मनुष्य प्राण्याच्या कानाला 'आध्यात्मिक योनी' असे का म्हटले जाते ?

मनुष्य प्राण्याच्या कानाला ' आध्यात्मिक योनी ' असे का म्हटले जाते ?

मागील लेखात आपण बुद्धीरूपी योनीचा ( ' धियोयोनः ' ) उल्लेख आभ्यासला. आज आपण कान किंवा कर्णरूपी योनी हा नक्की काय कन्सेप्ट आहे ते आभ्यासू.

कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला. 

स्त्री च्या योनीतून जसा बाळाचा जन्म होतो त्याप्रमाणे कानातून जन्म झाला असा स्पष्ट उल्लेख नवनाथ भक्तीसार या ग्रंथात आहे.

तर यामागे लेखकाला काय साररूपी विज्ञान सांगायचे आहे यावर मनन करूयात.

स्त्रीच्या योनी मध्ये मोत्याच्या दाण्याएवढा विर्यबिंदू प्रवेश करतो. आणि ९ महिन्यांनी २.५ -३ किलो वजनाचे बाळ बाहेर पडते. 

मनुष्याच्या कानात अनेक शब्द पडत असतात पण जर तेजो भारीत सत्पुरुषाचे शब्द कानावर पडले आणि ते त्या व्यक्तीने पकडून ठेवले , त्यावर मनन चिंतन केले तर काही काळानंतर त्या तेजोभारीत शब्दांचा चिंतनाचा परिणाम आपल्या शरीर इंद्रीये तसेच आपल्या आजुबाजुच्या वातावरणात स्पष्ट दिसू लागतो. असा अनेकांचा अनुभव आहे.

म्हणजे हा जो काही अपेक्षीत दिर्घ बदल वातावरण , पर्यावरण , सामाजिक शरीर आणि स्वतःच्या शरीरात झालेला आहे. तो ऐकेकाळी कानरूपी योनीने स्विकारलेल्या तेजोमय शब्द विचार उच्चार किंवा बीजाक्षरांचा परिणाम आहे. अशाप्रकारे मनुष्याचे कर्ण हे जणू योनीसारखेच काम करतात. 

" कुंभकर्ण " हा देखील असाच कन्सेप्ट आहे. शरीररूपी कुंभ , बुद्धीरूपी कुंभ , मनरूपी कुंभ असे वेगवेगळे कुंभाचे प्रकार म्हणता येईल .
नाथ लोक त्याला बाटली , बुधले किंवा भरतरी देखील म्हणतात . ह्या कुंभाला जो कर्ण असतो म्हणजे ज्याच्यातून कुंभात पाणी भरले जाते ते कुंभाचे तोंड !
कोणी त्याला कर्ण रूपी योनी म्हणू शकतात ! 

अनाहत ध्वनी कानांनी ऐकू येतात, आकाशवाणी कानांनी ऐकू येते, अदृश्य जगतातील तिन्ही काळातील आकाशीक रेकॉर्ड ध्यानाने व मंत्र साधनेने ऐकता येतात. 

ह्या गोष्टी योग्यांना सहज शक्य असतात पण त्यातच अटकुन बसलो तर गोकर्ण महाबळेश्वरला रावणाची जशी गत झाली होती तशी होते. 

 प्रचार प्रसार माध्यमातिल काही डायलॉक किंवा चित्रपटातील गीते ही पूर्ण रियाज करून करून संपूर्ण शक्तीनीशी बनविली जातात त्यामुळे बऱ्याचशा व्यक्तींना ती गाणी सतत आठवत राहतात. जणू काही कर्णरूपी योनीने ती कन्सीव्ह केलेली आहेत. जर अशा बाहय गोष्टी आपल्याला आपल्या स्वाध्याय आभ्यास किंवा उन्नतित त्रासदायक अडथळा ठरत असतील तर अशा गोष्टी त्या व्यक्तीला कर्णपिशाच्च वाटतात.

ज्या ठिकाणी केवळ मानसिक चिंतन होते, शरीराला आवश्यक असलेला शारीरीक व्यायाम होत नाही अशा ठिकाणी शरीरातून ऋणशकती भारीत विद्युत किंवा उर्जा स्पंदने प्रक्षेपित होण्याची शक्यता असते.

मनाच्या विचाराची जशी तरंगे किंवा स्पंदने असतात. तशीच ध्वनीची देखील तरंगे किंवा स्पंदने असतात.

संसारात धन प्रपंच चालवतांना वाईट शब्द कानावर पडतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आत्मोन्नति साधावी याची सांकेतिक पद्धतिने शिकवण हिंदू देवतांच्या कानावरील मकर किंवा मत्स्य कुंडले देत असावीत.

बरेच लोक घरात मंदीरात कोहळे फडक्यात बांधून ठेवतात. ह्या कोहळ्यांमध्ये ऋण विद्युतभारीत स्पंदने आकृष्ट आणि स्टोअर करण्याची शक्ती असावी . म्हणून स्पंदनांच्या शुद्धी साठी हा उपाय लोक करीत असावेत.

राजयोग साधनेत मन बुद्धी शरीर यांची शुद्धता आणि पवित्रता यावर फार भर दिला जातो कारण त्यामुळे आत्म्याची पवित्रता साध्य करण्यात व योग जुळण्यात मदत होत असते.

संस्कार जे शरीरावर मनावर आणि वाणीवर केले जातात त्यात  मंत्र उच्चारण, स्तोत्र पठण, पवित्र ग्रंथ वाचन यांचा समावेश होतो. कारण शब्दांमध्ये व व्यक्तीच्या चिंतनामध्ये फार मोठी शक्ती असते. बायबल मध्ये तर शब्द रूपी ध्वनीला देवाची उपमा दिलेली आहे आणि सृष्टी प्रकट होण्या आधी केवळ शब्दरूपी ध्वनी होता आणि तो शब्दच देव होता असा स्पष्ट उल्लेख आहे. 

 गायत्री , मृत्युंजय सारख्या शुभ मंत्रांचे उच्चारण शुभ भावनेने करणे हे रेकी हिलींग मधल्या अफरमेशन स्पेल किंवा अॅफरमेशन वर्ड सारखे काम करते. ज्यामुळे शुभ कर्म घडून येतात व शाप, तळतळाट ( हेक्सेस, कर्सेस ) सारखे संकटे येण्याची वेळच येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

मोक्षपटल : स्वतःच्या चौकशीचा खेळ !

स्वतःच्या विकासासाठी  खेळला जाणारा  स्वतःच्या चौकशीचा खेळ. GAME OF SELF ENQUIRY FOR SELF DEVELOPMENT. स्वतःच्या चौकशीच्या खेळातील चौकट रकाने...

एकूण पृष्ठदृश्ये :