पाईप ऑफ डिव्हाईन कनेक्शन

कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वति, करमध्ये तु गोविंदा, प्रभाते करदर्शनम्

समोरच्या व्यक्तीमध्ये आत्मा कसा पहावा याचे यथोचित वर्णन सदर श्लोकामध्ये केलेले आहे. आपण तो श्लोक लहानपणापासून ऐकत बोलत आलेलो आहोत. 

बघा, ऋषीमुनी त्रिकालज्ञ आणि युगज्ञ मनोज्ञ होते त्यामुळे त्यांचे ज्ञान पोहोचवण्याची ताकद अक्कल हुशारी दिसून येते.
*कार* म्हणजे भौतिक दृश्यशरीर. 
संस्कार अनुभव आणि इच्छावासना धारण केलेला
शरीरातील अदृश्य सुक्ष्म शरीर म्हणजे *कर*
*आभा* म्हणजे मनोमय कोष असलेले शरीर आभामंडळाच्या स्वरूपात भासते जे भौतिक शरीराला व्यापून असते.

आत्म्याच्या समोर अग्रभागी लक्ष्मी असते.
आत्म्याचे मूळ सरस्वति असते.
आत्मा स्वतः गोविंद स्वरूप असतो.
जेव्हा कुणी व्यक्ती तुमच्या समोर येते तेव्हा त्या व्यक्तीचे आभामंडळ, आत्मासहीत भौतिक शरीर तुमच्या पुढे उभे असते. तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये आत्म्याचे दर्शन करा.

आत्म्या मध्ये संकिर्ण स्वरूपात संपुर्ण शरीर निर्मितीची माहीती असते. तिला बॉडी स्टार, अॅस्ट्रल स्टार असेही म्हणतात. सदर श्लोकात त्याला ' कर' असे संबोधीले आहे.
आपले शरीर स्टार स्वरूप आहे त्याला बॉडी स्टार असे म्हणतात ज्याला पाच किरणे असतात. वरचा किरण म्हणजे डोके, आजुबाजुचे हात आणि खालचे दोन पाय असे मिळून उर्वरीत चार किरणे. आणि या प्रत्येक किरणाला परत पाच उपकिरणे आहेत. डोक्याला पंचेंद्रीये आणि हातापायांना पाचपाच बोटे अशी ती उपकिरणे होत. 

पाच किरणाच्या मध्यभागी केंद्र असते. येथे उर्जेच्या
पाईपची ओपनींग असते.
शरीराच्या मध्यभागी हृदय केंद्र आहे.
डोक्याच्या पंचेंद्रियाच्या मध्यभागी भ्रुकुटीत केंद्र आहे. येथून अॅस्ट्रल पाईप सुरु होतो.
पाच बोटांच्या मध्यभागी रेकीचे उर्जा केंद्र आहे.
आणि या सर्व स्टारच्या मध्यकेंद्रांत उर्जा केंद्र असून त्यात गोविंदाचा वास असतो. येथूनच उच्च प्रतलावरील
कॉसमॉसशी कनेक्शन करून घेता येते.

शरीराच्या स्पायनल कॉर्डमधील सप्तकेंद्रे जर तपासली तर मध्यभागी हार्ट सेंटरच येते. वरील तीन केंद्रे लक्ष्मी केंद्रे आणि खालील तीन केंद्रे सरस्वति केंद्रे संबोधली तर मुलाधार केंद्र ओपन केल्यास सरस्वति वर वाहणे सुरु होईल हे स्पष्ट होते.

ज्योतिषतज्ञ जेव्हा हात पाहतो तेव्हा हाताच्या आतल्या तळव्यावरून लक्ष्मीची कल्पना घेतो.
हाताच्या पार्श्व भागावरून ( मूळ मनगट वरून ) सरस्वतिची कल्पना घेतो. त्याचप्रमाणे बोटाच्या मुळ आणि अग्र भागाचे निरिक्षण तो करत असतो.

हातापायाचे तळवे मध्य आणि भ्रुकुटी मध्य हे पाच किरणांचे मध्य आहेत. जे शरीराच्या हार्ट सेंटर (मध्य ) शी जुळलेले असावेत. आणि शरीराचे हार्ट सेंटर हे विश्व शरीराच्या हार्ट सेंटरशी जुळलेले असावे. जेणे करून उर्जा केंद्रांचे कॉसमॉस कनेक्शन सर्कीट पूर्ण होते.

तुमचा ओरा ( आभामंडळ ) किंवा शरीरातील कोणतेही उपांग हेल्थी करायचे आहे तर मन हार्ट सेंटर वर फोकस करून सरळ हदयाने कॉसमॉस कनेक्शन अॅक्टीव्हेट करावे.
यालाच प्रेयर प्रार्थना आरती अर्चना पूजा भक्ती योग असे नाव आहे. कोणी त्याला सुपर कॉन्शिअसनेस किंवा सोल कॉन्शिअसनेस किंवा कृष्ण कॉन्शिअसनेस तर कोणी सेंटर ऑफ लॉ ऑफ अॅट्रॅक्शन असे म्हणतात.

आहारविहार विचार व्यवहार ध्यान योग साधनेने निरंतर आभ्यास करून सरस्वति ही मूलाधारापासून प्रवाहीत करून पुनर्जन्म आणि  'डुप्लीकेट मुक्ती' चे कारण जे अज्ञान ते संपविले जाते. दुःखाचे मूळ अज्ञान हे निरंतर सरस्वति साधनेने भस्मसात केले जाते.

स्टारच्या उपकिरणाचे मूळापासून मूख्य किरणाच्या अग्रभागाशी कनेक्शन झालेले असते.
उदाहरणार्थ, बोटाचे मूळ हाताच्या मूळाशी आणि हाताचे मूळ शरीराच्या मुळाशी जोडलेले असते. अशाप्रकारे सरस्वति ही विश्व सरस्वतिशी जोडलेली असते.

अशाप्रकारे एका स्टारचे कनेक्शन दुसऱ्या मोठ्या स्टारशी असते व याच्यापासूनच एक मोठा राघव चैतन्य आणि केशव चैतन्याचा वटवृक्ष बनलेला असतो. जो असूनही दिसत नाही. श्रीज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी ची सुरुवात " स्वस्ति श्री वटेशु जो लपोनि जगदाभासु " अशी आहे. चांगदेव पासष्टी चा आभ्यास केल्यास या थिअरीची पूर्ण माहीती होते.

अज्ञान दूर करणे आणि आपल्या मूख्य मूळाचा शोध घेण्यासाठी सरस्वतिचा प्रवाह जागृत करणे आवश्यक ठरते. महाअवतार बाबाजींनी तुकारामांवर कृपा केली परंतु क्रियायोगाची सेवा तुकारामांना करता आली नाही. अशी खंत तुकारामांनी गुरुपरंपरेच्या अभंगात लिहून ठेवलेली आहे. केवळ  बाबाजींनी दिलेल्या रामकृष्णहरि मंत्रावर तुकारामांनी आध्यात्माचा प्रवास केला. 

विठ्ठल परब्रम्ह आहेत आणि त्यांच्या आज्ञा चक्रावरील लोकेशन मार्क असलेल्या पिंडीतून आतल्या ब्रेनस्टेम मेड्युला ऑब्लॉगॅटा येथे परमात्म गोविंद निवास करतो.

त्याचप्रमाणे आपल्या ब्रेनस्टेमजवळ आपला आत्म गोविंद निवास करतो.

अशाप्रकारे आपल्या खऱ्या घराचे लोकेशन तर कळले ! पण सुखरूपपणे जाण्याचा मार्ग माहीत पाहीजे. 

कर ड्रॉप करून आत्म गोविंद आपल्या परमात्म गोविंद घरापर्यंत जाण्यासाठी सहज समाधी मेडीटेशनचा नियमित सामुहीक आभ्यास संध्याकाळी पाच वाजता आपण करत असतो.

आपले भौतिक शरीर ही आपल्या कराची भूमि आहे. त्याचप्रमाणे भारत देशाच्या कराच्या भूमिवर आपला कर वसलेला आहे. 

भारत देशाच्या करमध्ये म्हणजे मध्यप्रदेश येथील उज्जैन शहरी महाकालेश्वर ज्योर्तिलिंगावर मनुष्य कराच्या भस्माचा अभिषेक केला जातो. 

भौतिक शरीर त्याग करून आत्मगोविंद जेव्हा परमात्म गोविंद कडे वाटचाल करू लागते तेव्हा त्याग केलेल्या देहाचे भस्म ,  आत्म गोविंदाचा पाठलाग करत देशाच्या करमध्ये येते. अशाप्रकारे पृथ्वीकरमध्यातून सूर्य करमध्यामध्ये, आणि सूर्यकरमध्यातून महासूर्यकरमध्या मध्ये वाटचाल होत राहते. महासूर्यकरमध्यातून कोटीसूर्यसमप्रभकरमध्यात , आणि कोटी सूर्यसमप्रभ मध्यातून विठ्ठलाच्या शीर्षभागातील कपाळ मध्यातून परमात्मगोविंदात आत्मगोविंद विलीन होवून जाते. 

दुःखप्रद विरह संपतो. देहाचे देहधारणेचे कष्ट संपतात.












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

चिरंजीवी

चि म्हणजे, इंटेलिजेन्सची एनर्जी ! चिरंजीव म्हणजे, जे इंटेलिजन्सला अनुसरून जीवन जगतात. सात चिरंजिव आणि त्यांचे विक पॉईंटस् खालीलप्रमाणे, ...

एकूण पृष्ठदृश्ये :