दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र हे समाज परिवार देश कुटुंबासाठी का अनुकूल आहे ?



दिंडोरी प्रणीत केंद्राला मंदीर कधीही म्हटले गेलेले नाही. मंदीरात एकच पुजारी असतो. केंद्रात सर्व सेवेकरी असतात.

श्री स्वामी समर्थ केंद्रातील शिस्त स्वच्छता पवित्रता डोळ्यात भरणारी श्वासात जाणवणारी इंद्रीये उल्हासित करणारी असते. नित्य होम हवनामुळे निर्माण होणारी स्पंदने आरोग्यदायी असतात. स्वयंशिस्त, इंद्रीय संयमना बाबत श्री स्वामी समर्थ सेवेकरी आणि त्यांची मुले जागरूक असतात.

विषारी हिंस्त्र जनावरे तसेच व्यसनी धुर्त व्यक्ती ' श्री स्वामी समर्थ' केंद्रात यायला धजावत नाहीत. ते अधिकृत केंद्रात टिकू शकत नाहीत.  श्री स्वामी समर्थ केंद्रातील शिवपिंडी वर कधीही नाग नसतो. 

श्री स्वामी समर्थ केंद्रात येतांना अहंकार बाहेरच पार्क करून हातपाय धुवूनच प्रवेश मिळतो. 

पैसे देणगी देणाऱ्या व्यक्तीला केंद्रात विशेष महत्व नाही परंतु खरोखर नित्य सेवा करणाऱ्याला केंद्रात महाराज  आपलेसे करतात हे अनुभवसिद्ध तथ्य आहे. भिकारी लोक कधीही केंद्राबाहेर गर्दी केलेले आढळणार नाही.

तिन्ही लोकी फिरून अनुभवून सर्व वैद्य बुवा बाबा करून पैश्याची सत्तेची अहंकाराची गुर्मी उतरल्यावर स्वामींच्या चरणी नतमस्तक झालेले अनेक व्यक्ती आहेत. सेवेकरी झालेले आहेत.

"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." असे अभयवचन देऊन महाराजांनी अज्ञानी, अजाण बालकांपासून जाणत्या वृद्धांपर्यंत सर्वांना आपलेसे केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

कृष्णम् वंदे जगद्गुरू !

क म्हणजे, आंतरिक सृष्टी ! रू (ऋ) म्हणजे, अंतरात्मा ! ष्ण म्हणजे, आपल्याला उपलब्ध झालेल्या काळात पोषित होणे ! म म्हणजे, हरितत्वाची फर...

एकूण पृष्ठदृश्ये :