ध्यानयोगाने मुक्त न झाल्यामुळे अज्ञानी हतबल आत्मा तिथेच उभा असतो त्याला पुढे काय आणि कसा प्रवास करावा याची हिंट देण्यात येते.
१) पुढ्चा जन्म मिळावा यासाठी तोंडाने तुळजाभवानी मातेचा किंवा गंगा गोदावरी मातेचा किंवा गणपतीचा जप करावा ही एक हिंट असावी.
२) तुळशी किंवा गंगा ही पवित्र करणारी पाप धुणारी मानली जाते. तोंडाने मनाने शुभ पवित्र भावनेने जप करावा. ही दुसरी हिंट !
३) गणपती हा शुभ मंगल कारक आणि विघन हर्ता सुखकर्ता मानला जातो. गं ह्या जपाने समोरील प्रवासातील अडचणी दूर होतील ही एक भावना असावी.
४) जीवाला शरीर धारण करणे आणि सोडणे गणपतीमुळे सोपे होते. त्याचप्रमाणे गणपती हा विद्या बुद्धी देणारा गुरु आहे. त्यामुळे त्याची सेवा योगी ध्यानी लोकांसाठी सुद्धा अनिवार्य आहे. गणपती सेवेमुळे मन बुद्धी ताळ्यावर राहते प्रमाद टळतात आशीर्वाद मिळतात.
५) तुळ म्हणजे तराजू ! दुसरी म्हणजे तामसिक लोकांचा आधार घेऊन कर्मात पुण्य वाढवण्याची सुचना ! जेणेकरून पुढ्च्या गतीसाठी आवश्यक असलेले आशीर्वाद प्राप्त होतील.
६) मृताच्या घरी गरुडपुराणाचे वाचन देखील काही ठिकाणी करतात. जीवंतपणी आभ्यास न केल्याने गरुडपुराणातील दाखले देऊन पुढिल कर्म सुधारण्यास प्रेरीत केले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा