Spirituality explained in mathematical functions
गणितीय सुत्रामध्ये अध्यात्म स्पष्टीकरण
x, y, z असा इंग्रजी अक्षरांचा चढता क्रम आहे.
x हे अक्षर नकारात्मकता किंवा ब्लॉकेज दर्शवते.
y हे अक्षर नकारात्मकता किंवा ब्लॉकेज वर ज्ञानाने सक्सेस मिळविलेल्या आनंदी व्यक्तीसारखे आहे.
z हे अक्षर विजेच्या लखलखाटासारखे आहे. शरीरापासून मुक्त झालेल्या सारखे आहे.
वाय इज फन्क्शन ऑफ एक्स
y = f(x)
साक्षरतेचे चिन्ह आनंदाने दोन्ही हात वर केलेल्या Y चिन्हासारखे आहे. सरस्वति मंत्राची सुरुवात " या " ह्या अक्षराने होते. ( या कुन्देंदू तुषारहार धवला.......)
गणितात प्रमेयाची सुरुवात y =f(x) ह्या गृहीतकानुसार होते.
स्वातंत्र्याची व्हॅल्यु आणि अवधी हा बंधनात असतांना केलेल्या प्रामाणिक आभ्यासाच्या क्वान्टीटी आणि क्वालिटीवर तसेच सदाचार पुण्यकर्मांवर डिपेंड असतो.
झी इज फन्क्शन ऑफ वाय
Z= f(y)
निवृत्तीनाथांनी, ज्ञानेश्वरांनी समाधी घेतलेली आहे पण मुक्ताबाई सरळ विज होऊन गेल्या. त्या पहिल्यापासूनच ज्ञानी होत्या. आनंदी होत्या. मुक्त होत्या. असे असतांना देखील त्यांनी संतांना शिकविण्याचे पुण्यकर्म केलेत.
आता आपण काही आध्यात्मिक संज्ञेच्या व्याख्या पाहूयात !
अ यो ध या
अ यो ध या = दोनदा सरस्वतिचे आवाहन "यो आणि या" या अक्षरांनी केलेले आहे. अयोध्येत सरस्वति स्थिर असल्याने तिथे युद्धे होत नाहीत. सरस्वति नाडी ओपन आणि सरस्वतिला स्थिर अधिष्ठान लाभलेल्या पृथ्वी किंवा शरीराला अयोद्धया असे संबोधलेले आहे.
लं का
लं का = लं हे पृथ्वी आणि शरीराचे जडत्वाचे बीज आहे.
सरस्वति चोकअप झाल्याशिवाय जडत्व पृथ्वी शरीर वाढत नाही.लं का हे सरस्वति चोकअप असलेल्या पृथ्वी किंवा शरीराला संबोधण्याची संज्ञा आहे.
पृथ्वी आणि शरीर याला सतत घाण ( मल ) पासून स्वच्छ ठेवावे लागते. आरोग्य सुधरत राहावे लागते.
त्याचप्रमाणे पृथ्वी आणि शरीर टिकविण्यासाठी सतत पैसा अर्जित करावा लागतो (मणी)
अशाप्रकारे आरोग्य आणि पैसा टिकविता टिकविता ( मणि आणि मल शी लढता लढता ) आयुष्य संपून जाते.
पुष्पक विमान आणि सिता
पुष्पक विमान आणि सिता = सिता अयोद्धेतून लंकेत पुष्पक विमानाने आणली जाते. त्याचप्रमाणे लंकेतून अयोद्धेत परत पुष्पक विमानानेच जाते.
सिता
सिता ही भगवंताची कृपादृष्टी रूपी शक्ती आहे जिच्या जोरावर सर्व जगाचे कामकाज जिवन चालते म्हणून तिला जान (जिवंतपणा ) की असेही म्हणतात. जिचा आपल्या शरीराच्या डोळ्यात अंश असतो त्यामुळे डोळ्याला पण जान असते तेज असते नाहीतर डोळे आंधळे म्हटले जातात.
पुष्पक विमान
पुष्पक विमान हे आत्मचिंतन स्वचिंतन आत्मकामना ध्यान
मनशक्ती आणि ब्रम्हशक्तीवर आधारित मनइच्छा पूर्तीसाठीच्या आत्म्याच्या मन प्रवासाचे एक साधन आहे.
सरस्वति जागृतीच नाही पण सरस्वति मरेपर्यंत स्थिर करण्यासाठी रोजच्या रोज क्रियायोगाचा आभ्यास अत्यावश्यक आहे. क्रियायोगाची दिक्षा महाअवतार बाबाजींच्या कृपाप्रसादानेच मिळते. क्रियायोगाशीवाय आरत्या भजनं नमाज हरिपाठ सुद्धा नीट आकलन होत नाही. क्रियायोगाशिवाय मनुष्य एक जनावराची जिंदगी जगतो. कारण तो भक्ती करत असला तरी त्याचे त्यालाच उमजलेले नसते. शंकर महाराजांनी म्हणून ठेवलेले आहे " जो खुदको समझता है वोही मुझे पहचानता है "
ज्ञानेश्वरी अ . १३ ओवी६८
ह्या ओवीत महाअवतार बाबाजींचा स्पष्ट उल्लेख ज्ञानदेवांनी केलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे :
प्रभु काश्मीरात मुके होऊन बसले आहेत. हे सांगून देखील तुम्हाला उमजत नाही तर मग तुमचे काय कौतुक करावे का ?
संत तुकारामांना महाअवतार बाबाजींचे गंगा नदीच्या काठी प्रत्यक्ष दर्शन झाले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे भोजनासाठी पावशेर तुप मागितले होते. (अग्नीहोत्र होम हवन व्दारे). सत्यगुरूंची कृपा भेट झाली पण त्यांची सेवा करता आली नाही (क्रियायोग साधना) असा स्पष्ट उल्लेख गुरुपरंपरेतील अभंगात संत तुकारामांनी नमुद करून ठेवले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा