जीवनात कोणाचाही नाद करून टाईम का घालवू नये ?


जीवनात कोणाचाही नाद करून टाईम का घालवू नये ?

जे मुक्तात्मे आपल्याला भाव देत नाही ! गोड स्माईल आणि गोड बोलण्यावरच आपल्याला पोट भरण्यास सांगतात.
ते पुढील आयुष्यातही कधी भाव देणार नाही ।
त्यामुळे त्यांना हुसकू नये ! परंतु त्यांच्या बैठकीत बसू नये ! त्यांच्या कडून मार्गदर्शनाची अपेक्षा करू नये ! माणूसकीची याचना करू नये ! त्यांना शिकवू नये ! त्यांना विचारू नये ! त्यांच्याशी वादही करू नये आणि त्यांचा नाद करू नये !

त्याऊलट जे मुक्तात्मे स्वःतःहून मदत करतात ! आपल्याला काय हवे काय नको ते विचारतात. मनस्वी चांगले वागतात.
ते पुढील आयुष्यातही मदत करत राहतील ! त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी तितकेच प्रेमाने वागा ! त्यांच्या चांगुलपणाचा टेकन ग्रँटेड घेवू नका ! त्यांचा अपमान करू नका ! त्यांच्या चांगुलपणाची परिक्षा घेण्याची चुक करू नका !

ज्याप्रमाणे जगात सगळे हिरे आकर्षकच असतात परंतु आपल्या राशीला सुट होणारा हिराच आपल्याला घ्यायचा असतो !

आपला अॅस्ट्रल पाईप नेमका कोणता आहे ?

 कोण खरोखर आपल्या आयुष्याच्या झाडाला पाणी देत आहे ? हे समजून घेणे आवश्यक आहे.

कोणत्या पाईप मधून खरोखर पोषण येते आणि कोणता पाईप केवळ शोभेचे मनोरंजन करतो आणि आयुष्य वेळ बरबाद करतो हे तत्काळ समजले पाहीजे व लवकर निर्णय घेतला गेला पाहीजे.

जेनो काम तेणे ठाय, दुजा करे तो गोता खाय ! अशी म्हण आहे. आपले काम सिस्टीम प्रोटोकॉल पाळून आपल्या पोर्टफोलीओला शोभेल असे करावे ! आपले कर्तव्य धर्मात कसूर ठेऊ नये ! भगवान म्हणतात, स्वधर्मे निधनं श्रेय, परधर्मो भयावहः । म्हणजे दुसऱ्यांच्या कामाची उपेक्षा किंवा अपेक्षा न करता स्वकर्तव्य पूर्ण करणे श्रेयस्कर असते.  

ज्याप्रमाणे आपली अपेक्षा असते की आपल्या शरीरातील पेशीने इतर वेगवेगळे काम करणाऱ्या वेगवेगळ्या प्रकृतीच्या पेशींशी चांगला व्यवहार केला पाहीजे जेणेकरून त्या दुखविल्या जाणार नाही. व शरीरात बिघाड होणार नाही.
त्याचप्रमाणे परिवार, समाज, देशसिस्टीममध्ये  आणि विश्वरूपी शरीरात काम व्यवहार करतांना सदर काळजी बुद्धीचातुर्याने घेतली गेली पाहीजे ! हे जगण्याचे एक महत्वाचे कौशल्य आहे त्यामुळेच शिक्षणात मॅनर्स व्यवहार कौशल्य मॅनेजमेंट व्यवस्थापनाबरोबरच काळानुसार स्वतःच्या भावनेचे व्यवस्थापन आणि शरीर क्रियांचे नियोजन जास्त महत्वाचे मानले जाते.त्यासाठी विसडम चतुरपणा व्यवस्थापन कौशल्य वेळकाळ ध्यान याचा आभ्यास असावा लागतो !





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ओरिजिनल मोनालिसाची चोरी !

मोनो म्हणजे, एकच ! अली म्हणजे, राम ! आणि,  स: म्हणजे, हरी ! हे दोन्ही एकच परमेश्वराचे दोन रुपक नावे आहेत.  हे सार सांगणारा शब्द आहे, ' म...

एकूण पृष्ठदृश्ये :