*निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई , एकनाथ नामदेव तुकाराम*
यापैकी पहीले चार विठ्लाचे अपत्य आणि नंतरचे तीन भक्त !
मायाजाळाचे ज्ञान झाल्यावर तुमचे ध्येय काय ?
नाथ बनायचेय ?
देव बनायचेय ?
राम बनायचेय ?
की सरळ सरळ मुक्ती मिळवायचीय ?
सरळ सरळ मुक्ती मिळविण्याचा मार्ग सोपा आहे ! सोपान मार्ग ! कारण ज्ञानदेव आणि मुक्ताई मध्ये एका सोपानचेच अंतर आहे !
सोपानदेवांचे कार्याचा गवगवाट नाही प्रसिद्धी नाही काहीही नाही. आपले आपले सायलेंट मध्ये सोहं चे पान करत बसायचे ! कॉन्शिअस ब्रिथिंग ! सेलेब्रेटींग सायलेन्स !
कुणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही. संपूर्ण ज्ञान आकलन करून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे. अशांनाच छुपे रुस्तम म्हणतात. कारण मुक्ताई अगदीच जवळ असते ! तिच त्यांची काळजी करत असते. स्वतःच्या श्वासावर लक्ष देत राहणे हे प्राणायाम विपश्यना ध्यान याचे मुख्य कर्तव्य असते. हिंदीमध्ये श्वासाला साँस असे म्हणतात. ज्याने ज्या गोष्टीचे परमेश्वराने सोपविलेले कर्तव्य केले तेथेच त्याची समाधि लागली. ज्ञानदेवांची आळंदीला समाधि लागली त्याचप्रमाणे सोपानदेवांची सासवडला समाधि लागली.
मायेत परत परत गोते खाण्याची वृत्ती संपली (*निवृत्ती*) की ज्ञानाचा उदय होतो. (*ज्ञानदेव*)
परंतु पार्या सारखे हातातून आणि डोक्यातून सटकून जाणारे ज्ञान टिकवून ठेवण्यासाठी नियमित साधनेच्या शिस्तीचे शरीर मन बुद्धीला सोपान लावून घ्यावे लागते. (*सोपान*) तेव्हा कुठे मुक्ती आणि शक्ती ताब्यात राहते (*मुक्ताबाई*) आणि आपण आत्मनिर्भर म्हणजे एकनाथ होतो. (*एकनाथ*) त्यानंतर श्रद्धा सबुरीने नामात लीन होऊन भक्तीची एक एक पायरी चढत जायची असते. (*नामदेव*) तेव्हा कुठे पुर्णपणे इहलोकातील तामसिक कामनेतून जीवाला पूर्णविराम मिळतो. (*तुकाराम*)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा