषार्थ करून एक हाक मग टाकतोच माणूस ......
" अगं ऐकल का?.....
ग्रीन टी सुरु करावे म्हणतो. तब्येतीसाठी चांगले असते असे आजकालचे डॉक्टर म्हणतात. "
असे म्हणत खिडकीतून समोरील टपरीवर नजर टाकतो तर तेथेही एक नवीन प्रकार जॅगरी टी लाँच झालेला असतो.
टी पुराण संपता संपणार नसते कारण टी हे एक अमृततुल्य पेय असून कोणी एक कप टी चर्चा करण्यासाठी तर कोणी ओळख, मैत्री आणि व्यापार करण्यासाठी वापरणारच असतो.
इंग्रज भारतात आले तेव्हा पासून त्यांनी हा ' टी ' भारतात आणला असे म्हणतात !
परंतु त्यांच्या आधी मुगल भारतात आले तेव्हा त्यांचे पेय ' कावा ' घेवूनच आले. चहापावडर आणि दुध नसलेला हा एक चहा प्रकार आहे. काश्मिरात आजही हे पेय घेतले जाते. शीव कालीन इतिहासात मराठी लोक याला गनिमांचा ' कावा ' म्हणायचे. इतिहासात एवढ्या गदरी झाल्या पण हा ' कावा ' काही उडायला तयार नाही !
' भारती ' या शब्दाचा अर्थ सरस्वति हा होतो. मला तर असेही कधी कधी वाटते की भारताची सरस्वति गुप्त होण्यास हा जिभेला आणि मनाला हवा हवा वाटणारा चस्काच कारणीभूत असावा. आता तुम्हाला लक्षात आलेच असेल की, भारताला विदेशात ' इंडिया ' च म्हणतात. ' भारत ' असे का म्हणत नाही ते !
इंद्रियांचा सुळसुळाट वाढवून देशाच्या भूमीची प्रगती होत नसते तर नीतळ नदीच्या पाण्याच्या झुळझुळाटाने भूमिची प्रगती होत असते. सरस्वतिची ज्ञान प्रकटीकरण , इंद्रीय शुद्धीकरण , इंद्रीये नियमनामध्ये , तसेच आरोग्य प्राप्ती यात मोठी भुमिका असते. दिखावा ही गोष्ट वेगळी असते आणि प्रत्यक्ष प्रकटीकरण वेगळे.
भारत हा सध्या योगगुरू बनला आहे आणि योगाचे एक सुत्र आहे " समत्वं योग उच्चते | " , म्हणजे अतिरेक न करता आहार, विहार, व्यवहार आणि व्यापार जर नियंत्रित ठेवला तर योग ही टिकेल आणि भारतही !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा