पसायदानाचा लोकांनी घेतलेला गैरफायदा

(People Paradox of Pasaydan)

विश्वसृष्टीत दोन प्रकारच्या प्रकृती आहेत. परा प्रकृती आणि अपरा प्रकृती !

पराप्रकृती जिवात्म्याला परमात्म्याकडे सुखरूपपणे नेण्यास खुपच सहाय्यभूत असणारी प्रकृती आहे.

अपरा प्रकृती जिवात्म्याला मायेत घसिटते आणि परमात्म्या पासून दूर विलग करून ठेवते. अपरा प्रकृतीच्या या स्वभावामुळे ती परमात्म्याच्या रोषाला सामोरी जाते. कारण मुक्तीच्या मार्गातील ती प्रमुख अडसर आहे. आणि दुःखदायक संसाराला ती मायीक विकाराने शृंगार करून जिवात्म्याचा भयंकर छळ करत असते.

ज्ञानदेवांनी पसायदानात विश्वात्मक देवाकडे मागणे केले आहे त्यात खल आणि दुर्जन म्हणजे सैतान प्रवृत्ती किंवा अपरा प्रकृतीच्या लोकांच्या कल्याणासाठी विशेष भर दिला आहे.

श्रीगुरुदेवदत्त यांना अवधूत चिंतन असे म्हटले जाते. अवगुणी लोकांना फ्लश आऊट करणे किंवा धुवून स्वच्छ करणे असा त्याचा सरळसरळ अर्थ होतो.

याउलट अवतार या शब्दाचा अर्थ होतो की अवगुणी लोकांना तारणारा ! भगवान अवतार घेतात ते पतीत म्हणजेच अवगुणी म्हणजेच दुष्ट सैतानी लोकांना तारण्यासाठी !

कारण जे गुणी आहेत विद्वान आहेत ज्ञानी आहेत त्यांनी अगोदरच स्वतःचे कल्याण साधलेले असते ! आणि चक्रमुक्ती आणि जिवनमुक्ती पूर्णपणे साध्य करून उच्च प्रतलावर सुरक्षीत स्थित झालेले असतात. कोणताही शाहाणा माणूस परत चक्कर मध्ये फसायला जाणार नाही. चक्र मुक्त झालेल्यांना परतपरत चक्रात जाणारी अवदसा व्हायचे नसते म्हणून त्यांनी अवदसेला स्पॉन्सर करणे सुरु केले. अवदसेला पोसून तिच्याकडून टेनिस खेळवून घेतले.

 महाअवतार बाबाजी कृष्ण कृत्यात रमलेल्या सर्वांना तारण्यासाठी ध्यानाचा सुगम मार्ग प्रदर्शीत करत आहेत.

ध्यानाने व्यक्ती आदिपुरुषाचे अखंड ध्यान करून आत्म कल्याण साधून घेऊ शकतो.

इतिहास जर आभ्यासला तर उच्चभ्रु व्यक्ती ज्ञानी व्यक्ती सुद्धा ध्यान योगाच्या अभावाने संसारपंकात घसरलेले आहेत पतीत झालेले आहेत. याउलट अधम नीच अज्ञानी खल व्यक्ती ध्यान योगाच्या सहाय्याने मुक्त प्रतिष्ठीत झालेले आहेत.


पसायदानाने लोकांची संसारातील रती आणखीनच वाढली. त्यामूळे घराघरात विसडम म्हणजे चातुर्य याला शुद्ध बुद्ध पवित्र ज्ञानापेक्षा प्रमाणापेक्षा जास्त महत्व प्राप्त झाले. एवढेच नाही तर किंबहूना विसडमशिवाय जगणे अशक्य झाले. 

सुक्ष्म विकारांना पोषण मिळू लागल्याने ते बळावले व गुपचुप एकमेकांची कुरघोडी काढणे यासारख्या सैतानी अपरा प्रकृती घरात स्थिरावल्या.

विद्वान लोक पैसा प्रतिष्ठा ढोंग याची शोभा करू लागले व परतीच्या प्रवासालाच विसरले. कर्मातील सुक्ष्म चुका सुद्धा त्यांना परतीच्या प्रवासात अडसर बनू लागल्या.

तोंडावर मित्र असणारी मंडळी आतून एकमेकांवर जळू लागली. एकंदरीतच काय सर्वांचे एकसाथ अधोगतीच झाली. अशात कोणी ज्ञान शिकवायला लागला तर त्याचे समाज दुस्वास करू लागला त्यामुळे मनातून अधम असलेल्या अवगुणी लोकांना विश्वाचे आंगण नांदायला मिळाल्यासारखे झाले.

जो जे वांझिल तो ते लाहो या उक्ती प्रमाणे लोक आपली इच्छा पुरविण्या मध्येच रत झाली. कारण त्या पूर्ण होऊ लागल्या होत्या. उणीदुणी काढण्यामध्येच जिवन संपवू लागली. व प्राणीजातीतून बाहेर आलीच नाही. ध्यान समाधीची प्रॅक्टीस संपली व शरीर वृद्ध कधी झाले हे कळलेच नाही. ध्यानयोग समाधीच्या ऐवजी औषधी ट्रिटमेंट लोकांना जास्त जवळच्या वाटल्या. तारुण्य टिकवणारे ययातिची संख्या वाढली. अशापरिस्थिती ज्या शरीराने ज्ञान धारण करून ठेवलेले होते त्या ज्ञानी पवित्र शरीराला दुःख आजार रोगांनी ग्रासले. त्यामूळे अंतकाळी परमेश्वराचे स्मरण होणे दुरापास्त होऊन गेले.

ध्यान योग सिद्ध समाधिस्थ चक्रमुक्त जिवनमुक्ती मिळविण्यात यशस्वी झाले ते खरे स्थिर दृढ बुद्धीचे धैर्यशील राम कधीच विमानावर स्वार होऊन संसार पार झाले होते. बाकीचे घसिटाराम संसार चक्रात परतपरत घसिटले गेले.

दुर्गण सोडून कर्म जाळून पवित्र झाल्याशिवाय आणि अवगुण सोडल्याशिवाय ध्यान समाधित स्थिर होणे संसारी माणसाला दुरापास्त होते. हा शरीरमन प्रकृतीचा नियम आहे.

आणि आयुष्यभर नियमित क्रिया योग ध्यान केल्याशिवाय अंतकाळी अवतार बाबाजीपण तुम्हाला काहीही मदत करू शकणार नाहीत हे लोक सपशेल विसरले आहेत.

ज्यांना हे सगळे दिसते आहे पण करता काहीच येत नाही त्यांच्या तोंडात पॉझिटीव्ह थिंकिंगची दुधाची बाटली खोचण्यात आलेली आहे. उशीरा बोध उपरती झालेल्या अपरा प्रकृतीच्या लोकांना आयसियु अॅडमीट करून घेतलेले आहे. बाकी तोंडात बोट घालून येडाबनून पेढा खाण्याचे नाटक करीत आहेत. काहींनी ड्रामा हाच उत्पन्नाचे साधन बनविले आहे.

अशा परिस्थितीत पार झालेले बगळे तुमच्या भावनांचा सुद्धा व्यापार मांडून प्रॉफिट बुक करण्याची ट्रेनिंग घेवून तुमच्यावर नजर लावून बसलेले आहेत. 

प्रत्येक गोष्टीत टेकनॉलॉजी गॅजेट यांचा बाजार मांडून जीवनविम्याची महती सांगत तुमच्यावर सॅटेलाईट शस्त्र अस्त्र दुर्बीणी लावून बसलेले आहेत.

आदिवासी लोक परत नरबळी देण्याच्या आपल्या जून्या सवयीकडे वळायला नकोत याची काळजी घ्यायला पाहीजे. जडत्वाला चिटकून राहीलेले आदीमवासी लोक आपल्या पाल्यांचाच बळी देतात किंवा त्यांना बाहेर बळीचा बकरा शोधायला पाठवतात. अशीच काहीशी स्थिती शारीरीक दिव्यत्व नष्ट झाल्यावर होते. बिझीनेस स्कुल हीच गोष्ट ग्रुपमध्ये करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

मान वाढवा !

जे कागद, नोटेच्या स्वरूपात किंवा धातुचे तुकडे, नाण्याच्या स्वरूपात किंवा डिजिटलचित्रे, विजेच्या सिग्नल स्वरूपात एकमेकांना व्यवहार समजून दिले...

एकूण पृष्ठदृश्ये :