स्वाध्याय न करता केवळ कॉपी करणे का वाईट आहे ?

कॉपी करणे का वाईट आहे ?

जो आभ्यास करत नाही. तो साहजीकच दुसऱ्याच्या आभ्यासाची चोरी करतो. जो स्वतःची सरस्वति जागृत करू शकत नाही तो परक्याच्या सरस्वतिवर काम करणारा प्रेत बनतो. जो केवळ लाळ घोटून घोटून चोर्या करून जीवन विद्यापन करतो तो जनावर बनतो. जो वेळ आली तर आपल्या मुलाबाळांना विकून फुकून खायला आणि वरून जगाला दोष द्यायला पण कमी करत नाहीत आणि टोळक्यात राहून काम करतो.

कुत्र्या सारखे इमानी आणि निर्लज्ज राहून अनेक नग्न जनावरे तरली हा इतिहास जगतमान्य आहे. याउलट ज्ञानोपासना व ज्ञानदान करणारे ज्योतिबा, ज्ञानोबा या सारखे महात्मे खस्ता खात जगले. मात्र त्यांचे नावं घेवून अनेकांनी तिजोर्या भरल्या आहेत. त्यामुळे इंडियात  जुगाड आणि कॉपीपेस्टचे कामे ( आणि आग जलवा लावण्याचे राजकारण ) जास्त होतात. ब्रेन ड्रेनचे हे एक मुख्य कारण म्हणता येईल. तंगडे तोडुन खाणारे प्रतिष्ठीत बुलडाँग-डॉगी हे नवीन भारतीय पिढीसाठी आदर्श म्हणून जर असतील तर ईंडीयाचे भारत कधी होईल का ?

एक काळ असाही येतो की, कॉपी करणाऱ्याला पोपट किंवा उल्लु बनावे लागते. त्यामुळे कुणाचीही कॉपी करू नये. उलट त्यांच्या गुणांची प्रसंशा करावी. सन्मान करावा. स्वाध्याय करण्यास अनुकूल वातावरण बनवून स्व आभ्यास करावा.

आनंदाने आपापली साधना गुप्तपणे साई सत्यनारायणाला साक्षी ठेवून करावी. त्याचे अवडंबर माजवू नये. मात्र चांगले गुण अंगीकारण्याचा जरूर प्रयत्न असावा. 

उच्च प्रतलावर जाण्याची ओढ जरूर असावी मात्र उच्च प्रतलावरील लोकांचा हेवा करू नये. कारण अशाने आपल्या साधनेत सातत्य राहत नाही. उच्च प्रतलावरील काही लोकांचे अवगुण बघून देखील दुःख होते. पण त्यांना त्यांची चुक दाखवणे आपल्या अधिकार क्षेत्रात येत नाही. त्यामुळे तेथून निघून जाणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे क्रमप्राप्त ठरते.

गरज पडली तर आपले अवगुण उघडपणे मान्य करावे व आपण आपले लिमिटेशनस् स्पष्ट करावेत. मात्र याचा अर्थ असा होत नाही की आपण माफीस पात्र झालोत. गुणांचे अनुशीलन चालू ठेवावे.

भक्तीने श्रद्धा सबुरी ठेवून शांतीत रहावे. दिव्यत्वाची जेथे प्रचती येते तेथे आपले कर आपोआप जोडले जातातच.
दया, क्षमा, शांतीचे शस्त्रे आध्यात्मात फार कामाचे आहेत. 

चोखंदळपणे गुरुप्रणित जीवनपद्धती अंगीकारावी. पण इतरांनी त्याचे अनुशीलन करावेच अशी आग्रही भूमिका नसावी.  कारण याचा अर्थ आपण बाह्य सृष्टीत आणि बाह्य दृष्टीत अडकलो आहोत, असा होतो. ' रंगात रंगूनी देखील रंग माझा वेगळा ' अशी भूमिका ठेवून समाजात कार्यरत असावे.

एक गोष्ट मात्र नमुद करावीशी वाटते, कलीयुगात 'कॉपी करणे , हरामखोरी करणे व ते इतरांना शिकवणे' याला जर स्मार्ट शिक्षण म्हणत असतील तर अशा  दिखावेबाज तथाकथीत स्मार्ट लोकांपासून सज्जनांनी दूर राहीलेलेच बरे ! नाही का ?  कारण इतरांच्या साधनेत बोटे घालणाऱ्या रावणाला दुःखद मरण येते.

दिखावेबाज बगळा बनू नये , तसेच चेष्टामस्करी करत वाकोल्या दाखवणारा विदुषकही बनू नये. सभ्यता व समत्व धारण करून योगाचा अंगीकार करावा. असे मानवी जीवनाचे मॅनुअल भगवत् गीता सांगते. 

जगाला प्रकाश देणारा दिवा स्वतःच्या बुडाचा अंधार दूर करू शकत नाही हे वास्तव असल्यामुळे आत्मोन्नति साधण्यासाठी बाह्यजगतावर विसंबून राहणे मुर्खपणाचेच ठरते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

मोक्षपटल : स्वतःच्या चौकशीचा खेळ !

स्वतःच्या विकासासाठी  खेळला जाणारा  स्वतःच्या चौकशीचा खेळ. GAME OF SELF ENQUIRY FOR SELF DEVELOPMENT. स्वतःच्या चौकशीच्या खेळातील चौकट रकाने...

एकूण पृष्ठदृश्ये :