अवदशेतून तारणारा अवतार


दशा म्हणजे दहा !
अव म्हणजे दुःखदायक !

शरीरातला विष्णु दहा अवतारातून फिरत असतो !
शरीरातील मनशक्ती दहा महाविद्येतून फिरत असते !

ही एनर्जी या दहाच्या चकर मधून बाहेर पडून शांतमय सुखमय तृप्त व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची धडपड असते !

मनुष्य जीव मग तो कितीही श्रीमंत बुद्धीमंत कुलवंत शीलवंत असला तरी एका लिमिटच्या बाहेर त्याला अवदशेतून निघणे कठीण होते. 

अनेक मंत्र तंत्र कर्मकांडे करून सुद्धा परतपरत चक्रात पडणे
मनुष्याला कंटाळवाणे होते. आणि मग तो आहे तसे अॅक्सेप्ट करून एन्जॉय करू लागतो. पण शारीरीक मानसिक व्याधी लागल्यावर परत त्याला ह्या ट्रॅपची जाणीव होते व तो विव्हळ व्याकूळ होतो. 

ह्या दहाच्या बाहेर अकराव्या स्थिर आत्मनिर्भर ठिकाणी पोहोचावे. यासाठी त्याला मार्गदर्शक गुरुची गरज असते. नव्या काळाच्या, नव्या तंत्राच्या, नवी पिढीच्या अनुरूप अश्या ज्ञानी विज्ञानी निरअहंकारी निर्विकारी विसडम गुरूची गरज असते. त्याचप्रमाणे एका नव्या भरभक्कम सपोर्ट सिस्टीमची गरज असते कारण जूनी सिस्टीम त्याला परत परत अवदसेत पाठवणारी असते. 

जूनी सिस्टीम मध्ये डागडुजी करून ती अद्यवायत बनवावी अशी जीवाची इच्छा असते परंतु प्रयत्न केल्यावर कळते की जसे डायनॉसॉरचे हाडे मोल्ड करून त्याला मनुष्याचा सांगाडा बनवणे अत्यंत अशक्यप्राय गोष्ट आहे. त्याप्रमाणे जूनी सिस्टीम बिलकूल बदलायला तयार नसते त्यामुळे तिला मुल्ड करण्यात गेलेला वेळ आणि पैसा अक्कल खाती जमा झालेला असतो. जुन्या सिस्टीमला त्याग करून विसडमचा अंगिकार करून शहाणे लोक कधीच पूढे निघून गेलेले असतात.

ह्या जन्मात ह्या क्षणाला कोणीतरी मोठा चांगला माणूस असतो ज्याला लोक गुरु म्हणत असतात फॉलो करत असतात त्याचप्रमाणे जूने इस्टाव्लीश लोक त्याचा व्देष करत असतात. अशावेळी लगेच समजावे की तारक अवतार तो हाच ! वेळ न दवडता त्या माणसाकडून शिकणे सुरु करावे. आत्मकल्याण करून घ्यावे व अवदसेतून बाहेर पडावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यपूर्ण पोस्टस् :

ज्ञानव्यापी शीव म्हणजे काय ?

ज्याने स्वतःच्या अहंकाराला जिंकले. स्वतःला जिंकले. स्वतःच्या शरीराला आणि स्वतःच्या आत्म्याला जिंकले. तो ' मद्ज्जित ' आहे. ज्याला स...

एकूण पृष्ठदृश्ये :