स्वतःच स्वतःच्या मन बुद्धी शरीराचे शल्य चिकित्सक बना ! शल्य विशारद बना !


शल्य म्हणजे खंत, वेदना, दुःख, मनस्ताप इ.इ.

शरीराला नीट आभ्यासले असता लक्षात येते की, शरीरातील चक्रे सतत चालू आहेत आणि परत परत रिपीट होणारी आहेत. 
" कौ "  म्हणजे पोटातल्या कावळ्याची कावकाव / मनाच्या इच्छांची रेलगाडी / कावळा शिवणे इ.इ.

मन आणि बुद्धीला पण नीट तपासले असता त्यातही चक्रे आहेत व ती वेळ काळ परिस्थितीनुसार परत परत रिपीट केली जातात.

" श्री " म्हणजे बुद्धी, इंटेलिजेन्स, इंटेल इनसाईड, बुद्धी वापरून लक्ष्मी गोळा केली जाते म्हणजे लक्ष्मी साठीपण श्री वापरली जाते. सरस्वति जागृत करण्यासाठीही बुद्धी वापरावी लागते. अशाप्रकारे " श्री म्हणजे बुद्धी " सतत खेळत असते. चक्र चालवणे, चक्र तयार करणे, चक्र ओरायलींग करणे , हे सर्व करणारी शक्ती " श्री " !

सृष्टी बनवणारे गुरुदेव, सृष्टी चालवता चालवता सांभाळता सांभाळता कंटाळत असतील का ?
आपण एक सायकल मेंटेन करता करता कंटाळतो का? मग दुसरी बनवतो, तिसरी बनवतो ! 

" कौ " आणि " श्री " या दोन संज्ञा आपल्याला समजल्या !
त्यांच्या संदर्भात जे शल्य निर्माण होते त्याला कौशल्य आणि श्रीशैल्य असे नावे आहेत.
" कौ " चक्राला चालवण्यासाठी
कौशल्य विकसित करावे लागते. त्याचप्रमाणे
" श्री " चक्राला चालवण्यासाठी
श्रीशल्य विकसित करावे लागते.

हे सगळे आपल्या मन शरीर बुद्धीचेच भाग असल्यामुळे कौशल्य / श्रीशल्य विकसीत करणे हे आत्मनिर्भरतेच्या मार्गातील एक पाऊलच म्हणता येईल.

विपश्यनेमधील मुख्य आभ्यास म्हणजे स्वतःच्या मनाच्या, बुद्धीच्या आणि शरीराच्या चक्रांचा आभ्यास करणे. तटस्थपणे ध्यान करून सर्व चक्रांचा आभ्यास करणे. 
प्राणायामाने श्वासावर नियंत्रण विजय मिळवणे, ध्यानाने चक्रांचा आभ्यास करणे. 

ही शल्यविशारद होण्याची प्राथमिक सुरुवात आहे. आत्मनिर्भरतेची प्राथमिक बेसीक रिक्वायरमेंट आहे.

आपल्या शल्याचे शल्यविशारद बनणे जमले तर कदाचित आपल्या परिवारातील लोकांनाही विकसीत होण्यात मदत होईल. आत्मनिर्भर होण्यात मदत होईल.

संज्ञा आणि व्याख्या समजून घेतल्याने आभ्यासात फायदा होतो.

नारदचे दोन अर्थ होतात म्हणजे माया देणारा ! शरीरमाया देणारा ! मायाधीशाचे ज्ञान देणारा !

शारद चे दोन अर्थ होतात, शरीर देणारा, शरद ! आणि वीणाधारी ! सरस्वति ! शारदा !

" वि " म्हणजे शरीरातील vitality, vitamin जीवनसत्व ! जीवनाचे सत्व !
अशाप्रकारे,
" विशारद " ह्या शब्दाचा काय अर्थ होते ते तुम्ही समजून घ्या .

" चि " म्हणजे शरीर ! बॉडी !
" कि " म्हणजे चालवणारी मुख्य किलक चावी !

तुमचे कुलूप किंवा ताल्यात चावी नीट घुसत नसेल तर तुम्ही ती फाईलीवर घासतात किंवा तासतात.
अशाप्रकारे " चिकित्सक " या शब्दाचा काय अर्थ होते ते तुम्ही समजून घ्या .
ध्यान करा , साधना करा, आत्मनिर्भर बना, आभ्यास करा ! आणि
स्वतःच स्वतःच्या शरीराचे शल्य चिकित्सक बना ! शल्य विशारद बना !








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ज्ञानव्यापी शीव म्हणजे काय ?

ज्याने स्वतःच्या अहंकाराला जिंकले. स्वतःला जिंकले. स्वतःच्या शरीराला आणि स्वतःच्या आत्म्याला जिंकले. तो ' मद्ज्जित ' आहे. ज्याला स...

एकूण पृष्ठदृश्ये :