मध्यकाळात घरातल्या बायका मुले नवीन बॉलीवूड पिक्चर बघण्यास उत्सुक असायचे कारण त्यात काहीतरी घटना सांगितलेली असायची जी समाज मनाचा आरसा असायची, आपल्या मनावर आयुष्यावर परिणाम करणारी किंवा कुठेतरी घडलेली केस स्टडी सिम्युलेट केलेली असायची. याच्याने रेडीमेड पद्धतीने लोकांचा अनुभव बघायला मिळायचा. जनमानसाची दिशा आणि दशा काय आहे हे समजायचे. न्युज पेपर तसेच गुप्तहेर संघटना देखील विविध माहीती संघटनेच्या अध्यक्षाकडे द्यायची. त्यानुसार त्या त्या क्षेत्राचे क्षेत्रपाळ बैठकी घेऊन काही आदेश अध्यादेश नियम कायदे कानून प्रकाशित करायचे.
मुस्लीम लिडर फतवा प्रकाशीत करतात आणि सर्व त्यांचे फॉलोअर ते फॉलो करतात.
हिंदू संघटना, मंदीर, गुरुकुल , आश्रम यांचे ट्रस्टी लिडर मासिक साप्ताहीक प्रसिद्ध करतात. इतर मंदीर ट्रस्टींना मार्गदर्शक सुचना करतात.
ख्रिस्ती मिशनरी फादर, जैन, मारवाडी , बौद्ध आणि शिख अशा इतर धर्मीय तसेच संघटनाचे कार्यकारी मंडळ सुद्धा विविध लोकेशन वरील कार्यकारीणीशी बैठकीचा निर्णय पोहोचवण्याचे काम एकमेकांशी संपर्कात राहण्याचे काम करित असतात.
बैठक शक्यतोवर आरोग्य, सुरक्षा, उत्पन्नाचे साधने आदि सरव्हायव्हल रिलेटेड गोष्टींशी संबंधीत असते.
*राजाचे काम असते प्रजेचे प्रश्न सोडवणे आणि प्रजेचे काम असते राजाचे म्हणणे नीटपणे ऐकून घेणे.* परंतु लोकशाही मध्ये प्रत्येकाला राजा बनण्याचा चान्स मिळाला. अशावेळी
संपूर्ण विश्वाच्या प्रकृतीच्या सृष्टीच्या काळाच्या राजाचे काय म्हणणे आहे ? हे ऐकून घ्यायची खरेतर प्रत्येकाचे मग तो विद्यार्थी, कर्मचारी, लौकीक राजा, ट्रस्टी, संघटनेचा मुख्याधिकारी, देशाचा पंतप्रधान, राष्ट्रपती, कंपनी संघटनेचा धर्माचा लिडर का असेना ! मुख्य कर्तव्य इच्छा जबाबदारी बनली.
सृष्टीच्या मालकाची इच्छा वेळोवेळी जाणून घेणे यात सर्वांना स्वारस्य असते. कारण त्याला फॉलो करून सर्वात जास्त उत्पन्न लाभ असतो, आरोग्य आणि वेळेची बचत होणार असते, फरफट थांबणार असते. मोठमोठ्या सुनामी टळू शकतात. मात्र अशाप्रकारे विश्वात्म्याचे ऐकणे हे केवळ पवित्र होऊन ध्यान समाधी अवस्थेत शक्य होते.
पंचतत्वांमध्ये वैश्रवण नावाची शक्ती असते ज्यामुळे ते इथर मधील सर्वांच्या मनातले विचार ऐकू शकतात.
तुकारामांनी लिहीलेल्या ' सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ' या अभंगात ' मकर कुंडले तळपती श्रवणी ' असा उल्लेख आहे.
याचा साधा सरळ अर्थ घेतला तर कानात मास्याच्या आकाराचे कुंडले आहेत असा होतो ! पण आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीने तुकारामांना काय सांगायचे आहे ?
मिलिटरीमध्ये कमांडरच्या ऑरडरला प्रतिप्रश्न न करता तंतोतंत पाळणे असा नियम असतो. कारण देशाची सुरक्षा जबाबदारी मिलिटरी कमांडरची असते. दुसरी गोष्ट अशी की यात फायर ऑर्डर असते म्हणजे शत्रु पक्षाचा सैनिकाचा खून केला जातो. कायद्यानुसार खून करण्याचे पाप खून करणाऱ्या सैनिकाच्या माथी न येता त्याला ऑर्डर देणाऱ्या शृंखलेच्या माथी येत असते ! मेलेल्या सैनिकाच्या मुक्तीसाठी कराव्या लागणाऱ्या क्रियाकर्माची जबाबदारीपण त्यापाठोपाठ येते. त्यामुळे आर्डर आणि प्रोटोकॉल मध्ये एक रुपयाचा पण फरक केला जात नाही. पण त्यासाठी ऑर्डर नीट ऐकून घेणे समजून घेणे याची सवय असावी लागते. आभ्यास असावा लागतो.
कॉरपोरेट आणि गव्हर्नमेंट कर्मचारी आपल्याला बॉसकडून काम मिळावे यासाठी जाणते कर्मचारी तडपत असतात जेणेकरून आपले काम अॅपरेझल मध्ये दाखवता येईल. पदोन्नतीची वाट मोकळी होईल. जो कर्मचारी आपल्या बॉसचे म्हणणे धीर धरून संपूर्णपणे ऐकून घेतो तो कर्मचारी तंतोतंतपणे जबाबदारी पार पाडण्यास सक्षम बनतो व बॉसकडून कौतुकास पात्र बनतो. सिस्टीम प्रोटोकॉलचा आभ्यास, कायदयाचा आभ्यास जेवढा जास्त असेल तेवढा माणूस सिस्टीममध्ये फसू न शकता उत्कृष्टपणे कामे करू शकतो. आपली ओळख वेळ एनर्जी इंधन आयुष्य अन्न लिमिटेड आहे याची जाणीव असल्याने त्याचा अपव्यय बिलकूल होऊ नये अशी जीवाची इच्छा असते. पोटपाणी आरोग्य आणि सरव्हायव्हल या तिनही गोष्टी साध्य करण्यासाठी जीवरूपी मासा सिस्टीमरूपी कुंडामध्ये बद्ध असतो ! अशावेळी तो कुंडाच्या मालकाशी योग जुळवू पाहतो. त्याचे ज्ञान ऐकण्यासाठी तो तडपत असतो. जेणेकरून चुकाच होणार नाही. फसगत होणार नाही. पदोन्नती आणि चक्रमुक्ती लवकर साध्य होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा